Sunday, August 5, 2018

प्राणी प्रेमाचा अतिरेक

प्राणी प्रेमाचा अतिरेक
हे छायाचित्र कृपया नीट पहा .
हा भटका कुत्रा मुंबई येथील माटुंगामधील माहेश्वरी उद्यान या भागातील एका सुप्रसिद्ध दाक्षिणात्य उपहारगृहाच्या ( आजच्या शुद्ध , प्रचलित मराठीत FAMOUS SOUTH INDIAN RESTAURANT च्या ) समोर आज , रविवार , ५ ऑगस्ट, २०१८ च्या सकाळी अंदाजे १०.०० वाजता या प्रकारे मस्त पहुडला होता. त्याच्या बाजूला प्राणी मित्र , प्राणी मैत्रीण यांनी दिलेली ७ बिस्किटे तशीच पडलेली होती. तो भटका कुत्रा त्या बिस्किटांकडे चुकून देखील पाहत नव्हता . याचाच अर्थ त्याचे पोट अगोदरच तुडुंब भरलेले कारण दुसऱ्याच कोणत्यातरी प्राणी मित्र , प्राणी मैत्रीण यांनी त्याला पोट भरून खाऊ घातले होते.
गम्मत म्हणजे भिकाऱ्यांना हे प्राणी मित्र , प्राणी मैत्रीण हाड म्हणणार , पण भटक्या कुत्र्यांना मात्र अपचन होईपर्यंत , मधुमेह होईपर्यंत खाऊ घालणार .
आहे कि नाही " प्राणी प्रेमाचा अतिरेक " .


No comments:

Post a Comment