Tuesday, February 19, 2019

हसा व निरोगी व्हा

हसा व निरोगी व्हा 

निरोगी राहण्यासाठी मला फेसबुक या एका सामाजिक माध्यमाची ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठी भाषेत SOCIAL MEDIA  ) बऱ्यापैकी मदत होते . कसे ते पहा .... 

काल कंटाळा आला म्हणून विरंगुळ्यासाठी फेसबुक पहात होतो . एका मराठी आडनावाच्या तरुणाने त्याच्या " मालमता विक्री " च्या ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठी भाषेत PROPERTY DEALING ) या व्यवसायाविषयी माहिती दिली होती . दुसऱ्याचं अंधानुकरण करून ऐटीत इंग्रजीत माहिती दिली होती . त्या माहितीतील  ( BEST REAL ESTATE INVESTMENT GUIDER )  हे वाक्य वाचून मला हसावं का रडावं ते कळेना . मी मुद्दाम GUIDER चा मराठीत काय अर्थ होतो हे GOOGLE मध्ये शोधले  ,  पण GOOGLE  ने  GUIDER चा मराठीत अर्थ सांगण्यास असमर्थता दर्शवली . ( GOOGLE ने सपशेल हात टेकले ) . 

मराठी असून देखील ओढून , ताणून अस्तित्वात नसलेल्या इंग्रजी शब्दांचा असा वापर पाहून माझे भरपूर मनोरंजन झाले . निरोगी व्हायला थोडीशी मदत झाली. 

तेंव्हा " हसा व निरोगी व्हा " . 

मी तुमचा निरोगी राहण्याचा "GUIDER" होऊ का ? 


Monday, February 18, 2019

आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग

नमस्कार , ,
"आफ्टर ऑल मराठी इस माय मदर टंग "
"आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे" . कारण आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात, तितके फॉरीन लँग्वेजमधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल.
- पु.ल. देशपांडे - संदर्भ : "आमचे भाषाविषयक धोरण "
सध्या मराठीची गत याहूनही वाईट झाली आहे .
दोन मराठी व्यक्ती , मराठी मध्ये बोलताना प्रत्येक वाक्यात अंदाजे ४० ते ८० % इंग्रजी शब्द वापरतात. आकाशवाणी वरील मराठी कार्यक्रमात देखील काहीसं असच अनुभवायला मिळतं . याबाबत आकाशवाणी निवेदक / निवेदिका ( आमच्या शुद्ध मराठीत RJ ) यांना याबाबत दूरध्वनी केला असता , " YOUNG GENERATION " ला कळण्यासाठी आम्ही असं मराठी कमी व इंग्रजी शब्द जास्त बोलतो , असं उत्तर मिळतं . आकाशवाणी वरील एका मराठी FM वाहिनीवरील, एका मराठी कार्यक्रमाचं नाव होतं , BREAKFAST SHOW .
मराठी मालिकांचे हाल तर याहूनही वाईट आहेत.

मराठी वृत्त वाहिन्या देखील इंग्रजी मिश्रित मराठीत बातम्या देत असतात , कार्यक्रम सादर करीत असतात . 

मी आधीही कोणाला इंग्रजी संभाषण करताना , JUST NOW FINISHED MY नाश्ता , असे कधीच ऐकले नाही , पण मराठी संभाषणात मात्र आताच BREAK FAST केला , असे सर्रास ऐकू येते.
शुद्ध मराठी बोलताना ( मातृभाषेत ) , कसली लाज वाटते , कसला कमीपणा वाटतो ?
कोठे नेऊन ठेवले आहे मराठी माणसांनी मराठीला ?
प्रतिक्रिया देण्या अगोदर कृपया व्यवस्थित वाचा , आपण मराठी संभाषणात किती इंग्रजी शब्द , वाक्ये वापरता याचा हि विचार करा .
चला , स्वतःपासूनच शुद्ध मराठी बोलायची सुरुवात करूया .
आपणच मराठीला वाचवूया !
सत्यजित अ शाह - ठाणे

Monday, February 11, 2019

Troubled by dogs, Lalu Yadav faces sleepless nights

Troubled by dogs, Lalu Yadav faces sleepless nights


Monday, 03 Sep, 9.11 amWindow to News

Troubled by dogs, Lalu Yadav faces sleepless nights Ranchi Sep 3 (IANS) Former Bihar Chief Minister and Rashtriya Janata Dal (RJD) chief Lalu Prasad Yadav on Monday requested the authorities of Rajendra Institute of Medical Science (RIMS) here to shift him to another ward as he cannot sleep due to the incessant barking of dogs near the super speciality ward of the hospital.
According to RJD legislator Bhola Yadav Lalu Yadav cannot sleep due to barking of dogs and it has had an adverse impact on his health.
He said Lalu Yadav has requested the hospital authorities to shift him to a paying ward of the RIMS. Bhola Yadav also said that the RJD chief s sugar level was above normal limit and he needed to walk.
Lalu Yadav surrendered on August 30 in a special CBI court of Ranchi. On the same day he was shifted to RIMS from Birsa Munda Central Jail for treatment.
The Jharkhand High Court on August 24 had directed him to surrender by August 30. He was out on provisional bail since May 11.
He was in Ranchi s Birsa Munda Central Jail after being convicted in December 2017 in a fodder scam case.
He was convicted in two more cases in January and March this year and awarded 14 years imprisonment.
In 2013 Lalu Yadav was convicted in the first fodder scam case and sentenced to jail for five years.
The multi-million-rupee fodder scam had surfaced in the 1990s when Lalu Yadav was Bihar s Chief Minister. At the directive of Patna High Court the probe was handed over to the Central Bureau of Investigation.

--IANS ns/qd/sed
Window To News

https://m.dailyhunt.in/news/india/english/windowtonews-epaper-wintonws/troubled+by+dogs+lalu+yadav+faces+sleepless+nights-newsid-96098225


Saturday, February 9, 2019

ठाणे या एका स्मार्ट सिटी तील " निर्बीजीकरणाचे लचके "

 ठाणे या एका स्मार्ट सिटी तील  " निर्बीजीकरणाचे लचके " 

" महाराष्ट्र टाईम्स " या एक नावाजलेल्या मराठी दैनिकाच्या १० फेब्रुवारी , २०१९ च्या अंकातील हा एक लेख येथे देत आहे. 

एवढा अभ्यासपूर्ण व आकडेवारीसकट लेख लिहिल्याबद्दल सानिका कुसुरकर ताई यांचे मनःपूर्वक आभार . 

प्रसार   माध्यमांनादेखील हा अतिशय भयावह वेगाने वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येचा प्रश्न महत्वाचा वाटतो हा एक सकारात्मक सामाजिक  बदल आहे . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 


Thursday, February 7, 2019

Dhun Badal ke Toh Dekho on 92.7BigFm by VRAJESH HIRJEE





DHUN BADAL KE TOH DEKHO on 92.7 Big FM
Please watch my interview taken by Hindi Films actor , Mr. Vrajesh Hirjee. Request to click on  subscribe , Like & Share  in this video.  DHUN BADAL KE TOH DEKHO. EVIL TRIUMPHS WHEN GOOD PEOPLE SIT QUIET !  #DhunBadalKeTohDekho   # MumbaiMaskaMaarKe  

https://www.youtube.com/watch?v=rOHMH8uaIoU


पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड #DhunBadalKeTohDekho

" पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड "
नमस्कार , 
मंगळवार , २९.१२.२०१५ च्या " ठाणे वैभव " या ठाणे जिल्ह्यातील वर्तमान पत्रातील पृष्ठ क्रमांक १ व ४ वर आलेली " पोलिसालाही भरावा लागला नागरिकाच्या दक्षतेमुळे वाहतूक दंड " बातमी येथे माहितीसाठी देत आहे.
या बातमीसंदर्भात एक छोटेसे विश्लेषण हि पुढे देत आहे.
केल्याने होत आहे रे पण " नागरिकाने " आधी " जागरूक नागरिक " बनलेची पाहिजे
" आपल्या देशात काहीच सुधारणा होणार नाही " , " हे सगळ असच चालत राहणार " , " मी एकटा कसा काय समाजात बदल घडवू शकतो ? " हि व अशी अनेक समानार्थी वाक्ये अथवा अश्या " प्रतिक्रिया " अनेकदा म्हणजे नेहमीच आपल्याला ऐकू येतात . याचे एक कारण देखील आहे आणि ते म्हणजे बहुसंख्य भारतीय नागरिकांना फक्त " प्रतिक्रिया " देण्याची हौस असते. पण स्वतः क्रिया कधीच करायची नसते.
मी माझ्या एका कवितेत म्हटले आहे
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ,
घरात बसून प्रतिक्रिया देणे निरर्थक आहे.
माझा अनुभव मात्र वेगळाच आहे . खालील दोन घटना आपल्यासमोर देत आहे. याचे सगळे पुरावे ( छायाचित्रे , दंड केल्याची पावती , पत्र ) या स्वरुपात माझ्याकडे आहेत.
घटना क्रमांक १ ) : २४.११.२०१५ रोजी मी कार्यालयात जात असताना एक दुचाकीस्वार ज्याच्या वाहन क्रमांक पट्टीवर " पोलिस " असे लिहिले होते ( जो गुन्हा आहे ) , शिरस्त्राण ( HELMET ) नव्हते घातले , वाहन क्रमांक छोट्या अक्षरात व मोठ्या आकड्यात लिहिला होता . तो सिग्नलला थांबला होता तेंव्हा त्याला याबद्दल मी शांतपणे सांगितले, पण त्याने दुर्लक्ष केले . पुढचा धक्का म्हणजे तो समोरील सिग्नल हिरवा होण्यास १८ सेकंद बाकी असताना सिग्नल मोडून वेगात निघून गेला . तेंव्हा माझी सटकली. त्याचे छायाचित्र अगोदरच काढले होते.
रात्री घरी आल्यावर हे सगळ DCP TRAFFIC , THANE , व इतर पोलिस अधिकार्यांना ई मेल ने कळविले.
छायाचित्र टिपायला ३० सेकंद लागले. ई मेल पाठविण्यास ५ ते ८ मिनिटे लागली . त्यानंतर मी कधीच या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही.
पण याचा परिणाम पहा. मला २४.१२.२०१५ ला नौपाडा वाहतूक शाखेतून दूरध्वनी आला कि माझी तक्रारीवरून त्या दुचाकीच्या मालकाचा पत्ता शोधून वाहतूक पोलिसांनी त्याला बोलावले . ती दुचाकी दुसराच कोणीतरी चालवीत होता , त्याला देखील बोलावले व त्या गृहस्थाला वर लिहिलेल्या ४ गुन्ह्यांसाठी प्रत्येकी रुपये १०० म्हणजे एकूण रुपये ४०० दंड भरावा लागला. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर व त्या गृहास्थाला झालेल्या दंडाची पावती जोडली आहे )
घटना क्रमांक २ ) : शुक्रवार , ९ ओक्टोंबर , २०१५ रोजी संध्याकाळी अंदाजे ५.५५ वाजता मी कार्यालयातून घरी निघालो होतो. . स्थळ ऐरोली कडून पटनी कॉम्पुटर कडे जाणारा रस्ता .
समोर एक दुचाकी चालविणारी व्यक्ती हि पोलिस असूनही त्या व्यक्तीने एकाच वेळी खालील ३ नियम मोडले होते .
१. ) दुचाकी चालविताना शिरस्त्राण ( HELMET ) नव्हते घातले .
२. ) दुचाकी चालविताना भ्रमणध्वनी यंत्रावर ( MOBILE PHONE वर ) संभाषण करीत आहे
३. ) दुचाकीच्या मागे पोलिस असे एक वर्तुळाकार STICKER लावले आहे.
ताबडतोब ते छायाचित्र टिपले. त्याच दिवशी रात्री DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांना व इतर काही व्यक्तींना एक ई मेल व ते छायाचित्र पाठविले. हे सगळ करण्यासाठी फक्त ५ ते ७ मिनिटे एवढाच वेळ लागला . त्यानंतर मी त्याचा कधीच पाठपुरावा केला नाही.
मला बुधवार , ४ नोव्हेंबर , २०१५ ला दुपारी १२.१७ वाजता DCP TRAFFIC , NAVI MUMBAI यांच्या कडून मला एक ई मेल आला त्यात त्यांनी माझ्या तक्रारीवर काय कार्यवाही केली हे कळविले. ( या सोबत माझा ई मेल , मी काढलेले छायाचित्र, पोलिसांचे माझ्या तक्रारीला दिलेले उत्तर जोडले आहे )
आता मला सांगा की
१. ) पोलिसांना , राजकारण्यांना , मंत्र्यांना , राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीचे नियम माफ आहेत ?
२. ) केल्याने होत आहे कि नाही ?
३. ) हे सगळ करायला असा कितीसा वेळ आपल्याला लागतो ?
गेली अंदाजे ३.५ ( साडे तीन ) वर्षे मी पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घातले पाहिजे यासाठी विविध पातळ्यांवर लढत आहे. त्या लढ्याला यश येताना दिसत आहे . मी काही वाहतूक चौक्यांमध्ये तेथील वरिष्ठ अधिकार्यांना भेटलो . त्यांनी मला पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल केलेल्या कारवाई बद्दल सांगितले कि दर महिन्याला अंदाजे ५० ते १०० पोलिसांवर शिरस्त्राण न घातल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही केली जाते. आपण याची शहनिशा करण्यासाठी DCP TRAFFIC , THANE यांच्याशी सम्पर्क साधू शकता.
आपणाला हे लक्ष्यात आले आहे कि नाही ते माहित नाही , पण गेले काही महिने दूरचित्रवाणी ( T.V. ) वरील नवीन मालिकांमध्ये जेंव्हा दुचाकीवरील एखादा प्रसंग असतो तेंव्हा त्या पुरुष , महिला कलाकारांनी शिरस्त्राण घातलेले असते .
हे तर मी नेहमीच सांगतो कि फक्त एकट्याच्या प्रयत्नांनी १०० % यश येण्यासाठी जास्त वेळ लागेल . पण जर " नागरिक " हि व्यकी " जागरूक नागरिक झाली व सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांनी हा प्रश्न घेतला तर तो दिवस दूर नाही जेव्हा " भारत " या देशातील प्रत्येक पोलिस दुचाकीवर शिरस्त्राण घातलेला दिसेल. प्रत्येक राजकारणी , मंत्री, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते , शासकीय कर्मचारी व नागरिक वाहतुकीचे व इतर सगळे नियम पाळताना दिसतील.
या पुढील लढाई आसन पट्टा ( SEAT BELT ) न लावणे , गाडीला काळ्या काचा असणे, विचित्र पद्धतीने वाहन क्रमांक लिहिणे , वाहन क्रमांक पट्टीवर राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे , गाडीचा दिवा प्रखर पांढरा ठेवणे , देवनागरी मध्ये वाहन क्रमांक लिहिणे , चित्र विचित्र असे भोंगे ( HORN ) बसविणे , सिग्नल न पाळणे , वाहन उलट दिशेला नेणे व इतर अश्या अनेक नियम मोडणाऱ्या च्या विरुद्ध चालू करायची आहे ( माझ्या कडून हि लढाई चालू सुद्धा झाली आहे ) .
आपल्याला हे पटतंय ना ? " भारत " या देशात स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो.
चला मग कोणाची वाट पाह्ताहात ? आपण सगळे मिळून हि लढाई लढवूया ना ?
वारंवार स्वतःचे PROFILE PICTURE फेसबुक वर बदलणे , वारंवार खाद्य पदार्थांची छायाचित्रे फेसबुक वर टाकणे , या पेक्षाही कमी वेळ " जागरूक नागरिक " बनण्यासाठी लागतो.
सत्यजित अ शाह - ०९८२११५०८५८
ठाणे, महाराष्ट्र 


Tuesday, February 5, 2019

पोलिसच नियम पाळत नाहीत

पोलिसच नियम पाळत नाहीत
ठाणे पश्चिम येथील राबोडी वाहतूक पोलीस चौकीसमोर हे छायाचित्र टिपलं आहे. या महिला पोलीस अधिकारी दुचाकी चालविताना विना शिरस्त्राण दिसत आहेत. गंमत म्हणजे समोरील बाजूस रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे असलेले दिसत आहेत. म्हणजेच वाहतूक पोलीस चौकीसमोरून , व वाहतूक पोलिसांसमोरून या महिला पोलीस विना शिरस्त्राण दुचाकी चालवीत जात आहेत , पण हे त्या वाहतूक पोलिसांच्या नजरेस येत नाही. 
पोलिसांनी नियमांची अशी पायमल्ली केली तर कसं होणार ? 
हे थांबायला नको का ? 
पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे म्हणून मी एकट्याने २०१३ सालापासून प्रयत्न करीत आहे.    

Evil Triumphs When Good People Sit Quiet 
Stand up for what is right , Even if you’re standing alone !