Thursday, November 7, 2019

जागतिक शहर नियोजन / नगररचना दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY )


जागतिक शहर नियोजन / नगररचना  दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY ) 

८ नोव्हेंबर , हा जागतिक  शहर नियोजन / नगररचना  दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY )  म्हणून साजरा केला जातो . 

शहर अथवा इतर शहरी भागांचे बांधकाम , वाढ आणि विकास यांचे नियोजन आणि नियंत्रण अशी  "  शहर नियोजन "  ( TOWN PLANNING  )  याची व्याख्या आहे . 

Maharashtra Regional and Town Planning (amendment) act 2018 असा  एक कायदा सन १९६६ पासून अस्तित्वात आहे.  माझ्या ज्ञानाप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील बांधकाम , वाढ आणि विकास होताना हा कायदा लागू होत असायला हवा . पण " ठाणे " नावाच्या , मुंबईहून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका स्मार्ट शहरातील गेल्या अनेक वर्षातील बांधकाम पाहता " ठाणे " या SMART CITY (  SMART = हुशार , चलाख , अद्यावत ,   CITY = शहर )  ला हा कायदा बहुतेक लागू नसावा . 

  "  शहर नियोजन "  ( TOWN PLANNING  )  कसं नसावं याचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणजे ' ठाणे " .  जागा दिसेल तेथे बांधकामं , मैदानांचा अभाव , नियोजनबद्ध अश्या भाजीमंड्या नाहीत , वाहनतळांचा अभाव , अस्तित्वात असलेले तलाव गायब , शाळांना मैदानं नाहीत ,  . . . .  अश्या अनेक गोष्टी सांगता येतील .   असेही ऐकले आहे कि काही उंच इमारतींमध्ये निर्वासित खोली / घर ( REFUGEE FLAT ) नाहीत , आणि होते ते भिंती बांधून खोली / घर ( FLAT ) म्हणून बांधकाम व्यवसिकांनी विकले . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


#townplannnin  #thanecitytownplanning  #thanecity

Monday, November 4, 2019

भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र


भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र

सध्या मलबार हिल , मुंबई येथे " वर्षा " नावाचा एक बंगला  आहे जेथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान आहे . 

पण सध्याचे युतीचे जुळवाजुळवीचे राजकारण , व सद्य राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात  मलबार हिल , मुंबई येथे खालील तीन बंगले कायमसाठी असतील . 

१. ) " वर्षा " - मा. मुख्यमंत्री 
२. ) " मेघ " ( १ ) - मा .उपमुख्यमंत्री ( १ )
३. ) " मेघ " ( २ ) - मा .उपमुख्यमंत्री ( २ )

"वर्षा" व "मेघ" यांचं नातं सांगण्याची गरज नाही .  नवीन बंगल्यांची नावे  " मेघ " ( १ ) व  " मेघ " ( २ ) अशी का ठेवली आहेत हे कळलेच असेल  . 

मी हाडाचा व्यंगचित्रकार नाही , पण एक उपरोधिक व्यंगचित्र रेखाटण्याचे  धाडस केले आहे .खरं तर व्यंगचित्र एवढं स्पष्ट करून सांगू नये , पण मी नवा व्यंगचित्रकार असल्याने हा एक प्रयत्न . 

काही चुका असतील तर माफी असावी .   



Saturday, November 2, 2019

देख तेरे नागपूरकी हालत क्या हो गई नागपूरकर . . . . . . . . . . . 

देख तेरे नागपूरकी हालत क्या हो गई नागपूरकर . . . . . . . . . . .



Friday, November 1, 2019

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप - एक सामाजिक बांधिलकी

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप  - एक सामाजिक बांधिलकी 
३१ ऑक्टोबर , २०१९ च्या " ठाणे वैभव " या एक सुप्रसिद्ध दैनिकांमद्ये छापून आलेली बातमी येथे देत आहे .  प्रथम बातमी छापल्याबद्दल ठाणे वैभव व श्री. सुरेश सोंडकर यांचे मनःपूर्वक आभार . 
समाजातील समविचारी व्यक्ती एकत्र येऊन असे अनेक सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम करू शकतात . 
सुदैवाने ठाणे शहराला श्री. संजय केळकर साहेब यांच्या रूपात एक समाजकारणी व आदर्श आमदार लाभला आहे . त्यांचा अश्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांना नेहमीच सक्रिय पाठिंबा असतो . 
या  फराळ वाटपात मला श्री. दत्ता घाडगे , सौ . मनीषा वायंगणकर , सौ. मीनल उत्तूरकर , श्री. भावेश जर्दोश , कुमार यश जर्दोश , कुमारी तनिषा शाह , सुमेध शाह , शामली दोषी  यांची मोलाची साथ लाभली . 
डॉक्टर  सौ . मृदुला भावे यांनी  फराळाची जबाबदारी तर  घेतली हाती  पण त्यांनी  सगळ्या खर्चातील थोडा भर देखील उचलला .दिवाळी फराळ वाटपादरम्यान  अनेक वाहतूक पोलिसांनी वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील  मुखवटा ( MASK ) ची मागणी केली .  भविष्यात ठाणे शहरातील वाहतूक पोलिसांना  वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील  मुखवटा ( MASK ) देण्याची योजना आहे . 
आपल्याला देखील आपल्या परीने अश्या प्रकारच्या इतर अनेक सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सामील व्हायचे असेल तर माझ्याशी ९८२११५०८५८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा . 
http://fightofacommonman.blogspot.com/