Sunday, December 22, 2019

पे टी एम के वाय सी ( PAYTM KYC ) फसवणुकीचा धोका



" पे टी एम के वाय सी ( PAYTM KYC ) फसवणुकीचा धोका "

मला शुक्रवार , २० डिसेंबर , २०१९ रोजी १३.०८ वाजता खालीलप्रमाणे एक लघुसंदेश ( SMS ) आला 

" Dear Paytm customer
    Your Paytm has been today 
hold KYC Aadhar pan card 
submit please contact Paytm 
office Ph:8927889281 "

हा लघु संदेश VGIMPYMT  येथून  आला होता

मी त्याप्रमाणे 8927889281 या क्रमांकाशी शुक्रवार , २० डिसेंबर , २०१९ रोजी १३.१० वाजता  संपर्क साधला तेंव्हा त्या माणसांने  मला असं सांगितलं कि तो   PAYTM च्या कार्यालयातून बोलतोय मला माझं  के वाय सी पूर्ण करावं लागेल . मी त्याला म्हटलं कि मी ते  के वाय सी  PAYTM च्या वेबसाईट वरून करेन , तेव्हा तो म्हणाला कि  नाही ते भ्रमणध्वनीवरूनच करावं लागेल . मी त्याला कसं करायचं विचारल्यावर तो म्हणाला कि गूगल प्ले स्टोर वर जाऊन तो जे सांगतोय ते टाईप करायचं , पण ते मला काही कळल्यामुळे तो म्हणाला कि  तो पुन्हा एक  लघुसंदेश पाठवेल , त्यात एक शृंखला ( LINK ) पाठवेल . त्याने मला खालीलप्रमाणे एक  लघुसंदेश  शुक्रवार , २० डिसेंबर , २०१९ रोजी १३.१४ वाजता पाठविला


त्या लघुसंदेशात जेव्हा मी teamviewer हा शब्द वाचला तेव्हा माझ्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली कि ते    teamviewer   ने माझ्या भ्रमणध्वनीवरील सगळी माहिती त्यांच्याकडे घेउ शकतीलतेव्हा मी त्या व्यक्तीला सांगितलं कि मी त्याच्याशी नंतर संपर्क साधतो आणि भ्रमणध्वनीवरील संवाद थांबविला

त्या दोन्ही लघुसंदेशाचे स्क्रीनशॉट येथे जोडलेले आहेत

सुदैवाने रविवार , २२ डिसेंबर , २०१९ च्या महाराष्ट्र टाईम्स या एक नावाजलेल्या मराठी दैनिकात या संदर्भातील एक बातमी ( के वाय सी ठरतेय धोकादायकआली ( ती बातमी देखील येथे जोडत आहे . )  

माझ्या सुदैवाने बहुतेक माझी आर्थिक फसवणूक होता होता मी वाचलो , पण या अश्या सापळ्यात काही दुर्दैवी व्यक्ती सापडू शकतात

मी CYBER CRIME INVESTIGATION CELL :  ठाणे  यांच्याकडे याबाबतची तक्रार पुराव्यानिशी केली आहे

आपणापैकी कोणीही अश्या फसवणुकीला बळी पडू नये  म्हणून हे सगळं येथे देत आहे . कृपया याबाबत इतरांना देखील याबाबत जागरूक करा








No comments:

Post a Comment