" आमदार आमच्या घरी "
" आमदार आपल्या भेटीला " या एका अनोख्या उपक्रमाद्वारे ठाणे शहराचे लोकप्रिय , सुशिक्षित , सुसंस्कृत असे आमदार श्री. संजय केळकर साहेब आम्ही राहत असलेल्या " हाईड पार्क " संकुलात आले होते .
त्यांना अगोदरच आमच्या घरी येण्याबद्दल विनंती केली होती . कार्यक्रम संपल्यावर आमदार साहेब काहीही आढे वेढे न घेता आमच्या घरी आले . घरी आल्या आल्या माझ्या बायकोने मला दम दिला कि केळकर साहेबांसमोर राजकारण व सामाजिक प्रश्न याबद्दल काहीही बोलायचे नाही . केळकर साहेब त्यावर छानसे हसले .
त्यांनी अल्पोपहार केला , चहा घेतला , घरच्यांशी गप्पा मारल्या व पुन्हा येण्याचं आश्वासन देखील दिलं . ते असे समाजकारणी , राजकारणी आहेत कि दिलेली आश्वासनं पाळतात.
त्यांची साधी राहणी , उच्च विचारसरणी , त्यांचा शांतपणा , त्यांचं वाचन , त्यांचं सखोल द्यान , बोलण्यात मग्रुरी नाही , बोलतांना शिव्या , अपशब्द नाहीत , उगाच बडेजावपणा नाही , उगाच पांढरा पेहराव नाही , हाताच्या दहा बोटात सोन्याच्या २० अंगठ्या नाहीत , गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी नाही , उगाचच ३ / ४ भ्रमणध्वनी यंत्रे नाहीत , एकही अंगरक्षक नाही , उगाचच चमचेरूपी कार्यकर्त्यांची फौज नाही , साधी चार चाकी , वाहन क्रमांक नियमाप्रमाणे लिहिलेला , वाहनाला काळ्याकुट्ट काचा नाहीत . हे सगळं तुम्हाला नवीन असेल , पण ठाणेकरांना हे असे केळकर साहेब मनःपूर्वक आवडतात .
असे सुशिक्षित , सुसंस्कृत " आमदार आमच्या घरी " आले , त्यांनी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या .
आम्ही धान्य झालो .
आम्ही सुदैवी आहोत कारण प्रकाश आमटे , सौ . मंदाताई आमटे , सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे ( संपादीका - नवाकाळ ) आणि आमदार संजय केळकर साहेब अशी थोर व्यक्तिमत्व आमच्या घरी आलेली आहेत.
थोर व्यक्ती येति घरा , तोचि दिवाळी , दसरा !
No comments:
Post a Comment