Saturday, November 22, 2014

हेल्मेट च्या सक्ती विरुद्ध लढणे कितपत योग्य आहे ?


“ का विसरता सर सलामत तो पगडी पचास “.

मी एक अति सामान्य माणूस आहे . पण सध्या हेल्मेट च्या सक्ती विरुद्ध जे काही चाललं आहे त्या वर थोडस लिहाव वाटल म्हणून हा सगळा अट्टाहास.

पुढचं वाचण्या अगोदर हे फोटो पहा .

२ फोटो मध्ये , API श्रीकांत सोन्ढे - GOLDEN DIES NAKA  TRAFFIC POLICE CHOWKY जे प्रयत्न करताहेत ते दिसताहेत.

तिसऱ्या फोटोत सुरत ( गुजरात ) येधील पोलिस हेल्मेट घातलेला दिसतोय.

चवथ्या फोटोत कोचीन ( केरल ) येथील हेल्मेट घातलेले नागरिक दिसताहेत.

मी GERMANY , स्पेन , SWITZERLAND  , या देशामध्य हि दुचाकी स्वरांना हेल्मेट शिवाय पाहिले नाही.

मी स्वतः २० वर्षे दु चाकी चालविली आहे व एकाही वेळेला हेल्मेट शिवाय फिरलो नाही . मी रोज अंदाजे ६० ते ८० KM एवढा प्रवास दुचाकीवर करत होतो. ४ वेळा हेल्मेट मूळे मला झालेल्या दुचाकीच्या अपघातात डोक्याला मार लागला नाही. ( थोडक्यात मी हेल्मेट मूळे या चार हि अपघातातून सही सलामत वाचलो .)

हे हास्यास्पद आहे कि हेल्मेट च्या विक्री साठी हेल्मेट ची सक्ती होत आहे .

माझ्या मते  MOTOR VEHICLE ACT मध्ये सगळ्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालण्याबद्दल नियम आहे कि नाही  हे महत्वाच नाही तर हे दुचाकी स्वराच्या स्वतः च्या सुरक्षिततेसाठीच आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही .

हेल्मेट घालण्याची सक्ती वाटते , उद्या सीट बेल्ट घालण्याची पण सक्ती वाटेल , वाहन चालविण्याचा परवाना काढण्याची हि सक्ती वाटेल , आपण कोठे चाललो आहे ?

हेल्मेट च्या सक्ती विरुद्ध लढणे कितपत योग्य आहे ?

का विसरता सर सलामत तो पगडी पचास .

हेल्मेट  घाला
              दंड  टाळा
डोक  वाचवा
              जीव  वाचवा
घरच्यांना तू हवा
              मित्रांनाही तू हवा




Wednesday, November 19, 2014

Accident spots on Kapurbawdi flyover fixed
Padmja Sinha @PADMJA
Thane: The six major accident spot on 1.5km Kapurbwadi flyover has been in limelight ever since it was opened for public use.
The flyover has witnessed many accidents in past few months and after repeated complaints and efforts of activist Satyajit Shah, BJP MLA Sanjay Kelkar has instructed officials to speed up the work.
In a recent meeting, which was held on November 17, the MLA told the officials to start work within four days and fix all the major problems on the flyover which is a major threat for the commuters.
Sanjay Kelkar informed, “I have been following the issue for a long time now. I am coordinating with MSRDC officials closely and would get the work done soon. In fact, the one problem near Lodha Paradise has already been resolved, the immediate exit has been blocked and the new one has been opened 100-meters ahead.”
The other problem on the stretch is that there are no rumblers and solar-operated blinkers on Balkum arm, and the sharp U-turn at the Ghodbunder-Mumbai arm of the flyover is dangerous as there is no speed breaker. Speed rumblers and direction boards are the need of hour and this needs to be resolved.
Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) deputy engineer BR Sarvade has ensured that accident spots would be fixed soon. The MLA has ensured that he would not leave the work incomplete and few more review meetings regarding this has been scheduled on November 22.
Activist Satyajit Shah said, “Fixing problematic zones was important and high-level of intervention is required. Now I am hopeful that the problem would be resolved.”
As per the MLA, the work would be completed in two weeks.
Published Date:  Nov 20, 2014


Saturday, November 1, 2014

MAJIWADA FLYOVER or A MAUT KA KUWA ?

Read this news article [ub;oshed on Times Of India dt. 1st Nov. 2014 . 

In spite of having so many accident-prone spots on this newly constructed flyover, without taking any step to stop
these accidents, authorities are planning to open this for public.

In case of accidents, who will be responsible ? who will give the compensation ? How the loss to human life will be replaced ? Why and who designed this kind of faulty fly over ?

Who will answer these questions ?

Thursday, October 23, 2014

हेल्मेट न घालण्याची एक वाईट प्रथा

सध्या तरुणांपासून , अगदी पोलिसांपर्यंत हेल्मेट न घालण्याची एक वाईट प्रथा पडली आहे .

ठाण्याच्या गोल्डन Dyes  वाहतूक शाखा येधे हे एक अप्रतिम जागरूकतेचा संदेश देणारे  पोस्टर लागले होते.

मी सर्व दुचाकी वापरणार्यांना असे आवाहन करतो कि हेल्मेट न घालता आपलं दुचाकी वाहन चालवू नका . 

काही फोटो पहा त्यात तुम्हाला सामान्य नागरिक दुचाकीला हेल्मेट लावलेला दिसतोय ( त्याला बहुतेक माहित नाही कि हेल्मेट हे स्वतःच्या डोक्यावर घालायचे असते )  , दुसऱ्या फोटोत पोलिस हेल्मेट शिवाय दिसतोय आणि तिसऱ्या फोटो मध्ये आपल्याला एक वाहतूक पोलिस हेल्मेट शिवाय दिसतोय.

आपण जर दुचाकी चालक  ( नागरिक , पोलिस , वाहतूक पोलिस ) कोणीही  हेल्मेट शिवाय बहितले तर त्यांना हेल्मेट घालण्याची विनंती करा .

वाईट वाटते की हे सगळं हेल्मेट घालण्याचा  नियम सगळ्यांना लागू असल्यावर सुद्धा अस चित्र बघायला मिळत .

चला सगळ्यांनी नियम पाळण्याची सुरुवात स्वतः पासून करूया.



Tuesday, October 21, 2014

"महापालिकेतील कुशासनाला ठाणेकरांची चपराक" जयेश सामंत, ठाणे

ठाण्यातील सुजन मतदारांनो , आपण हा आजच्या ( २१.१०.२०१४ ) "लोकसत्ता" या वर्तमान पत्रातील ठाणे वृत्तान्त मध्ये चापून आलेला , पत्रकार श्री. जयेश सामंत यांनी अगदी रोख ठोक लिहिलेला लेख जरू वाचा .

नेहमी मत देताना हा लेख डोळ्यासमोर आणला तर तुमच मत वाया जाणार नाही.
तुम्हीही वाचा , पुढे मित्रांनाही पाठवा .

मी श्री. जयेश सामंत यांना या लेख साठी धन्यवाद देवू ईश्चीतो.
( http://www.loksatta.com/…/maharashtra-assembly-election-re…/ )

"महापालिकेतील कुशासनाला ठाणेकरांची चपराक"

जयेश सामंत, ठाणे
Published: Tuesday, October 21, 2014

ठाणे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत साटेलोटय़ाच्या राजकारणात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी घरचा रस्ता दाखविला असून या सर्व राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवणाऱ्या भाजपला कौल देताना महापालिकेत मोठा भाऊ म्हणून मिरविणाऱ्या शिवसेनेला मात्र अद्दल घडवल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे आले आहे.
महापालिकेच्या राजकारणात दादा मंडळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण या दोन बडय़ा पदाधिकाऱ्यांची तर मतदारांनी डाळच शिजू दिलेली नाही. वर्षांनुवर्षे लाल दिवा मिरवूनही ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर निवडणुकीचा हंगाम जवळ येताच विकासकामांचा वसंत फुलविणाऱ्या नेत्यांनाही ठाणेकर मतदारांनी आपली जागा दाखवली आहे. त्यामुळे समन्वयाच्या नावाखाली ठाण्यात वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या मांडवली राजकारणाला मतदारांनी एक प्रकारे लागवलेली ही चपराक असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. ठाणे महापालिकेत वर्षांनुवर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचे आणि निष्ठावंतांना बाजूला सारत इतर पक्षांतील गणंगांना जवळ करण्यातच ठाणे शिवसेनेतील स्थानिक नेते गेल्या काही वर्षांपासून मश्गूल राहिल्याचे चित्र दिसत होते. कधी मुंब्य्रातील नगरसेवकाला जवळ करायचे, तर कधी इंदिसे कंपनी किंवा बसप वगैरेंसारख्या कुणाच्या तरी गळ्यात स्थायी समितीसारखे महत्त्वाचे पद टाकायचे, असे महापालिकेत वर्षांनुवर्षे सुरू आहे. सत्ता टिकविण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी करण्याच्या फंद्यात निष्ठावंत शिवसैनिकांवर होणाऱ्या अन्यायाकडे पाठ फिरवल्यानेच शिवसेनेच्या ठाण्यातील राजकारणाची उतरंड सुरू झाल्याचे आता उघडपणे बोलले जाऊ लागले आहे. ठाणे शहरातून भाजपच्या चिन्हावर विजयी झालेले संजय केळकर यांच्या विजयात मोदी लाटेचा मोठा वाटा असला तरी महापालिकेतील या बजबजपुरीपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने तयार झालेल्या प्रतिमेचा फायदाही त्यांना मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दादा नगरसेवकांना घरचा रस्ता
ठाणे महापालिकेत ठरावीक नगरसेवकांचा एक मोठा गट प्रभावशाली असतो हे नेहमीच दिसून आले आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आपल्या प्रभागातील कामे करून घेण्यासाठी एकीकडे धडपडत असताना विरोधी बाकांवर बसणारे काही नगरसेवक महापालिका चालवितात की काय, असे म्हणण्याजोगी परिस्थिती महापालिकेत आहे. राष्ट्रवादी नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, मनसेचे सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे नारायण पवार, मनोज िशदे, शिवसेनेतील नरेश म्हस्के, अशोक वैती अशा ठरावीक नगरसेवकांचा महापालिकेत दबदबा राहिला आहे. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीत कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटांचे बार कोणामुळे उडविले गेले हे लपून राहिलेले नाही. आयत्या वेळचे विषय कसे मंजूर होतात, इतिवृत्तातील नोंदी कशा बदलल्या जातात, महत्त्वाचे ठराव चर्चेविना मंजूर करण्यात कोणाचे हित लपले आहे, याच्या सुरस कथा महापालिका वर्तुळात मोठय़ा चवीने चर्चिल्या जात असतात. महापालिकेतील जुळवाजुळवीत माहीर असलेल्या या नेत्यांना विधानसभेचे गणित मात्र जमलेले नाही, हेच यंदाच्या निवडणुकीत दिसून आले. ओवळा-माजिवडा मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण या दादा नगरसेवकांना स्वत:चे डिपॉझिटही राखता आले नाही. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे िरगणात उतरलेले नारायण पवार यांनाही मतदारांनी सपशेल नाकारले. मुंब्य्रातील ज्येष्ठ नगरसेवक यासिन कुरेशी यांना मतदारांनी १५ हजार मतांच्या पुढे जाऊ दिले नाही. विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचा लाल दिवा डोक्यावर असूनही वसंत डावखरे यांना आपला मुलगा निरंजन यांना ३० हजार मतांच्या पल्याड नेता आले नाही. तुमचा हा लाल दिवा आमच्या काय कामाचा, असा सवालच एक प्रकारे डावखरे यांना ठाणेकर मतदारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून विचारला आहे.

Monday, October 20, 2014

" आजची सत्यगीतं " या काव्यसंग्रहातील कवितांच काव्य वाचन - आचार्य अत्रे कट्टा,



माझा १६.१०.२०१४ ला जिजाऊ उद्यानातील आचार्य अत्रे कट्टा, ठाणे पश्चिम येथे  , " आजची सत्यगीतं " या काव्यसंग्रहातील कवितांच काव्य वाचन हा कार्यक्रम झाला , त्या कार्यक्रमाची
बातमी २१.१०.२०१४ च्या  महाराष्ट्र च्या ठाणे पुरवणी मध्ये  आली आहे.

बऱ्याच व्यक्तींनी कविता आवडल्याच सांगितलं. कविता वाचनात सुधारणा हवी हे सुद्धा सांगितलं .

माझ्या कविता या सगळ्यांच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या आहेत हे काहींनी आवर्जून सांगितलं.

काहींच्या मते, ते गप्पा बसतात पण मी गप्पा न बसता त्या कवितेद्वारे जगासमोर आणल्या याच काहींनी कौतुक केल.

मला ( एका नवकवीला )  एकट्याचा  ( SOLO ) कार्यक्रम करण्याची संधी देऊन माझ्यावर जो विश्वास अत्रे कट्ट्यावरील कट्टेकरींनी दाखविल्या त्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे .

आपण माझा " आजची सत्यगीतं " हा काव्यसंग्रह खालील ठिकाणी विकत घेऊ शकता.
मॅजेस्टिक ग्रंथ दालन ( Shivaji Mandir , दादर) मो.- 98922 20239
मॅजेस्टिक बुक डेपो (ठाणेदूरध्वनी : 2537 68 65

जर आपल्याला " आजची सत्यगीतं " हा काव्यसंग्रह नाही मिळाला तर आपण मला ०९८२११५०८५८ या मोबाईल वर संपर्क साधू शकता . मला आपण satyajitshah64@gmail.com या ई-मेल ला  ई-मेल पाठवू
शकता .

मला  "नागरिकांना" -  " जागरूक नागरिक " बनविण्याच्या या माझ्या मोहिमेत आपल्या सर्वांची साथ हवी आहे.


Saturday, October 18, 2014

" आजची सत्यगीतं " कविता वाचनाचा जाहीर कार्यक्रम ठाण्याच्या आचार्य अत्रे कट्यावर



गुरुवार ता. १६ ऑक्टोंबर २०१४ ,  माझा " आजची सत्यगीतं " या काव्य संग्रह मधील
कविता वाचनाचा पहिला मोठा जाहीर कार्यक्रम ठाण्याच्या १३ वर्षांपासून अखंडपणे चालू असलेल्या आचार्य अत्रे कट्यावर झाला.

या कट्यावर च्या शुभांगी ताई घाग , संपदा ताई वागळे सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.

 काही फोटो त्या कार्यक्रमाचे.