“ नागरिकांकडूनच पर्यावरणाचा ऱ्हास “
नमस्कार ,
काही
दिवसांपूर्वी
मला पर्यावरण दक्षता मंच व ठाणे जिल्हाधिकारी ( COLLECTORATE ) कार्यालय यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ठाणे खाडीतून पक्षी निरीक्षणासाठी छोट्या होडीतून भ्रमण करण्याची संधी मिळाली होती .
त्या दरम्यान हे छायाचित्र टिपलं आहे . त्यात प्लास्टिक च्या पिशवीत निर्माल्य दिसत आहे . अश्या अनेक पिशव्या मी त्या खाडी भ्रमणादरम्यान पाहिल्या .
अश्या शेकडो , हजारो पिशव्याभरून दररोज खाडी , नाले , नदी , समुद्र यात टाकले जाते. अश्याने सगळीकडे ' मिठी ' नदी सारखी पुरपरिस्थिती उदभवायला कितीसा वेळ लागेल ?
प्रत्येक वेळी शासनाच्या नावे बोटं मोडण्यात काहीही मोठेपणा नसतो.
नागरिकांनी वेळीच ' जागरुक / सजग ' होण्याची नितांत आवश्यकता आहे.
कसा काय भारत देश जगातील महासत्ता बनू
पाहतोय हेच कळत नाही .
या विरुद्ध जनजागृती करण्याची नितांत
गरज आहे .
सत्यजित अ शाह - ठाणे
No comments:
Post a Comment