Tuesday, April 25, 2017

फेसबुक वर वाढदिवसाला " प्रकटदिन " लिहणाऱ्यांनो

नमस्कार ,
" फेसबुक वर वाढदिवसाला " प्रकटदिन " लिहणाऱ्यांनो "
फेसबुकवर अनेक व्यक्ती स्वतःच्या वाढदिवसादिवशी स्वतःच आज अस्मादिकांचा XX वा प्रकटदिन आहे असे लिहीत असतात . त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती दुसऱ्यांचे छायाचित्र टाकून त्या व्यक्तीला " प्रकट 
 दिनाच्या " शुभेच्छा असतात .
आज देखील एका महिलेने तिच्या फेसबुक वरील पानावर ( FACEBOOK PAGE ) दुसऱ्यांचे छायाचित्र टाकून त्या व्यक्तीला " प्रकटदिनाच्या " शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या .
हे योग्य नाही हे मला खात्रीपूर्वक वाटत होते , पण याची खातरजमा करण्यासाठी मी याबद्दल मराठी च्या एका प्राध्यापकांना विचारले असता त्यांनी असे सांगितले कि " प्रकटदिन " हा शब्द प्रयोग साधू , संत , महात्मे यांच्या साठीच वापरतात .
सामान्य व्यक्तीने स्वतःला अथवा दुसऱ्या सामान्य व्यक्तीला वाढदिवसा च्या शुभेच्छा देताना " प्रकटदिनाच्या " शुभेच्छा असा शब्दप्रयोग करणे यथोचित नाही.
आपल्याला आठवत असेल कि , उत्तर प्रदेशातील एक राजकारणी महिलेने स्वतःच स्वतःच्या जिवंतपणी स्वतःचे अनेक पुतळे बनविले व स्वतःच त्या स्वतःच्या पुतळ्यांचे अनावरण केले . .हे असे दुसऱ्याला " प्रकटदिन " म्हणणे अथवा स्वतःच स्वतःला प्रकटदिन आहे असे म्हणवून घेणे म्हणजे या पुतळ्यांसारखेच वाटते .
भविष्यात फेसबुकवर काही व्यक्ती स्वतःच्या वाढदिवसादिवशी स्वतःच आज अस्मादिकांची "जयंती" आहे लिहिल्यावर आश्चर्य वाटून घेऊ नकात . त्याचप्रमाणे काही व्यक्ती दुसऱ्यांचे छायाचित्र टाकून त्या व्यक्तीला " जयंतीच्या " शुभेच्छा असे लिहिल्यावर आश्चर्य वाटून घेऊ नकात ..

Wednesday, April 12, 2017

" भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " - जन जागृती साठी


नमस्कार , प्रसन्न सकाळ , - " भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " - जन जागृती साठी

आपणाला माहीतच असेल कि माझा " भटक्या कुत्र्यांना राष्ट्रीय प्राणी घोषित करा " हा माझा एक लेख " नवा काळ " या दैनिकाच्या ७ एप्रिल, २०१५ च्या अंकात छापून आला होता . 

७ तारखेपासून ते १० एप्रिल, २०१५ पर्यंत मला अंदाजे १०० जणांनी दूरध्वनी करून व ५ जणांनी SMS करून लेख आवडला व या महत्वाच्या विषयाला अश्या अनोख्या पद्धतीने वाचा फोडल्याबद्दल माझे अभिनंदन केले.
अगदी धुळे, नागपूर, सिंधुदुर्ग, नागपूर , बारामती , कोल्हापूर , भुसावळ , पुणे , उरण , चिपळूण अशा अनेक मुंबई पासून दूर असलेल्या ठिकाणानहूनही दूरध्वनी आले . “नवा काळ” अक्षरशः महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सर्वदूर वाचला जातो याचे फारच कौतुक वाटले.
असो , या सर्व दूरध्वनींमुळे असे कळले कि हा भटक्या कुत्र्यांचा त्रास सगळ्या नागरिकांनाच होत आहे आणि सगळ्यांनाच " तोंड दाबून बुक्क्याचा मार " सहन करावा लागात आहे.
आत्ता पर्यंत या भटक्या कुत्र्यांमुळे शेकडो जणांचे प्राण घेतले आहेत व हजारो व्यक्तींना जखमी केले आहे . आपल्या देशात या मृत व्यक्तींच्या घरच्यांची परिस्थिती काय झाली असेल याचे या प्राणी मित्रांना काहीच घेणे नसते . जखमींच्या मदतीसाठी या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था कधी पुढे आलेल्या ऐकिवात नाही. अनेकांनी मला असे सांगितले कि हे प्राणी मित्र फक्त भटक्या कुत्र्यांना खाण्यासाठी घराबाहेर येतात पण भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना जो त्रास होतो त्याबद्दल त्यांना काहीच पर्वा नसते. गम्मत म्हणजे अश्या प्राणी मित्रांना हे भटके कुत्रे कधीच चावत नाहीत कारण त्यांना यांच्या कडून खाणे मिळत असते.
आता या प्रश्नावर फार मोठे जन आंदोलन छेडण्याची नितांत गरज आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet


Saturday, April 8, 2017

A SCRATCH OR BITE FROM A PET DOG OR STRAY DOG CAN BE FETAL

A SCRATCH OR BITE FROM A PET DOG OR STRAY DOG CAN BE FETAL – SPEAK TO YOUR DOCTOR. 


Friday, April 7, 2017

" वसईत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त "

" वसईत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त  " 

हे मी काही स्वतःच्या मनाचे नाही सांगत . 

या मथळ्याची बातमी ७ एप्रिल, २०१७ च्या " नवा काळ " या दैनिकात आली आहे. 

दररोज भारत या देशात अंदाजे १,४१,९६० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो . 

गेली ५ ते ६ वर्षे या जटील  समस्येवर मी गल्ली ते दिल्ली एकटाच लढतोय . 

माझा हा लढा शासन दरबारी कोणापर्यंत पोहोचत नाही . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 


(  जन जागृतीसाठी एका जागरूक नागरिकाकडून  ) 


" दवंडी देणे " प्रवृत्ती FACEBOOK ( FB ) वरील “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ”

" दवंडी देणे " प्रवृत्ती

बरोबर एका वर्षांपूर्वी , मी फेसबुक वरील माझ्या पानावर ( आजच्या शुद्ध मराठीत PAGE वर ) फेसबुक वरील व्यक्ती आणि प्रवृत्ती या लेखमालेतील , " दवंडी देणे " प्रवृत्ती या बाराव्या प्रवृत्ती विषयी लिहिले होते.

या अश्या प्रवृत्तीच्या व्यक्ती सदा न कदा फेसबुक वर गोंधळ माजवताना दिसत असतात .

काल , गुरुवार , ६ एप्रिल, २०१७ रोजी या " दवंडी देणे " प्रवृत्तीच्या थोर व्यक्तींनी अखेर राणे भाजपात... अशी बातमी त्यांच्या फेसबुक वरील पानावर टाकून गदारोळ माजवून दिला होता .

या दवंडी मुले अनेकांना नारायण राणे भाजपात गेले असेच वाटले . ना दवंडी देणाऱ्यांनी या बातमीची शहानिशा केली , ना हि बातमी वाचणाऱ्यांनी . " गोव्याचे काँग्रेस चे विश्वजित राणे भाजपात गेले " अशी खरी बातमी होती .

दुर्दैवाने भारत या देशात अनेक व्यक्तींना अशी दवंडी देणे म्हणजे एक गम्मत , खेळ , वेळ घालविण्याचे साधन वगैरे वगैरे वाटत असावे .

मी पुन्हा सांगतो कि भारत या देशात फेसबुक या एक प्रभावी माध्यमाचा योग्य वापर फारच थोड्या व्यक्तींकडून होत असतो.

ईश्वरा , अश्या प्रवृत्तींना योग्य ती दिशा दाखव .

असो माझा " दवंडी देणे " प्रवृत्ती हा लेख या खाली देत आहे.

Satyajit A Shah
April 7, 2016 ·

१२. ) " दवंडी देणे " प्रवृत्ती

FACEBOOK ( FB ) वरील “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ”

नमस्कार ,

गेल्या अकरा दिवसात आपण अनुक्रमे १. ) “TIME KEEPER” प्रवृत्ती व २. ) " LIKE " प्रवृत्ती , ३. ) " Running Commentary " प्रवृत्ती , ४. ) " PROFILE PICTURE " प्रवृत्ती , ५. ) " प्रतिक्रिया देणे " प्रवृत्ती , ६. ) "खादाड " प्रवृत्ती , ७. ) "स्व" प्रवृत्ती , ८. ) "CELEBRITY च्या सोबत फोटो काढणे " प्रवृत्ती , ९. ) " TAG " ER प्रवृत्ती , १०. ) " उंटावरून शेळ्या राखणे " प्रवृत्ती , व ११. ) " चोर " प्रवृत्ती या अश्या अकरा वेग वेगळ्या प्रकारच्या FACEBOOK ( FB ) वरील “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ” बद्दल थोडीशी माहिती घेतली.

आजची अकराव्या प्रकारची प्रवृत्ती आहे

१२. ) " दवंडी देणे " प्रवृत्ती : हि सुद्धा एक जगावेगळी प्रवृत्ती फेसबुक वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येते. या प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोणतीही BREAKING NEWS ( बातमी ) कळाली तर ती लगेचच FB वर टाकतात. पण बऱ्याचदा अशी बातमी टाकताना त्या बातमीची सत्यता पडताळून ही पाहत नाहीत. काही वेळा या प्रवृत्तीच्या व्यक्ती तर सुप्रसिद्ध व्यक्तींच्या निधनाची बातमी , ती व्यक्ती जिवंत असून सुद्धा देतात. लगेचच याच प्रवृत्तीच्या बाकी व्यक्ती अशी टाकलेली बातमी एकही क्षण न दवडता SHARE करतात . या मुळे खोटी , चुकीची बातमी क्षणार्धात जगभर पसरली जाते हे अश्या प्रवृत्तींच्या कस काय लक्ष्यात येत नाही याचे आश्चर्य वाटते. अशानेच अफवा पसरण्याचा धोका जास्त असतो.

नुकतेच म्हणजे ( १८ जुन, २०१५ ला रात्री ) या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने फेसबुक वर एका सुप्रसिद्ध हिंदी हास्य कलाकाराचे हृदय विकाराने जुहु येथील त्यांच्या घरी देहावसान झाले हि POST त्या हिंदी हास्य कलाकाराच्या छायाचित्रा सोबत टाकली होती. सुदैवाने अशी काही दुखःद घटना घडलीच नव्हती .

कादर खान या एका हिंदी अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी एका " दवंडी देणे " प्रवृत्ती च्या एका व्यक्तीने नुकतीच FB वर दिली होती , बिचाऱ्या कादर खान यांना ते जिवंत असल्याचे ओरडून सांगावे लागले.

बर जो कोणी बातमी सर्वात अगोदर फेसबुक वर टाकेल त्याला एखादे पारितोषिक वगैरे मिळते असेही काही नाही . या प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कोणतीही बातमी फेसबुक वर टाकताना अगोदर बातमीची शहानिशा करून घेणे अतिशय गरजेचे असते.

तुम्हाला काय वाटते ?

Sunday, April 2, 2017

तर साई माफ करणार नाही.............. नवा काळ सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे अप्रतिम व सर्वांचे डोळे उघडणारा अग्रलेख

तर साई माफ करणार नाही..............

रविवार , २ एप्रिल, २०१७ च्या " नवा काळ " या वृत्त पत्रातील सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांचा एक अप्रतिम व सर्वांचे डोळे उघडणारा अग्रलेख " तर साई माफ करणार नाही.............. " येथे देत आहे.


शिर्डी येथील श्रीसाईबाबा समाधीला २०१८ साली १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी २०१८ साली जागतिक दर्जाचा उत्सव व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकारने शताब्दी महोत्सवासाठी ३०००कोटींचा निधी मंजूर केला पण ज्या श्री साई्ंच्या समाधी शताब्दी महोत्सवासाठी हे ३००० कोटी रू सरकार खर्च करणार आहे त्या श्री साईंना हे आवडेल का? त्यांना आनंद वाटेल का?
श्री साईंचे संपूर्ण आयुष्य फाटके कपडे आणि पोटापुरते अन्न यात गेले. निरपेक्ष समाजसेवा करणारे ते कर्मयोगी होते. फाटके कपडे आणि डोईवर कफन बांधून ते आले आणि त्याच स्थितीत गेले शेवटपर्यंत पोटापूरते अन्न यापलीकडे त्यांनी काहीच साठवले नाही. दुःखी, पिडीत समाजाला मार्ग दाखवायचा आणि मदत करायची हे त्यांच्या जीवनाचे सार होते. आजच्या युगात अशी व्यक्तीमत्वे घडतील यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. म्हणूनच त्यांनी समाधी घेऊन १०० वर्षे झाल्यावरही आपण त्यांची आठवण काढतो. आजही दुःखात, संकटात आणि आनंदातही शिर्डीची वारी होते.
अशा श्री साईंच्या समाधी सोहळ्यावर ३००० कोटी रु. खर्च केले जाणार आहेेत.हे ऐकून साईंना काय वाटले असावे? त्यांना दुःख झाले असेल, ते मम्हणत असतील की, माझ्या कार्यातून मी जो संदेश दिला तो माझ्या भक्तांना कळलाच नाही. मी सेवेचे व्रत घेतले आणि माझे भक्त संपत्तीचा आरास बांधतात. कशासाठी? कुणासाठी? मला मोगऱ्याची फुले आवडतील, भाकरी-भाजी ने मी समाधानी होईन, माझ्या भक्तांनी कोणाचे अश्रू पुसले तर मी शांतपणे झोपेन पण माझ्या भक्तांनी मला सोन्याने मढवून ठेवले ज्या सोन्याला मी मातीसमान मानले, त्याच सोन्याच्या सिंहासनावर मला बसवले, आता माझ्या समाधी सोहळ्यावर ३००० कोटी ते खर्च करणार? जागतिक महोत्सव करणार, अशा महोत्सवातून त्यागाचा आणि सेवेचे संदेश जाऊ शकतो का? माझ्या प्रतिमेपुढे जग झुकते, भरभरून दान देते. मात्र मला आनंद वाटत नाही. कारण हे सर्वजण माझे संदेश, माझे कार्यच विसरून गेले आहेत. मी माझ्या आयुष्यात कधी सोन्याची चैन काढून दाखवली नाही. फक्त धीर दिला. पाठीवर हात ठेवला आणि दुःख दुर करण्याचा प्रयत्न केला. पण माझे भक्त म्हणविणारी ही माणसे, चुकीच्या मार्गाने चालली आहेत.
महाराष्ट्राचे सरकार कर्जबाजारी आहे, त्यांच्याकडे शेतमालाला हमीभाव देण्यासाठी पैसे नाहीत, तुर डाळ साठवायला पारदाने आणण्यासाठी पैेसे नाहीत, शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत द्यायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने आम्ही थाटात लावून देतो असे हे सरकरा म्हणत नाही. रोज एक शेतकरी आत्महत्या करतो आहे. तरूण शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केलेला शेतकरी जीव देतो आहे. कितीसे कर्ज असते त्यांचे? पन्नास हजार, एक लाख, नाहीतर दोन लाख इतकेच कर्ज असते. पण तेही फेडू शकत नाहीत. म्हणून आत्मह्त्या करू लागले आहेत. सरकारने विद्यार्थ्यांची फी माफ केली पण त्यांच्या पोटात दोन घास अन्न जात नाही, त्याचे काय? आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार कोण देईल? त्या माऊलीचे अश्रू कोण पुसेल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. यावर्षी दुष्काळ पडणार असे भाकीत आहे. तसे झाले तर हाहाकार माजेल.
शेतकऱ्यांना मदत केली तर आर्थिक शिस्त बिघडते असे मुख्यमंत्री म्हणतात. मग शेतकऱ्यांना मरायला सोडून श्री साई समाधी उत्सवावर ३००० कोटी मंजूर केेले तेव्हा आपण श्री साईंच्या कार्याचा अपमान करतो आहोत असे वाटले नाही का? समाधी सोहळ्यासाठी तीन हजार तेवीस कोटी सरकार देणार आहे. त्यातील एक हजार सत्तावन्न कोटी दर्शन रांगा उभारण्यासाठी एकशे एकेचाळीस कोटी तारांगण आणि मेणाच्या मूर्तीच्या संग्रहालयासाठी, बहात्तर कोटी लेजर शो साठी, सत्तावीस कोटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आणि एकोणसाठी कोटी वाढीव पाणीपुरवण्यावर पहिल्या टप्प्प्यात खर्च होणार आहेत. या इतक्या रकमेत शेतडो शेतकरी कुटुंबिय कुटुंब वाचतील शेतकऱ्यांना वाचवायला पैस नाही, आणि तारांगण, म्यूझीेअम, लेजर शोवर उधळायला सरकारवर पैसा आहे. विमानतळासाठी पैसा आहे पण अनाथ झालेल्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी पैसा नाही.
श्री साईंचा समाधी शताब्दी सोहळा अत्यंत साधेपणाने व मनोभावाने साजरा झाला पाहीजे. एक हजार शेतकरी कुटूंबाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू या महोत्सवात दिसले पाहीजे. शेतकऱ्यांच्या मालासाठी ममुंबईच्या मध्यभागी मोठे मार्केट बांधून त्या मार्केटचे उद्धाटन या महोत्सवात झाले पाहिजे. हुंडा देता येत नाही. म्हणून लग्न थांबलेल्या आपल्या लेकींचे सामुहिक विवाह या महोत्सवाच्या दर दिवशी थाटात झाले पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांची फी सरकारने माफ केली या मुलांचा वर्षभराचा हॉस्टेलचा खर्च आणि जेवणाचा खर्च भरून त्यांच्या पावत्य साईचरणी अर्पण करून हा महोत्सव झाला पाहिजे. श्रमदान झाले पाहिजे. बी-बियाणे खतांंचे मोफत वाटत दर दिवशी झाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना हा सोहळा जाहितक दर्जाचा करायचा आहे ना? मग श्री साईंचा संदेश अशा समाजोपयोगी कामांनी पोहोचवा तर जगात वाह वा तर होईलच, पण श्री साईंनी सांगितलेला मार्ग जगभरात पोहोचेल. लेजर शो आणि म्यूझीअम ने जे घडू शकत नाही ते सामाजिक उपक्रमांनी घडेल.
हिंदूंच्या उत्सवांवर फक्त टिका करता असे काही जण म्हणतील, होय, आम्ही टिका केली. जे जे अनिष्ठ आणि अयोग्य असते त्यावर आवाज उठवायचा हे हिंदू धर्माने शिकविले आहेे, त्यातूनच हिंदू धर्म समृद्ध होत गेला. आणि होत जाईल. शेतकरी मदतीविणा मरतो आहे, आणि श्री साईंसमोर ७२ कोटींचा लेजर शो सुरू आहे हे होऊ नये. तीन हजार कोटी रू. अनेकांचे जीव वाचवूू शकतात. पण जीव न वाचवता ही रक्कम झगमगाटासाठी उधळलीत तर साई माफ करणार नाहीत............

फेसबुक वरील १ एप्रिल ( एप्रिल फुल ) च्या पोस्ट - एक सदमा

नमस्कार , 

" फेसबुक वरील १ एप्रिल ( एप्रिल  फुल ) च्या पोस्ट - एक सदमा " 

आपल्यापैकी अनेकांनी श्रीदेवी , कमल हसन यांच्या उत्कृष्ट अभिनयाने गाजलेला " सदमा " हा हिंदी चित्रपट पाहिला असेल . ( हा चित्रपट ८ जुलै, १९८३ रोजी प्रदर्शित < आजच्या शुद्ध मराठीत RELEASE > ) झाला होता .

तुम्ही म्हणाल कि त्या चित्रपटाचा आणि वर लिहिलेल्या विषयाचा काय संबंध ? सांगतो , व्यवस्थित सांगतो . 

" सदमा " या चित्रपटातील भूमिकेत श्रीदेवी फक्त वयाने मोठ्ठी झालेली असते , पण तिचे वागणे , बोलणे , विचार हे लहान बाळासारखे असतात . जणू काही असाच भास मला काल , म्हणजे शनिवार , १ एप्रिल , २०१७ ( एप्रिल  फुल ) च्या फेसबुक वरील अनेक  पोस्ट वाचून झाला . फेसबुक वरील अनेक व्यक्ती ( वयोगट १८ ते ८० , पुरुष व स्त्रिया दोघेही , शिक्षित , अति शिक्षित , वार्ताहर ,डॉक्टर , शिक्षक , विद्यार्थी . . . . . . . . .) ज्यांच्या  PROFILE PICTURE मध्ये मला सदमा मधील श्रीदेवी दिसत होती. 

माझं ठाम मतं आहे कि भारत या देशात फेसबुक चा वापर योग्य प्रकारे होत नाही. 

खरं तर समाज प्रभोधनासाठी फेसबुक चा योग्य वापर होण्याची नितांत गरज आहे.