Sunday, December 11, 2016

" भारत " देशातील प्राण्यांवरील अन्याय

नमस्कार ,
" भारत " देशातील प्राण्यांवरील अन्याय "
भारतातील प्राणी मित्र, प्राणी संघटना काय करताहेत हेच कळत नाही .
दिवसा ढवळ्या " उंदीर " नावाच्या प्राण्याला ठार मारण्यासाठी प्रत्येक उंदीरामागे रुपये १८=०० , उंदीर मारणाऱ्यांना मुंबई महानगर पालिका देणार अशी बातमी ८. १२. २०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रामध्ये छापून आली आहे. कारण काय तर म्हणे उंदिरांमुळे लेप्टोस्पारोसीस ची साथ पसरते व अनेक मानव प्राणी दगावतात . या एका साध्या सुध्या व छोट्याश्या कारणासाठी गणपतीचे वाहन असणाऱ्या मूषकाला ( उंदराला ) जिवंतपणी ठार मारायचे ? किती हे अमानुष कृत्य ? कोठे गेले आत्ता प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना ?
आता एक विरोधाभास पहा , या सोबत " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रातील " भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टो चे आव्हान " असा मथळा असलेली एक बातमी देत आहे. यात असे लिहिले आहे कि " भटक्या कुत्र्यांमध्ये लेप्टो स्पायराचे विषाणू आढलल्याने मुंबई समोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे ". पण गम्मत पहा भटक्या कुत्र्यांना ठार नाही मारले जाणार . मग त्या बिचाऱ्या उंदरांना ( मूषकांना ) का ठार मारायचे ?
वर्तमान पत्रात , दूरचित्रवाणीवर देखील उंदीर ठार मारणाऱ्या ( विषारी ) वडीची जोरदार पणे जाहिरात चालू असते. हे असे का ? त्या बिचाऱ्या , मुक्या उंदरांना ठार मारण्यासाठी असे विषारी औषध ( वडी ) देणे हे योग्य आहे का ?
फक्त उंदीर ( मूषक ) नावाच्या प्राण्यावरच अन्याय होतो असे नाही , पण खालील प्राण्यांवर देखील अन्याय होतो .
- डास : प्रत्येक पंचायत , ग्राम पंचायत , पालिका , महानगरपालिका हि डासांची अक्षरशः हत्या करीत असते . त्याचप्रमाणे वर्तमान पत्रात , दूरचित्रवाणीवर , डास मारणाऱ्या फवारणी डबीची ( SPRAY ) ची जोरदार पणे जाहिरात चालू असते . हि डासांची हत्या का ? फक्त त्यांच्या मुळे मलेरिया , डेंग्यूने इत्यादी सारखे रोग मानव प्राण्याला होतात म्हणून ? अहो , पाण्याचे डबके हे मानव निर्मितीच असतात ना ? मग त्यात बिचाऱ्या डासांचा काय दोष ?
- झुरळे - वर्तमान पत्रात , दूरचित्रवाणीवर , झुरळे मारणाऱ्या फवारणी डबीची ( SPRAY ) ची जोरदार पणे जाहिरात चालू असते . असं काय त्या झुरळांनी ( मुक्या प्राण्यांनी ) मानव प्राण्यांचे असे काय घोडे मारले , म्हणून त्यांना जिवंतपणी ठार मारायचे ?
- कोंबडी , बकरी , विविध प्रकारचे मासे , खेकडे , बदक इत्यादी : या प्राण्यांचे मांस खाण्यासाठी ( NON VEG ) मानव प्राणी त्यांना जिवंतपणी मारून खातो . हे तुम्हाला योग्य वाटते ?
अहो भारतातील काही ठिकाणी कुत्र्याचं मांस खाल्लं जाते , तरीही भटक्या कुत्र्यांना मारायला बंदी , पण कोंबडी , बकरी , विविध प्रकारचे मासे , खेकडे , बदक इत्यादींची मांस खाण्यासाठी जिवंतपणे हत्या केली जाते. हे तुम्हाला योग्य वाटते ?
- कबुतर : कबुतरांमुळे मानव प्राण्यांना घातकी असा श्वसन रोग होतो , तरीही अनेक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अनेक किलो धान्य खाऊ घातले जाते ?
हे असे का ? कुत्रा , व कबुतर या फक्त दोन प्राणी व पक्षी यांना वेगळा न्याय का ?
भारत या देशात सगळे नियम सर्वांना सम समान नाही का ?
कोठे गेले आत्ता प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना ?
त्या उंदीर , डास , झुरळ , कोंबडी , बकरी , विविध प्रकारचे मासे , खेकडे , बदक इत्यादी यांची हत्या होऊ नये म्हणून का नाही आंदोलने करत ? का नाही न्यायालयात जात ?
हा बाकी इतर प्राण्यांवर फार मोठ्ठा अन्याय नाही का ?



No comments:

Post a Comment