पावसाळ्यात ९९ % वाहन चालक ही चूक हमखास करतात
नमस्कार ,हि ध्वनीचित्रफीत ( ज्याला आजच्या शुध्ध्द व प्रचलित मराठी मध्ये VIDEO CLIP असे म्हणतात ) कृपया पहा . यात ९९ % वाहन चालक पावसाळ्यात काय चूक करतात ते निदर्शनास आणले आहे.
पावसाळ्यात , अथवा धुकं असल्यावर , अथवा बोगद्यामध्ये ९९ % वाहन चालक वाहन चालविताना , आणीबाणी दिवे ( EMERGENCY LIGHT ) , अथवा धोक्याचे दिवे ( HAZARD LIGHT ) अथवा वाहन उभे केल्यावरील दिवे ( PARKING LIGHT ) लावून वाहन चालवीत असतात . पण ते चुकीचे आहे . अश्यावेळी वाहन चालकाने उजवीकडे अथवा डावीकडे वळण्याचा दर्शक दिवा ( RIGHT / LEFT INDICATOR ) दिला तरीही ते मागच्याला कळत नाही व अपघात होतात .
विचार करा , अमलात आणा , बाकीच्यांना देखील हि चूक समजावून सांगा . सुविचार पुढे पाठविण्यापेक्षा , GOOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD EVENING , GOOD NIGHT वगैरे टाकण्यापेक्षा अश्या गोष्टी लोकांना पाठवा .
विसरू नकात अनेक अपघात हे मानवी चुकीने होतात.
No comments:
Post a Comment