Thursday, June 19, 2014

ठाणे परिवहन सेवेची पोलीसांकडील सुमारे पावणे सहा कोटींची थकबाकी




ठाणे परिवहन सेवेची पोलीसांकडील सुमारे पावणे सहा कोटींची थकबाकी त्वरीत देण्याची परिवहन सेवा बचाव कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे पोलीसांनी थकवलेली सुमारे पावणे सहा कोटी रूपयांची परिवहन सेवेची थकबाकी परिवहन सेवेला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिवहन सेवा बचाव कृती समितीच्या सत्यजित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. सत्यजित शहा यांनी माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून मिळवलेल्या माहितीत २००७ पासूनची गेल्या वर्षाची ही थकबाकी आहे. ठाणे पोलीस शहरांतर्गत फिरताना परिवहन सेवेचा उपयोग करतात. या परिवहन सेवेच्या वापराची ही थकबाकी आहे. २००७-२००८ मध्ये कोटी लाखांची थकबाकी होती. २००९ मध्ये ती कोटी १४ लाख झाली. २०१० मध्ये पुन्हा यात ९५ लाखांनी वाढ झाली. २०११-२०१२ या वर्षात एकूण सव्वा तीन कोटींच्या थकबाकीपोटी कोटी रूपये परिवहन सेवेला मिळाले. पण त्यानंतर मात्र आत्तापर्यंत पोलीसांकडून थकबाकीची रक्कम मिळालेली नाही. २०११ मध्ये ७५ लाख, २०१२ मध्ये ९१ लाख, २०१३ आणि २०१४ मध्ये प्रत्येकी ९४ लाख अशी एकूण पाच कोटी ७५ लाखांची पोलीसांची थकबाकी आहे. ठाणे परिवहन सेवेची दुर्दशा झाली असून परिवहन सेवेकडे गाड्या दुरूस्त करायलाही निधी नाही. अनेक बसगाड्यांची दुरावस्था झाली असून काही बसगाड्यांमध्ये प्रवाशांना बसायला बाकंही नाहीत. परिवहन सेवेची ही थकबाकी अगदी हफ्त्याहफ्त्यानं मिळाली तरी परिवहन सेवेला त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. गाड्यांचे सुटे भाग, टायर्स, बॅट-या अशा विविध कारणांमुळं बंद पडलेल्या गाड्या पुन्हा रस्त्यावर धावू शकतात. त्यातून पालिकेचं उत्पन्नही वाढू शकतं. ठाण्यातील रिक्षांचं भाडं आता ठाणेकरांच्या अवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांसाठी परिवहन सेवा हा एक मोठा आधार आहे. ही परिवहन सेवा सुरळीत चालण्यासाठी ही थकबाकी त्वरीत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिवहन सेवा बचाव कृती समितीनं केली आहे.

No comments:

Post a Comment