नमस्कार ,
" फेसबुक वरील १ एप्रिल ( एप्रिल फुल ) च्या पोस्ट - एक सदमा "
आपल्यापैकी अनेकांनी श्रीदेवी , कमल हसन यांच्या उत्कृष्ट अभिनयाने गाजलेला " सदमा " हा हिंदी चित्रपट पाहिला असेल . ( हा चित्रपट ८ जुलै, १९८३ रोजी प्रदर्शित < आजच्या शुद्ध मराठीत RELEASE > ) झाला होता .
तुम्ही म्हणाल कि त्या चित्रपटाचा आणि वर लिहिलेल्या विषयाचा काय संबंध ? सांगतो , व्यवस्थित सांगतो .
" सदमा " या चित्रपटातील भूमिकेत श्रीदेवी फक्त वयाने मोठ्ठी झालेली असते , पण तिचे वागणे , बोलणे , विचार हे लहान बाळासारखे असतात . जणू काही असाच भास मला काल , म्हणजे शनिवार , १ एप्रिल , २०१७ ( एप्रिल फुल ) च्या फेसबुक वरील अनेक पोस्ट वाचून झाला . फेसबुक वरील अनेक व्यक्ती ( वयोगट १८ ते ८० , पुरुष व स्त्रिया दोघेही , शिक्षित , अति शिक्षित , वार्ताहर ,डॉक्टर , शिक्षक , विद्यार्थी . . . . . . . . .) ज्यांच्या PROFILE PICTURE मध्ये मला सदमा मधील श्रीदेवी दिसत होती.
माझं ठाम मतं आहे कि भारत या देशात फेसबुक चा वापर योग्य प्रकारे होत नाही.
खरं तर समाज प्रभोधनासाठी फेसबुक चा योग्य वापर होण्याची नितांत गरज आहे.
No comments:
Post a Comment