Tuesday, December 13, 2016

विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्याचा 10 जणांना चावा

विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्याचा 10 जणांना चावा

( हि बातमी , छायाचित्रे ( LNN LOCAL NEWS NETWORK ) वरून घेतले आहे )


कल्याण दि.13 डिसेंबर :
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 10।जण जखमी झाले असून त्यात 8 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास उल्हासनगर 4 व उल्हासनगर 3 मधील चार जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न करताच या कुत्र्याने घाबरून कल्याणच्या दिशेने पळ काढला. त्याचदिवशी संध्याकाळी विठ्ठलवाडी परिसरातील साई कॉलनीत 7 ते 10 वर्षांची मुले घराबाहेर खेळत असताना अचानक हा कुत्रा तिथे आला आणि त्याने या मुलांच्या मांडी आणि हाताचा चावा घेतला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलांनी आरडा ओरड सुरु करताच या कुत्र्याने तेथून पळ काढला.
ईश्वर रूपे (वय १०वर्षे), हर्षदा चव्हाण (वय१० वर्षे), विनोद गवई (वय १०वर्षे), साईनाथ (वय१० वर्षे), नेहा चौहान (वय १०वर्षे), सुमित निषाद (वय १२वर्षे), बबलू सोनी (वय ७वर्षे), प्रेम मंगल (वय १८ वर्षे), अंजली सिंग वय १०वर्षे), महेंद्र कुंवर (वय २६ वर्षे) आणि यश सोनवणे (वय ५वर्षे) अशी या मुलाची नावे आहेत. या सर्वांना इम्युनोग्लोबीन आणि रेबीजची लस देण्यात आली असून त्यातील ५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर उर्वरित ५ जणांच्या जखमा खोल असल्याने त्यांना आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार असल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.

तसेच या कुत्र्याने आणखी 3 मुलांनाही चावा घेतला असून त्यापैकी दोघांच्या डोक्याचा चावा घेतल्याची प्राथमिक माहिती रुग्णालयातील जखमी मुलांनी दिली. मात्र या मुलांची नावे समजू शकली नाहीत.





No comments:

Post a Comment