“ का विसरता सर सलामत तो पगडी पचास “.
मी एक अति सामान्य माणूस आहे . पण सध्या हेल्मेट च्या सक्ती विरुद्ध जे काही चाललं आहे त्या वर थोडस लिहाव वाटल म्हणून हा सगळा अट्टाहास.
पुढचं वाचण्या अगोदर हे फोटो पहा .
२ फोटो मध्ये , API श्रीकांत सोन्ढे - GOLDEN DIES NAKA TRAFFIC POLICE CHOWKY जे प्रयत्न करताहेत ते दिसताहेत.
तिसऱ्या फोटोत सुरत ( गुजरात ) येधील पोलिस हेल्मेट घातलेला दिसतोय.
चवथ्या फोटोत कोचीन ( केरल ) येथील हेल्मेट घातलेले नागरिक दिसताहेत.
मी GERMANY , स्पेन , SWITZERLAND , या देशामध्य हि दुचाकी स्वरांना हेल्मेट शिवाय पाहिले नाही.
मी स्वतः २० वर्षे दु चाकी चालविली आहे व एकाही वेळेला हेल्मेट शिवाय फिरलो नाही . मी रोज अंदाजे ६० ते ८० KM एवढा प्रवास दुचाकीवर करत होतो. ४ वेळा हेल्मेट मूळे मला झालेल्या दुचाकीच्या अपघातात डोक्याला मार लागला नाही. ( थोडक्यात मी हेल्मेट मूळे या चार हि अपघातातून सही सलामत वाचलो .)
हे हास्यास्पद आहे कि हेल्मेट च्या विक्री साठी हेल्मेट ची सक्ती होत आहे .
माझ्या मते MOTOR VEHICLE ACT मध्ये सगळ्या दुचाकी स्वारांनी हेल्मेट घालण्याबद्दल नियम आहे कि नाही हे महत्वाच नाही तर हे दुचाकी स्वराच्या स्वतः च्या सुरक्षिततेसाठीच आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही .
हेल्मेट घालण्याची सक्ती वाटते , उद्या सीट बेल्ट घालण्याची पण सक्ती वाटेल , वाहन चालविण्याचा परवाना काढण्याची हि सक्ती वाटेल , आपण कोठे चाललो आहे ?
हेल्मेट च्या सक्ती विरुद्ध लढणे कितपत योग्य आहे ?
का विसरता सर सलामत तो पगडी पचास .
हेल्मेट घाला
दंड टाळा
डोक वाचवा
जीव वाचवा
घरच्यांना तू हवा
मित्रांनाही तू हवा
No comments:
Post a Comment