Sunday, December 11, 2016

" दक्ष नागरिक " पुरस्कार - जागर गौरव सोहळा- २०१६ - " जागर फाउंडेशन "

नमस्कार , सुंदर दुपार

" दक्ष नागरिक " पुरस्कार 

" ठाणे " शहरातील " जागर फाउंडेशन " नावाच्या , अंदाजे  १२ वर्षांपूर्वी , वयाच्या पस्तिशीत असलेल्या काही ध्येय वेड्या तरुणांनी नोकरी , धंदा सांभाळून सुरु केलेल्या संस्थेच्या ( NGO ) ने आयोजित केलेल्या   जागर गौरव सोहळा- २०१६ " या कार्यक्रमात  मला " दक्ष नागरिक "  पुरस्कार मिळाला.  दर दोन वर्षांनी हा जागर गौरव सोहळा आयोजित केला जातो . 

माझे सुदैव म्हणजे ज्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो त्या समाजकारणी , सुशिक्षित , सुसंस्कृत गुरुतुल्य अश्या आमदार श्री ..संजय  केळकर जी यांच्या हस्ते  मला हा पुरस्कार मिळाला.  

अजून एक दुग्ध शर्करा योग्य म्हणजे ज्यांच्या कडून समाजसेवेचे धडे घेतले , अश्या ८४ वर्षांच्या तरुण गुरुतुल्य असे श्री. भाऊ नानिवडेकर - संस्थापक सदस्य - विद्यादान सहाय्यक मंडळ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते

या कार्यक्रमात व्यासपीठावर खालील माननीय व्यक्तींची उपस्थिती होती
प्रा. डाॅ. श्री. नरेंद्र पाठक - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त
श्री. राजेंद्र साप्ते ( उप महापौर, ठाणे महानगरपालिका ),  
श्री. सुरेश सोंडकरसंस्थापक सदस्य - जागर फाउंडेशन
श्री. विनोद पितळेजागर फाउंडेशन 
या ."  जागर गौरव सोहळा- २०१६ " कार्यक्रमाची सुरुवात सांगता माझे लाडके  गायक श्री. रवींद्र साठे यांच्या " स्वर पुष्पांजली "  या एका अप्रतिम श्रवणीय अश्या सुमधुर अवीट अश्या गाण्यांच्या कार्यक्रमाने  झाली. त्यांच्या सोबत साथ द्यायला पेटीवर सुप्रसिद्ध अशी व्यक्ती श्री. आप्पा वढावकर हे होते

एकूणच कार्यक्रम फारच चांगला झाला

एक सांगावेसे वाटते , मी जे काही थोडंसं लढत असतो , ते  पुरस्कारांसाठी नसतं , पण अश्या -राजकीय कार्यक्रमात पुरस्कार मिळाल्यावर अजून कामं करायला स्फूर्ती मिळते

या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सोबत देत आहे

ता. . : " जागर फाउंडेशन " बद्दल लवकरच लिहीन







No comments:

Post a Comment