Monday, December 23, 2019

श्री .संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas ) - फेसबुकवरील एक जागरूक मित्र


श्री .संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas  ) - फेसबुकवरील एक जागरूक  मित्र 

मी रविवार , २२ डिसेंबर , २०१९ रोजी सायंकाळी फेसबुक वर " पे टी एम के वाय सी ( PAYTM KYC ) फसवणुकीचा धोका "  या शीर्षकाखाली माहितीवजा पोस्ट टाकली होती जेणेकरून अनेकांची भविष्यात होणारी फसवणूक टळू शकेल . 

माझ्या त्या पोस्ट ला श्री . संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas  ) यांनी खालील टिप्पणी केली होती .
-  Sanadiip Bbiswas Please Tweet to Paytm too for immediate action.  

त्यांच्या टिप्पणीला मी खालील उत्तर दिले होते. 
- Satyajit A Shah Can you by forwarding their tweeter handle ? I did not find their e mail i.d .  

मला सांगायला अभिमान व अत्यानंद वाटतो कि  श्री .संदीप बिस्वास ( Sanadiip Bbiswas  ) - या माझ्या फेसबुकवरील एका  जागरूक  मित्राने स्वतः   पे टी एम ला ट्विट केलं व त्यांना  पे टी एम ने उत्तर देखील पाठविलं ( त्या दोन्ही ट्विट्स या सोबत जोडत आहे )  . त्या उत्तरामुळे मला आलेला लघुसंदेश ( SMS ) हा फसवणुकीचाच  एक भाग होता  हे सिद्ध झालं तसेच  पे टी एम ला देखील या फसवणुकीबद्दल जाणीव करून दिली गेली . 

फेबूकवर असे जागरूक नागरिक क्वचितच आढळून येतात .  






Sunday, December 22, 2019

पे टी एम के वाय सी ( PAYTM KYC ) फसवणुकीचा धोका



" पे टी एम के वाय सी ( PAYTM KYC ) फसवणुकीचा धोका "

मला शुक्रवार , २० डिसेंबर , २०१९ रोजी १३.०८ वाजता खालीलप्रमाणे एक लघुसंदेश ( SMS ) आला 

" Dear Paytm customer
    Your Paytm has been today 
hold KYC Aadhar pan card 
submit please contact Paytm 
office Ph:8927889281 "

हा लघु संदेश VGIMPYMT  येथून  आला होता . 

मी त्याप्रमाणे 8927889281 या क्रमांकाशी शुक्रवार , २० डिसेंबर , २०१९ रोजी १३.१० वाजता  संपर्क साधला तेंव्हा त्या माणसांने  मला असं सांगितलं कि तो   PAYTM च्या कार्यालयातून बोलतोय व मला माझं  के वाय सी पूर्ण करावं लागेल . मी त्याला म्हटलं कि मी ते  के वाय सी  PAYTM च्या वेबसाईट वरून करेन , तेव्हा तो म्हणाला कि  नाही ते भ्रमणध्वनीवरूनच करावं लागेल . मी त्याला कसं करायचं विचारल्यावर तो म्हणाला कि गूगल प्ले स्टोर वर जाऊन तो जे सांगतोय ते टाईप करायचं , पण ते मला काही न कळल्यामुळे तो म्हणाला कि  तो पुन्हा एक  लघुसंदेश पाठवेल , त्यात एक शृंखला ( LINK ) पाठवेल . त्याने मला खालीलप्रमाणे एक  लघुसंदेश  शुक्रवार , २० डिसेंबर , २०१९ रोजी १३.१४ वाजता पाठविला . 


त्या लघुसंदेशात जेव्हा मी teamviewer हा शब्द वाचला तेव्हा माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली कि ते    teamviewer   ने माझ्या भ्रमणध्वनीवरील सगळी माहिती त्यांच्याकडे घेउ शकतील.  तेव्हा मी त्या व्यक्तीला सांगितलं कि मी त्याच्याशी नंतर संपर्क साधतो आणि भ्रमणध्वनीवरील संवाद थांबविला . 

त्या दोन्ही लघुसंदेशाचे स्क्रीनशॉट येथे जोडलेले आहेत . 

सुदैवाने रविवार , २२ डिसेंबर , २०१९ च्या महाराष्ट्र टाईम्स या एक नावाजलेल्या मराठी दैनिकात या संदर्भातील एक बातमी ( के वाय सी ठरतेय धोकादायक ) आली ( ती बातमी देखील येथे जोडत आहे . )  

माझ्या सुदैवाने बहुतेक माझी आर्थिक फसवणूक होता होता मी वाचलो , पण या अश्या सापळ्यात काही दुर्दैवी व्यक्ती सापडू शकतात . 

मी CYBER CRIME INVESTIGATION CELL :  ठाणे  यांच्याकडे याबाबतची तक्रार पुराव्यानिशी केली आहे . 

आपणापैकी कोणीही अश्या फसवणुकीला बळी पडू नये  म्हणून हे सगळं येथे देत आहे . कृपया याबाबत इतरांना देखील याबाबत जागरूक करा . 








Tuesday, December 10, 2019

ठाणे येथे " आरंभ " छायाचित्र प्रदर्शन


ठाणे येथे " आरंभ " छायाचित्र  प्रदर्शन 

" रानवाटा " ( http://raanvata.com/ ) तर्फ़े नवोदित छायाचित्रकारांच्या  छायाचित्रांचे २० वे  प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे १३, १४ व १५ डिसेंबर , २०१९  रोजी भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात तब्बल ९० छायाचित्रकारांची ६०० छायाचित्रे पाहायला मिळतील; त्यात भारतातील कला-संस्कृती, परंपरा, निसर्गसौंदर्य, वन्यजीव यांचा समावेश करण्यात आला आहे. देश विदेशातील पर्यटन सुद्धा या प्रदर्शनातून पाहता येईल.  

यासोबतच 'महाराष्ट्र देशा' मालिकेतील विविध विषयांवर आधारित माहितीपट दिवसभर पाहायला मिळतील. लहान मुलांसाठी बनवलेली कासवाची गोष्ट हा व्हिडिओ मुख्य आकर्षण असेल.  हे प्रदर्शन विनामूल्य असून सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले राहील. प्रदर्शनानंतर हौशी छायाचित्रकारांसाठी छायाचित्रण शिबीराचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. 
संपर्क: स्वप्निल पवार ९८२१३६७८९४  

ता. क. :  या प्रदर्शनात मी टिपलेली काही छायाचित्रे सुद्धा असणार आहेत . आपली उपस्थिती  माझ्या सारख्या अनेक  नवोदित छायाचित्रकारांना प्रोत्साहीत करेल . 

प्रदर्शनाचे ठिकाण : 
Thane Kala Bhavan ,  Roopchand Apartments, Old Agra Road,Kapurbawadi Junction, Sainath Nagar, Majiwada, Beside Big Bazar Building, Thane, Maharashtra 400601
022 2540 0909 -         https://g.co/kgs/Z2dyae

Team Raanvata - +91-9821367894
Facebook Page | Like us and stay updated - https://www.facebook.com/raanvata/
Youtube Channel | Subscribe us and watch our latest videos - https://www.youtube.com/user/Raanvata

#Raanvata #Arambh20 #Arambh2019 #PhotographyExhibitionThane #Thane #ArambhDec19 #ThaneKalaBhavan #Photography #KalaBhavanThane




Sunday, December 1, 2019

५० वर्षीय व्यक्तीच्या कुत्र्याचा चावा


कल्याण अजून एक श्वान दंश
५० वर्षीय व्यक्तीच्या कुत्र्याचा चावा
कोठे गायब झाले प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना ?
मानव प्राणी मरो ,
पण भटकी कुत्री जगो !
#straydogmenace  





Saturday, November 30, 2019

आजची ठळक बातमी ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत BREAKING NEWS )

आजची ठळक बातमी ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत BREAKING NEWS ) 
विरार रेल्वे स्थानकात भटक्या कुत्र्यांचे १२ प्रवाशांना चावे 
लोकसत्ता - ता. ३० नोव्हेंबर , २०१९ 
पहा भटके कुत्रे कसे मानवांचे लचके तोडताहेत . 
अशा वेळी प्राणी मित्र , प्राणी मैत्रिणी , प्राणी संघटना कधीच मानव प्राण्यांच्या मदतीसाठी धावून आल्याचे वाचनात नाही , ऐकिवात नाही , कारण . . . . . . . 
मानव प्राणी मरो , 
पण भटकी कुत्री जगो 
काही दिवसांनी भारत या देशातील  श्वान दंश न झालेला मानव प्राणी शोधून काढावा लागेल . 
जन्मलेल्या बाळाला रॅबीस होऊन नये म्हणून एक लस द्यावी लागेल अशी काहीशी दुर्दैवी परिस्थिती येण्याची शक्यता आहे . 
#straydogmenace