सावधान - दर १८ मिनिटांनी एका ठाणेकराला कुत्र्याचा चावा
" सामना " दिनांक : ८ मे , २०१८.
" भटक्या कुत्र्यांच्या अमर्याद वेगाने वाढत जाणाऱ्या संख्येविरुद्ध " व " श्वान दंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध " मी गेली १० ते १२ वर्षे , गल्ली ते दिल्ली लढतोय .
भारतीय नागरिकांचे असे दुर्दैव आहे कि " मानव मरो , पण भटके कुत्रे जगो " अशी एक विचित्र गोष्ट प्राणी मित्रांच्या अतिरेकामुळे होत आहे .
श्वान दंश झाल्यावर कधीही प्राणी मित्र धावून आलेला ऐकिवात नाही .
माझ्या मते ' भारत " या देशाला " कुत्रे प्रधान " देश म्हणून काही वर्षांनी घोषित केलं जाईल अशी भीती वाटल्यावाचून राहत नाही .
No comments:
Post a Comment