" जुळणाऱ्या रंगांचे मुखवटे " ( MATCHING MASKS ) - एक हास्यव्यंगचित्र
मनोहर सप्रे काका ( सुप्रसिद्ध हास्य व्यंगचित्रकार , लेखक , कवी , लाकूड , व बांबू वरील कोरीव , रेखीव कला ....... व इतर अनेक कलांमध्ये पारंगत असलेले , वय वर्षे ८७ ) यांच्या पाउलांवर माझी छोटीशी पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे .
" जुळणाऱ्या रंगांचे मुखवटे " ( MATCHING MASKS ) असे शीर्षक असलेले एक हास्य व्यंग चित्र येथे जोडत आहे .
याची संकल्पना मला सुचली , पण पुढे कस जायचं हे कळत नव्हतं , मग चंद्रपूर येथील एक तरुण पण हरहुन्नरी हास्यव्यंगचित्रकार मंदार पार्डीकर याच्याशी भ्रमणध्वनीवर मी संपर्क साधला . तो म्हणाला कि तो रूपरेषा रेखाटून पाठवेल . त्याप्रमाणे त्याने रूपरेषा रेखाटून पाठवली . त्या रुपरेषेवरून मी हे हास्यव्यंगचित्र काढले . खरं तर
मंदार पार्डीकर ने मला संकल्पना रेखाटून पाठवली नसती तर हे मला जमलं देखील नसतं . त्याचे मनःपूर्वक आभार .
त्या बाईच्या व त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावरील भाव हे मी स्वतः ( माझ्या कल्पनाशक्तीने ) काढले आहे . दुकानाचे नाव देखील मीच दिले आहे . मजकूर देखील माझाच आहे , व ती साड्यांची व त्याच्या बाजूला असलेल्या मुखवट्याची संकल्पना माझीच आहे .
काही दिवसांनी , महिन्यांनी , वर्षांनी सध्या लोप पावत असलेली उपहासात्मक ( SATIRE ) व्यंगचित्रे मला सुचावीत व काढता येवोत हि ईश्वरचरणी प्रार्थना .
या हास्यव्यंगचित्रात तुम्हा ला काही सुधारणा सुचवायचे असतील तर कृपया सुचवा , जेणेकरून मला शिकायला , सुधारायला मिळेल .
ता. क. : मी येथे स्पष्ट करू इच्छितो कि मि कोणाच्याही हास्यव्यंगचित्राची नक्कल ( COPY ) केलेली नाही . हि संकल्पना सुचल्यावर मला काही दिवसांनी आठवले होते कि अश्याच प्रकारे " जुळणाऱ्या रंगाचे शिरस्त्राण मागणारी एक युवती " असे एक हास्यव्यंगचित्र बहुतेक श्री.. घनश्याम देशमुख ( बोलक्या रेषांचे जनक ) यांनी काढलं होतं . मी जेंव्हा माझी हृदयरोगावरील औषधे घेण्यास गेलो होतो , तेंव्हा तेथे काही मुखवटे पहिले , त्याचप्रमाणे अनेक दुचाकीस्वारांनी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे वापरताना पहिले , त्यावरून हि संकल्पना मला सुचली. कोणाच्या कलेची नक्कल करून , स्वतःच्या नावाने खपवून मिरवणे मला आवडत नाही .
No comments:
Post a Comment