Folloiwng article was published in Thane Vaarta on 25th June, 2014
प्रशासन आणि कर्मचा-यांनी योग्य समन्वय ठेवल्यास ठाणे परिवहन सेवा पुन्हा फायदयात येईल – नरेश म्हस्के
Ramchandra
Tikhe (Thanevarta) | June 25, 2014 | Political
news, shivsena,
TMC | No Comments
प्रशासनानं योग्य नियोजन करावं आणि कर्मचा-यांनी त्यांच कर्तव्य योग्य त-हेनं पार पाडावं, प्रशासन आणि कर्मचा-यांनी योग्य समन्वय ठेवल्यास ठाणे परिवहन सेवा पुन्हा फायदयात येईल असा आशावाद सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. ठाणे परिवहन सेवा बचाव कृती समितीतर्फे आयोजित बैठकीत नरेश म्हस्के यांनी हा आशावाद व्यक्त केला. ठाणेकरांना चांगली परिवहन सेवा मिळावी म्हणुन सक्षमपणे निर्णय घेतले जातील आणि लवकरचं महापालिका आयुक्तांबरोबर या संदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन नरेश म्हस्के यांनी यावेळी दिलं. या बैठकीस कृती समितीच्या अध्यक्षा जयश्री खाडीलकर तसेच सामाजिक कार्यकर्ते, परिवहन सेवेचे अधिकारी उपस्थित होते. सुट्टया भागांअभावी परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध होत नसल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल संपुर्ण यादीनिशी या बैठकीत सादर करण्यात आला. केवळ ३ लाखांअभावी १५ ते १६ बसेस नादुरुस्त असल्याची बाब या अहवालात उघड झाली. परिवहन सेवेच्या बसेस करीता तातडीनं सुट्टे भाग उपलब्ध करुन दयावेत अशी मागणी जयश्री खाडीलकर यांनी यावेळी केली. परिवहन सेवेच्या कामगार संघटनेनंही सुट्टे भाग उपलब्ध करुन दिल्यास १०० नव्हे तर २०० बसेस रस्त्यावर आणुन देण्याची ग्वाही या बैठकीत दिली. ठाणे महापालिका परिवहन सेवेला अनुदान स्वरुपात सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र दिलेल्या अनुदानाचं योग्य नियोजन झालं पाहिजे अशी सुचना नरेश म्हस्के यांनी परिवहन प्रशासनाला केली. परिवहन सेवेतील कर्मचारी आणि प्रशासनामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्नही नरेश म्हस्के यांनी केला. काही नेते परिवहन सेवा बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यामुळे कर्मचा-यांचे संसार उघडयावर पडणार आहेत. परिवहन सेवेतील बसेसची टप्याटप्याने दुरुस्ती करावी यासाठी लागणा-या निधीची पुर्तता आयुक्तांबरोबर बैठक घेऊन केली जाईल असे म्हस्के यांनी सांगितलं. परिवहन सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही नरेश म्हस्के यांनी या बैठकीत दिली.
No comments:
Post a Comment