Saturday, March 28, 2015

आजची सत्यगीतं चे ठाणे वैभव मध्ये छापून आलेले पुस्तक परीक्षण

रविवार , २९ मार्च , २०१५ च्या " ठाणे वैभव " या ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या व ४० वर्षाची परंपरा असलेल्या आणि "इष्ट ते छापणार" हे ब्रीद वाक्य असलेल्या वर्तमान पत्रात माझ्या " आजची सत्यगीतं " या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे परीक्षण छापून आले आहे.

हे परीक्षण लिहिल्याबद्दल मी सुधा ताई मोकाशी व छापल्याबद्दल " ठाणे वैभव " यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

सुधा ताई मोकाशी या स्वतः कवयित्री आहेत व माझ्या सारख्या नव कवींना प्रोत्साहन व मार्गदर्शन अगदी आनंदाने करीत असतात . त्या जेष्ठ नागरिक असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो.

मला हे सांगायला आनंद होतो कि हे परीक्षण पैसे देवून छापून आणलेले (" PAID ") परीक्षण नाही.

माझ्या " नागरिक " या व्यक्तीला " जागरूक नागरिक " करण्याच्या उपक्रमा मध्ये हा काव्यसंग्रह चांगलीच मदत करेल . पण त्यासाठी वाचकांनी या कविता वाचणे मला गरजेचे वाटते. आजच्या काळात पुस्तके विकत घेवून वाचणे व पुस्तके संग्रही ठेवणे दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळेच वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी माझा हा काव्यसंग्रह वाचनालये / ग्रंथसंग्रहालये यांना मी मोफत भेट म्हणून देत असतो.

जर आपल्याला हा काव्यसंग्रह वाचनालय / ग्रंथसंग्रहालय यांना द्यायचा असेल तर मला जरूर कळवा म्हणजे मी स्वखर्चाने तो SPEED POST ने पाठवून देईन.

हा काव्यसंग्रह खालील ठिकाणी उपलब्ध आहे

- मॅजेस्टिक ग्रंथ दालन ( Shivaji Mandir , दादर) मो.- 098922 20239
- मॅजेस्टिक बुक डेपो (ठाणे) दूरध्वनी : 022-2537 6865

मी नव्या पिढीला सुचवत असतो कि वाढदिवसाला व दुसऱ्या कोणत्या कार्याला १०० / १५० रुपयाचे शुभेच्छा पत्र देण्या ऐवजी , माझा काव्यसंग्रह भेट द्या. शुबेच्छा पत्रे दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत टाकली जातात , पण पुस्तके कपाटात जपून ठेवली जातात व वाचलीही जातात.

माझा भ्रमण ध्वनी ०९८२११५०८५८ आहे . व ई मेल satyajitshah64@gmail.com आहे .





  • Thursday, March 26, 2015

    भारतीयांनो उठा. नुसत " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " बना

    नमस्कार ,
    २५ मार्च, २०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली हि बातमी सगळ्यांबरोबर SHARE करावीशी वाटली म्हणून हा खटाटोप.
    हे डॉ. महेश बेडेकर ठाणे , महाराष्ट्र येथील एक नावाजलेले स्त्री रोग तज्ञ आहेत. त्यांचे एक अतिशय सुसज्ज असे रुग्णालय आहे . ते त्यांच्या वैद्यकीय पेशात अतिशय मग्न असतात. एवडे मग्न असूनही ते गेली कित्येक वर्षे नागरिकांना त्रास देवून सण साजरे करण्याचे जे प्रकार चालू आहेत त्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहेत.
    या लढाईचे फायदे असे होवू घातले आहेत कि नुकतेच न्यायालयाने अश्या या उत्सवाच्या सादरीकरणावर निर्बध आणले आहेत असे एका वर्तमानपत्रात वाचण्यात आले.
    हे सगळ सांगण्याचे कारण म्हणजे आजकाल सगळीकडे फक्त " नागरिक " दिसतात , " जागरूक नागरिक " अभावानेच आढळून येतात.
    अनेक व्यक्ती वेळ नसल्याचे कारण देतात, माझ्या एकट्याच्या लढण्याने काय फरक पडणार , अशी अनेक कारणे देतात व परिस्थितीशी जुळवून घेवून फक्त दुसऱ्याच्या नावाने बोटे मोडतात.
    चला भारतीयांनो उठा. नुसत " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक " बना . सभोवतालच्या प्रश्नांवर आवाज उठवा .
    कृपया विसरू नका " Evil Triumphs When Good People Sit Quiet "






  • Tuesday, March 17, 2015

    ठाणे एक REAL "SMART CITY "

    ठाणे एक REAL "SMART CITY "

    आज ( १७.०३.२०१५ ) ला संध्याकाळी हे ४ फोटो मी ठाणे नावाच्या SMART CITY मध्ये काढले.

    जर आपण निरखून पहिले तर आपल्याला असे दिसेल कि हि गाडी रस्त्याच्या कडेला उभी असताना याच्या भोवती रस्त्यावर  कठडा बांधला .

    या गाडीच्या पुढच्या बाजूला एक भिंत आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूला हि भिंत आहे . त्याच्या तिसऱ्या बाजूला एक टपरी आहे ( ती या फोटो मध्ये आली नाही ) . व या गाडीच्या चवथ्या बाजूला एक चौथरा बांधला आहे.

    अश्या या गमतीशीर बांधकामामुळे हो गाडी कधीच बाहेर काढू शकणार नाही.

    गम्मत पहा ,  ज्या कंत्राटदाराने  हे सगळे बांधकाम केले ते त्याचे काम ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी APPROVE करून त्याला या कामाचा मोबदला हि दिला असेल .

    या पूर्वी हि मी त्याच गाडीचे फोटो काढून ठाणे महानगर पालिकेच्या COMMISSIONER यांना अंदाजे एक  वा दीड  वर्षांपूर्वी कळविले होते पण आज तागायत हि गाडी आहे तशीच आहे.

    नुकतेच ठाणे महानगर पालिकेला SMART CITY म्हणून एक पुरस्कार मिळाला . त्या पुरस्काराचा फोटो हि या सोबत  POST केला आहे.

    या वरून ठाणे महानगर पालिका किती SMART आहे याची प्रचीती येते.







    Wednesday, March 11, 2015

    जनतेच्या पैशाचा अपव्यय - ठाणे स्थानकातील स्क्यानिंग मशीन शोभेपुरते


    १२.०३.२०१५ च्या "पुढारी" च्या अंकात प्रज्ञा म्हात्रे या वार्ताहाराने दिलेली हि बातमी वाचा.

    सर्व प्रथम मी तिचे अश्या प्रकारच्या जागरूक पत्रकारितेबद्दल कौतुक करतो. जर प्रत्येक पत्रकाराने असे वेगवेगळे प्रश्न वाचकांसमोर आणले तर बऱ्या प्रमाणात जनजागृती होवू शकेल.

    तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे ?

    हे तर भारतात नेहमीच होत असत .

    पण हे कधीच कोणी म्हणत नाही कि हे का होत ?

    या विरुद्ध मी पण आवाज उठवीन हे सुध्धा कोणीच म्हणत नसत .

    आमच्या ठाण्यातील एक जागरूक नागरिक चंद्रहास तावडे जी यांनी आज सकाळीच अश्याच एका प्रकारच्या पैशाच्या अपव्यायाबद्दल वाचा फोडली आहे.

    माझी खालील दोन ब्रीद वाक्ये आहेत.

    Stand up for what is right , Even if you’re standing alone !

    Evil Triumphs When Good People Sit Quiet 

    मला सांगायला  आनंद होतो कि मी या " GOOD PEOPLE " च्या वर्गात मोडत नाही. व अनेकदा मी एकटाच अश्या गोष्टीविरूढ उभा असतो.