Sunday, September 27, 2015

Fight of A COMMON MAN

नमस्कार आणि सुंदर संध्याकाळ ,

या सोबत १९ सप्टेंबर , २०१५ चा व २७ सप्टेंबर , २०१५ चा HINDUSTAN TIMES या इंग्रजी वर्तमान पत्रातील मेघ पोळ हिने लिहिलेल्या बातम्या जोडत आहे. या प्रश्नावर मी १७  सप्टेंबर , २०१५ ला रात्री १०.०३ वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ई मेल ( छायाचित्रे पाठवून कळविले होते ). माझे प्रामाणिक मत आहे कि  भारतीय  नागरिकाने फक्त " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक व्हावे " व आपल्या हक्कांसाठी स्वतःच लढावे.
आणि कृपया मी का हे करू असे बिलकुल म्हणू नकात .  करा आणि बघा . केल्याने होत आहे रे आधी स्वतः ( दुसऱ्याने नाही )  केलेची पाहिजे. अजून एक - फक्त " प्रतिक्रिया "  न देता " क्रिया " करावे अशी माझी नम्र विनंती आहे.  

कृपया विसरू नकात कि हे सगळे भारत देशातील आदरणीय, वंदनीय , पूजनीय , माननीय व मोठ मोठ्या फलकांवर ( HOARDINGS ) वर झळकणारे , रस्ते अडवून सण साजरा करणारे यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष्य द्यायला वेळ नसतो.

या बातम्या दिल्याबद्दल मी मेघा पोळ हिचे  मनापासून आभार मानतो. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले कि लेखणी मध्ये खूप ताकद  आहे आणि माझ्या सारखा एक आती सामान्य नागरिक हि असे थोडे फार बदल घडवून  आणू शकतो..

Hello & Good Evening ,

Please read these 2  news article , published in Hindustan Times ( H.T.) dt. 19th Sept. 2015 & 27th Sept. 2015. First of all I am very much Thankful  to Ms. Megha Pol from H.T. for raising this issue on 19th Sept. 2015.

I had written about this with photographs to the Chief Minister of Maharashtra State on 17th Sept. 2015 @ 22.03 hrs.

It is my request to all INDIAN CITIZENS not to remain only “ CITIZEN “ , but to become “AN ALERT CITIZEN”.

Once again it has proved that efforts of A COMMON MAN like me pays off in such kind of social issues and also MEDIA plays crucial role in COMMON MAN's FIGHTS.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Monday, September 21, 2015

" आपले पोलिस " " वाहतूक पोलिस मित्र "

नमस्कार ,
आज ५ दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन आहे. नुकतेच दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरळीत पार पडले.
आपण सगळे कबूल कराल कि अश्या प्रकारच्या सणात आपले पोलिस बंधू आणि भगिनी त्याच प्रमाणे वाहतूक पोलिस बंधू आणि भगिनी अक्षरशः अहोरात्र कामे करून सगळे सण सुरळीत पाने पार पाडण्यासाठी प्रयत्न शील असतात. अश्या वेळी त्यांना त्यांची तहान, भूख हि वीसरावी लागते.
आपलं जर त्याना या बद्दल तोंडी धन्यवाद दिले, एखादी पिण्याच्या पाण्याची बाटली दिली, तर पहा त्यांच्या चेहऱ्यावर कशी व किती ख़ुशी फुलते. माझ्या मते आपण एवढे जरूर करू शकतो. त्याच प्रमाणे नियमाने वागून त्यांना शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करू शकतो.
त्यांचे हे कष्ट मी या दोनही कवितेन्मध्ये व्यक्त केले आहेत. दोनीही कविता " दक्षता " या महाराष्ट्र पोलिस पोलिसांच्या मासिकांमध्ये छापून आल्या आहेत.



Monday, September 14, 2015

कविता - " वाहतूक पोलिस मित्र "



" वाहतूक पोलिस मित्र "

नमस्कार  ,

या सोबत  मी लिहिलेली व " दक्षता " या मासिकाच्या सप्टेंबर, २०१५ च्या अंकात छापून आलेली " वाहतूक पोलिस मित्र " हि कविता जोडत  आहे.  " दक्षता "  हे    मासिक  वर्तमान  पत्राच्या ठेल्यावर मिळणार नाही. ते महाराष्ट्र पोलिस दर महिन्याला छापतात  व पोलिसांना व वर्गणीदारांना देतात. या कवितेद्वारे मी माझ्या वाहतूक पोलिसांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Hello, with this I have attached a POEM with Title “ Traffic Police – A Friend “ . This POEM is written by me and was published in the September , 2015 edition of one Monthly Magazine “ DAKSHATA “ which is published by Maharastra Police and is being curculated amongst POLICE Dept. and to the subscribers. These are my true feelings about Traffic Police and a sort of an APPRECIATION for their work towards keeping Traffic Smooth. 


Sunday, September 13, 2015

The Unique flyover Where instead of saving in travel time, the travel time has increased.

नमस्कार  ,

अनेक धोकादायक वळणांचा त्याच प्रमाणे अनेक अपघातग्रस्त ठिकाणे असलेला व त्याच प्रमाणे अतिशय विचित्र आकार ( DESIGN ) असलेला असा  जगावेगळा कापुरबावडी उड्डाणपूल हा " ठाणे " नावाच्या एका गावात माफ  करा शहरासारख्या वाटणाऱ्या गावात अने वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चालू झाला आहे. हा एक असा जगावेगळा उड्डाण पूल आहे कि ज्यामुळे वाहतुकीचा वेळ कमी होण्यापेक्षा वाढला आले. या पुलाच्या या अनेक असुविधान्बद्दल अनेक वेळा महाराष्ट्र राज्याच्या आजी व माजी मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक वेळा कळविले होते. तरीही हा असुविधाजनक उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला.

माझी देवाला मनापासून प्रार्थना आहे कि या विचित्र उड्डाणपुला मुळे भयानक असे अपघात होवू नये. त्या संदर्भात हि बातमी १३ सप्टेंबर , २०१५ च्या टाईम्स ऑफ इंडिया च्या अंकात आली आहे.

Hello,

This news article is published in a news paper “THE TIMES OF INDIA” dt. 13th Sept. 2015.

This KAPURBAVDI flyover at THANE , MAHARASHTRA , which is  dangerous in nature  , accident prone and with horrible design having very sharp turns has been recently opened  for traffic after lot of delay. This is a unique flyover because of instead of saving in travel time, the travel time has increased. In the past several times, I communicated with the past as well as current Chief Minister of MAHARASHTRA , about all these problems, issues , Accident Prone Areas etc. , but ultimately it was opened for traffic.

I pray to GOD for not having any major mishap on this HORRIBLE FLYOVER.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet 



Wednesday, September 2, 2015

STRAY DOGS KILLED A BREAD EARNER OF A FAMILY IN KHED , MAHARASHTRA ( STRAY DOG MENACE )


Hello ,
For last 3 / 4 years , consistently I am writing to The Chief Ministers of Maharashtra about the exponential growth in the population of stray dogs as well about the increasing cases of STRAY DOG BITES, but unfortunately the condition remains UNCHANGED. With this , I have attached 2 news paper articles. One of the article gives information about killing of one youth ( who was a sole bread earner of his family ) because of STRAY DOG BITS,  in a village KHED ( in Maharashtra State ). Now his family is badly suffering.
It is my sincere request to all not to wait till you , your near and dear, friends, relatives to suffer badly from STRAY DOG BITS. Please raise your voice also against this very serious issue.
NEVER FORGET “ PREVENTION IS BETTER THAN CURE “.

नमस्कार ,

मी गेले ३ / ४ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रश्नावर व श्वान दंशाच्या वाढत्या घटनांवर अनेक वेळा ई मेल पाठविले, वेळो वेळी अनेक प्रकारची माहिती  पुरवली , पण परिस्थिती मध्ये काहीच बदल झाला नाही.

या सोबत वर्तमानपत्रातील दोन बातम्या जोडत आहे. तुम्हीच पहा आणि अजून किती वेळ या विषयावर आवाज न उठविता शांत राहायचे ते तुम्हीच ठरवा.

परत एकदा कळ कळीची विनंती आहे कि तुम्हाला , तुमच्या प्रियजनांना , आप्तस्वकीयांना , मित्र मैत्रीणीना भटका कुत्रा लचका तोडून , रक्त बंबाळ करण्याची वाट  पाहू नका.

विसरू नकात कि “ PREVENTION IS BETTER THAN CURE “.


Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Evil Triumphs When Good People Sit Quiet