Monday, December 19, 2016

रोज आठ जणांना श्वान दंश - २०. ०९. २०१४ रोजी " ठाणे वैभव " या वृत्तपत्रात आलेली बातमी

नमस्कार ,

" रोज आठ जणांना श्वान दंश "

अहो हि २०. ०९. २०१४ रोजी " ठाणे वैभव " या वृत्तपत्रात आलेली बातमी आहे.

हि आकडेवारी , खरं चित्र दर्शवत नाही कारण यात सगळ्या शासकीय रुग्णालयातील माहिती नाही , त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालये , खाजगी डॉक्टर यांच्याकडे उपचार घेणारे यांची नोंद नाही.

सन २०१३ ते २०१४ या कालावधीत ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत दररोज अंदाजे २५ ते ३० मानव प्राण्यांना श्वान दंश होत होता.

अनधिकृत माहितीनुसार , ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत दररोज अंदाजे ५५ ते ६० मानव प्राण्यांना श्वान दंश होत आहे.

त्यात भर म्हणजे , गेल्या दहा महिन्यात ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत एकही भटक्या कुत्र्याची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली नाही.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet
 
 


 

भटक्या कुत्र्याचा मुलाला चावा , वर्षभरात चार हजार जणांना श्वानदंश , अंबरनाथमध्ये कुत्रा चावल्याने मुलगा जखमी

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,
" भटक्या कुत्र्याचा मुलाला चावा " - महाराष्ट्र टाईम्स - १९. १२. २०१६
" वर्षभरात चार हजार जणांना श्वानदंश " - महाराष्ट्र टाईम्स - १९. १२. २०१६
" अंबरनाथमध्ये कुत्रा चावल्याने मुलगा जखमी " -  नवा काळ -  १९. १२. २०१६
अश्या तीन वेगवेगळ्या मथळ्याखाली आजच्या . म्हणजे , सोमवार , १९. १२. २०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " व " नवा काळ " या वृत्तपत्रातील वेग वेगळ्या बातम्या येथे देत आहे.
हे असे फक्त काही अंबरनाथ येथेच घडत नाही , तर "महाराष्ट्" राज्यात , त्याचप्रमाणे "भारत" देशात अनेकांना दररोज श्वान दंश होतो.
जरा खालील माहिती वाचा "

- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७० व्यक्तींना श्वान दंश होतो.
- त्याचप्रमाणे भारत देशात दररोज अंदाजे १,४१,९६०  व्यक्तींना श्वान दंश होतो.
- मुंबई मध्ये १९९४ ते नोव्हेंबर , २०१५ पर्यंत , १३ लाख ७० हजार ४७७ जणांना श्वान दंश झाला आहे. त्या मध्ये कुत्रा चावल्याने झालेल्या रेबीज रोगाने ४३४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
- प्राण्यांच्या दंशाची तीव्रता ( फोर्से ) : PSI (Pound per Square Inch).मध्ये मोजतात. 
प्रौढ माणसाच्या चावण्याची तीव्रता १५० PSI असते.
पण कुत्रा या प्राण्याच्या दंशाची तीव्रता ५५६  PSI एवढी असते . म्हणजेच अंदाजे माणसाच्या पेक्ष्या ४ पतीने जास्त असते.
- गेल्या १० महिन्यात ठाणे महानगर पालिका हद्दीत एकाही भटक्या कुत्र्याची निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झालेली नाही. थोड्या फार प्रमाणात ,

काय म्हणता , तुम्हाला , तुमच्या मुलांना , तुमच्या घरच्यांना , तुमच्या आप्तेष्टांना श्वान दंश होईपर्यंत तुम्ही या गंभीर प्रश्नावर गप्प बसणार आहात.

मी एवढाच म्हणू शकेल

नागरिक गप्प
        शासन ठप्प

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet




Wednesday, December 14, 2016

१२ मुलांना कुत्र्याचा चावा - 12 cases of stray dog bite

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" १२ मुलांना कुत्र्याचा चावा "

दिनांक १४.१२.२०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रातील हि अंगावर शहारे आणणारी बातमी !


Tuesday, December 13, 2016

विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्याचा 10 जणांना चावा

विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्याचा 10 जणांना चावा

( हि बातमी , छायाचित्रे ( LNN LOCAL NEWS NETWORK ) वरून घेतले आहे )


कल्याण दि.13 डिसेंबर :
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 10।जण जखमी झाले असून त्यात 8 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास उल्हासनगर 4 व उल्हासनगर 3 मधील चार जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न करताच या कुत्र्याने घाबरून कल्याणच्या दिशेने पळ काढला. त्याचदिवशी संध्याकाळी विठ्ठलवाडी परिसरातील साई कॉलनीत 7 ते 10 वर्षांची मुले घराबाहेर खेळत असताना अचानक हा कुत्रा तिथे आला आणि त्याने या मुलांच्या मांडी आणि हाताचा चावा घेतला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलांनी आरडा ओरड सुरु करताच या कुत्र्याने तेथून पळ काढला.
ईश्वर रूपे (वय १०वर्षे), हर्षदा चव्हाण (वय१० वर्षे), विनोद गवई (वय १०वर्षे), साईनाथ (वय१० वर्षे), नेहा चौहान (वय १०वर्षे), सुमित निषाद (वय १२वर्षे), बबलू सोनी (वय ७वर्षे), प्रेम मंगल (वय १८ वर्षे), अंजली सिंग वय १०वर्षे), महेंद्र कुंवर (वय २६ वर्षे) आणि यश सोनवणे (वय ५वर्षे) अशी या मुलाची नावे आहेत. या सर्वांना इम्युनोग्लोबीन आणि रेबीजची लस देण्यात आली असून त्यातील ५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर उर्वरित ५ जणांच्या जखमा खोल असल्याने त्यांना आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार असल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.

तसेच या कुत्र्याने आणखी 3 मुलांनाही चावा घेतला असून त्यापैकी दोघांच्या डोक्याचा चावा घेतल्याची प्राथमिक माहिती रुग्णालयातील जखमी मुलांनी दिली. मात्र या मुलांची नावे समजू शकली नाहीत.





" घणसोलीवासीयांना कुत्र्यांची दहशत "

नमस्कार ,

" घणसोलीवासीयांना कुत्र्यांची दहशत "

आठवडाभरात १२ नागरिकांना श्वान दंशाचा फटका

१२. १२. २०१६ च्या " सकाळ " या वृत्तपत्राच्या नवी मुंबई TODAY या पुरावणी मधील प्रथम पृष्ठावरील बातमी येथे देत आहे.

हि बातमी आपण http://epaper4.esakal.com/…/Mumbai/NaviMumbaiToday/index.htm या LINK वर वाचू शकता.

Sunday, December 11, 2016

जागर गौरव सोहळा- २०१६ - " जागर फाउंडेशन "

नमस्कार ,  

दिनांक ११. १२. २०१६ च्या " पुढारी " या वृत्तपत्रातील  शनिवार , १०. १२. २०१६ रोजी गडकरी रंगायतन मध्ये पार पडलेल्या ठाणे " शहरातील " जागर फाउंडेशन " नावाच्या  NGO  ने आयोजित केलेल्या " जागर गौरव सोहळा२०१६ " बद्दलची छापून आलेली बातमी येथे देत आहे. 

या कार्यक्रमात  मला " दक्ष नागरिक "  पुरस्कार मिळाला..  


" दक्ष नागरिक " पुरस्कार - जागर गौरव सोहळा- २०१६ - " जागर फाउंडेशन "

नमस्कार , सुंदर दुपार

" दक्ष नागरिक " पुरस्कार 

" ठाणे " शहरातील " जागर फाउंडेशन " नावाच्या , अंदाजे  १२ वर्षांपूर्वी , वयाच्या पस्तिशीत असलेल्या काही ध्येय वेड्या तरुणांनी नोकरी , धंदा सांभाळून सुरु केलेल्या संस्थेच्या ( NGO ) ने आयोजित केलेल्या   जागर गौरव सोहळा- २०१६ " या कार्यक्रमात  मला " दक्ष नागरिक "  पुरस्कार मिळाला.  दर दोन वर्षांनी हा जागर गौरव सोहळा आयोजित केला जातो . 

माझे सुदैव म्हणजे ज्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो त्या समाजकारणी , सुशिक्षित , सुसंस्कृत गुरुतुल्य अश्या आमदार श्री ..संजय  केळकर जी यांच्या हस्ते  मला हा पुरस्कार मिळाला.  

अजून एक दुग्ध शर्करा योग्य म्हणजे ज्यांच्या कडून समाजसेवेचे धडे घेतले , अश्या ८४ वर्षांच्या तरुण गुरुतुल्य असे श्री. भाऊ नानिवडेकर - संस्थापक सदस्य - विद्यादान सहाय्यक मंडळ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते

या कार्यक्रमात व्यासपीठावर खालील माननीय व्यक्तींची उपस्थिती होती
प्रा. डाॅ. श्री. नरेंद्र पाठक - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त
श्री. राजेंद्र साप्ते ( उप महापौर, ठाणे महानगरपालिका ),  
श्री. सुरेश सोंडकरसंस्थापक सदस्य - जागर फाउंडेशन
श्री. विनोद पितळेजागर फाउंडेशन 
या ."  जागर गौरव सोहळा- २०१६ " कार्यक्रमाची सुरुवात सांगता माझे लाडके  गायक श्री. रवींद्र साठे यांच्या " स्वर पुष्पांजली "  या एका अप्रतिम श्रवणीय अश्या सुमधुर अवीट अश्या गाण्यांच्या कार्यक्रमाने  झाली. त्यांच्या सोबत साथ द्यायला पेटीवर सुप्रसिद्ध अशी व्यक्ती श्री. आप्पा वढावकर हे होते

एकूणच कार्यक्रम फारच चांगला झाला

एक सांगावेसे वाटते , मी जे काही थोडंसं लढत असतो , ते  पुरस्कारांसाठी नसतं , पण अश्या -राजकीय कार्यक्रमात पुरस्कार मिळाल्यावर अजून कामं करायला स्फूर्ती मिळते

या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सोबत देत आहे

ता. . : " जागर फाउंडेशन " बद्दल लवकरच लिहीन







" भारत " देशातील प्राण्यांवरील अन्याय

नमस्कार ,
" भारत " देशातील प्राण्यांवरील अन्याय "
भारतातील प्राणी मित्र, प्राणी संघटना काय करताहेत हेच कळत नाही .
दिवसा ढवळ्या " उंदीर " नावाच्या प्राण्याला ठार मारण्यासाठी प्रत्येक उंदीरामागे रुपये १८=०० , उंदीर मारणाऱ्यांना मुंबई महानगर पालिका देणार अशी बातमी ८. १२. २०१६ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रामध्ये छापून आली आहे. कारण काय तर म्हणे उंदिरांमुळे लेप्टोस्पारोसीस ची साथ पसरते व अनेक मानव प्राणी दगावतात . या एका साध्या सुध्या व छोट्याश्या कारणासाठी गणपतीचे वाहन असणाऱ्या मूषकाला ( उंदराला ) जिवंतपणी ठार मारायचे ? किती हे अमानुष कृत्य ? कोठे गेले आत्ता प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना ?
आता एक विरोधाभास पहा , या सोबत " महाराष्ट्र टाईम्स " या वृत्त पत्रातील " भटक्या कुत्र्यांमुळे लेप्टो चे आव्हान " असा मथळा असलेली एक बातमी देत आहे. यात असे लिहिले आहे कि " भटक्या कुत्र्यांमध्ये लेप्टो स्पायराचे विषाणू आढलल्याने मुंबई समोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे ". पण गम्मत पहा भटक्या कुत्र्यांना ठार नाही मारले जाणार . मग त्या बिचाऱ्या उंदरांना ( मूषकांना ) का ठार मारायचे ?
वर्तमान पत्रात , दूरचित्रवाणीवर देखील उंदीर ठार मारणाऱ्या ( विषारी ) वडीची जोरदार पणे जाहिरात चालू असते. हे असे का ? त्या बिचाऱ्या , मुक्या उंदरांना ठार मारण्यासाठी असे विषारी औषध ( वडी ) देणे हे योग्य आहे का ?
फक्त उंदीर ( मूषक ) नावाच्या प्राण्यावरच अन्याय होतो असे नाही , पण खालील प्राण्यांवर देखील अन्याय होतो .
- डास : प्रत्येक पंचायत , ग्राम पंचायत , पालिका , महानगरपालिका हि डासांची अक्षरशः हत्या करीत असते . त्याचप्रमाणे वर्तमान पत्रात , दूरचित्रवाणीवर , डास मारणाऱ्या फवारणी डबीची ( SPRAY ) ची जोरदार पणे जाहिरात चालू असते . हि डासांची हत्या का ? फक्त त्यांच्या मुळे मलेरिया , डेंग्यूने इत्यादी सारखे रोग मानव प्राण्याला होतात म्हणून ? अहो , पाण्याचे डबके हे मानव निर्मितीच असतात ना ? मग त्यात बिचाऱ्या डासांचा काय दोष ?
- झुरळे - वर्तमान पत्रात , दूरचित्रवाणीवर , झुरळे मारणाऱ्या फवारणी डबीची ( SPRAY ) ची जोरदार पणे जाहिरात चालू असते . असं काय त्या झुरळांनी ( मुक्या प्राण्यांनी ) मानव प्राण्यांचे असे काय घोडे मारले , म्हणून त्यांना जिवंतपणी ठार मारायचे ?
- कोंबडी , बकरी , विविध प्रकारचे मासे , खेकडे , बदक इत्यादी : या प्राण्यांचे मांस खाण्यासाठी ( NON VEG ) मानव प्राणी त्यांना जिवंतपणी मारून खातो . हे तुम्हाला योग्य वाटते ?
अहो भारतातील काही ठिकाणी कुत्र्याचं मांस खाल्लं जाते , तरीही भटक्या कुत्र्यांना मारायला बंदी , पण कोंबडी , बकरी , विविध प्रकारचे मासे , खेकडे , बदक इत्यादींची मांस खाण्यासाठी जिवंतपणे हत्या केली जाते. हे तुम्हाला योग्य वाटते ?
- कबुतर : कबुतरांमुळे मानव प्राण्यांना घातकी असा श्वसन रोग होतो , तरीही अनेक सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अनेक किलो धान्य खाऊ घातले जाते ?
हे असे का ? कुत्रा , व कबुतर या फक्त दोन प्राणी व पक्षी यांना वेगळा न्याय का ?
भारत या देशात सगळे नियम सर्वांना सम समान नाही का ?
कोठे गेले आत्ता प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना ?
त्या उंदीर , डास , झुरळ , कोंबडी , बकरी , विविध प्रकारचे मासे , खेकडे , बदक इत्यादी यांची हत्या होऊ नये म्हणून का नाही आंदोलने करत ? का नाही न्यायालयात जात ?
हा बाकी इतर प्राण्यांवर फार मोठ्ठा अन्याय नाही का ?



Friday, December 9, 2016

कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा

नमस्कार , सुंदर सकाळ ,

" कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा "

अहो हे मी काही माझ्या मनाचे सांगत नाही . हि तर भविष्यातील घटनांची आहे .

हि बातमी ८. १२. २०१६ च्या " लोकमत " वृत्तपत्रातील " हॅलो ठाणे " पुरवणीमध्ये छापून आली आहे.

कुत्रेच कुत्रेच
चोहीकडे
श्वान दंश
सगळीकडे

कुत्र्यांची विष्ठा
चोहीकडे
भुंकण्याने झोपमोड
सगळीकडे

नागरिक चुप्प
चोहीकडे
शासन ठप्प
सगळीकडे


ता. क . : हा काव्यप्रकार मी स्वतः लिहिला आहे. याची चोरी करून स्वतःच्या नावावर खपविणे हा एक अतिशय गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार आहे. 
 
 

Sunday, November 27, 2016

भविष्यातील भारत

नमस्कार , सुंदर संध्याकाळ ,

" भविष्यातील भारत "

आपल्याला माहीतच असेल कि " भारत " या देशात भटक्या कुत्र्यांची संख्या भयावह अश्या वेगाने वाढत आहे.
२२. ११. २०१६ च्या " लोकमत " या वृत्त पत्रातील " नागपूर " पुरवणी मधील हि बातमी वाचा .

दुर्दैवाची गोष्ट आहे कि " भारत " या देशातील बहुसंख्य नगरपालिका , महानगर पालिका यांच्याकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण योग्य प्रमाणात योग्य प्रमाणे होत नाही .

जर असेच दुर्लक्ष्य " भटक्या कुत्र्यांच्या भयावह अश्या वेगाने वाढणाऱ्या संन्ख्येवर" झाले तर भविष्यात भारत या देशात असे दृश्य दिसू शकेल.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet