" आमदार आपल्या भेटीला "
ठाणे शहराचे लाडके , सुशिक्षित , सुसंस्कृत असे आमदार श्री. संजय केळकर साहेब हे बहुतेक भारत देशातील एकमेव असे आमदार असतील कि जे " आमदार आपल्या भेटीला " या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या मतदार संघातील विविध रहिवासी इमारतींमध्ये जाऊन रहिवाश्यांनी भेट घेतात. हे वाचून फेसबुक वरील बहुसंख्य " प्रतिक्रियावादी " भारतीय नागरिक असे म्हणतील कि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक जवळ आल्या म्हणून हि सगळी नाटकं असतील . मला अश्या " प्रतिक्रियावादी " भारतीय नागरिकांची कीव येते , व त्यांच्याबद्दल वाईट देखील वाटतं कारण त्यांची उडी घरी बसून फक्त " प्रतिक्रिया " देण्यापुरतीच असते ( अश्यांना " उंटावरून शेळ्या राखणे " प्रवृत्तीच्या व्यक्ती असे मी म्हणतो ) .
असो , केळकर साहेब हे सन २०१४ साली विधानसभेची निवडणूक भरघोस मतांनी निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशीच काही रहिवासी संकुलात जाऊन मतदानाचे आभार मानायला गेले होते . त्या नंतर त्यांनी " आमदार आपल्या भेटीला " हा उपक्रम चालू केला होता . रविवार , २८ जुलै, २०१९ रोजी ते मी राहत असलेल्या घोडबंदर रॊड येथील " हाईड पार्क " रहिवासी संकुलात " आमदार आपल्या भेटीला " हा उपक्रमांतर्गत आले होते . ती त्यांची त्या उपक्रमातील ९४ वी भेट होती .
कार्यक्रमाच्या सुरवातीला मी थोडसं बोललो . त्यानंतर केळकर साहेबांनी उपस्थितांना त्यांच्या समस्या मांडण्यास सांगितल्या . काहींनी त्या निवेदनाद्वारे मांडल्या , तर काहींनी त्या तोंडी मांडल्या . त्याच वेळी केळकर साहेबांसोबत आलेल्या स्वप्नाली साळवी ताई या कार्यकर्त्या संक्षिप्तपणे उपस्थितांचे म्हणणे टिपत होत्या . श्री. रवी रेड्डी हे आलेले एक कार्यकर्ते देखील महत्वाच्या बाबी टिपत होते.
सगळी निवेदने देऊन झाल्यावर मग केळकर साहेबांनी प्रत्येक विचारलेल्या गेलेल्या प्रश्नावर , समस्येवर ( अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते पथकर पर्यंत ) मुद्देसूद उत्तर दिले . केळकर साहेबांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली कि नागरिकांनी एकत्र येऊन दबाव गट ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " PRESSURE GROUP " ) बनवावा म्हणजे अनेक समस्यांचे निवारण लवकर होऊ शकते .
काळे काका या एका जेष्ठ व जागरूक नागरिकांनी केळकर साहेबांचा श्रीफळ व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार , लेखक , शिल्पकार श्री. मनोहर सप्रे यांचा ग्रंथसंग्रह देऊन सत्कार केला .
नगरसेवक , आमदार , खासदार अश्या अनेक आदरणीय , माननीय , वंदनीय , पूजनीय व्यक्ती निवडून आल्यावर पुढील निवडणुकीपर्यंत फक्त भल्या मोठ्ठ्या अश्या अनधिकृत फलकांवर दिसत असतात . पण आमदार केळकर साहेबांना असं प्रत्यक्षात पाहिल्यावर अनेक उपस्थितांना कौतुक व आनंद झाला होता.
आपल्या भेटीला ( निवडणूक सोडून ) कधी तरी कोणता नगरसेवक , आमदार , खासदार आला होता का ? याचे उत्तर मला देऊ नकात कारण ते सगळ्यांना ठाऊक आहे.
No comments:
Post a Comment