Sunday, March 29, 2020

कोरोना ताळेबंदीनंतरची भविष्यातील भीती 

कोरोना ताळेबंदीनंतरची भविष्यातील भीती


Monday, March 23, 2020

" जुळणाऱ्या रंगांचे मुखवटे " ( MATCHING MASKS ) - एक हास्यव्यंगचित्र

  " जुळणाऱ्या रंगांचे मुखवटे " ( MATCHING MASKS ) - एक हास्यव्यंगचित्र 
 
मनोहर सप्रे काका ( सुप्रसिद्ध हास्य व्यंगचित्रकार , लेखक , कवी , लाकूड , व बांबू वरील  कोरीव , रेखीव कला  .......  व इतर अनेक कलांमध्ये पारंगत असलेले , वय वर्षे ८७ ) यांच्या पाउलांवर माझी छोटीशी पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे . 

" जुळणाऱ्या रंगांचे मुखवटे " ( MATCHING MASKS ) असे शीर्षक असलेले एक हास्य व्यंग चित्र येथे जोडत आहे . 

याची  संकल्पना मला सुचली , पण पुढे कस जायचं हे कळत नव्हतं , मग चंद्रपूर येथील एक तरुण पण हरहुन्नरी हास्यव्यंगचित्रकार मंदार पार्डीकर याच्याशी भ्रमणध्वनीवर मी  संपर्क साधला . तो म्हणाला कि तो रूपरेषा रेखाटून पाठवेल . त्याप्रमाणे त्याने रूपरेषा रेखाटून  पाठवली . त्या रुपरेषेवरून मी हे हास्यव्यंगचित्र काढले . खरं  तर   मंदार पार्डीकर ने मला संकल्पना रेखाटून पाठवली नसती तर हे मला जमलं  देखील नसतं . त्याचे मनःपूर्वक आभार . 

त्या बाईच्या व त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावरील भाव हे मी स्वतः  ( माझ्या  कल्पनाशक्तीने ) काढले आहे . दुकानाचे नाव देखील मीच दिले आहे . मजकूर देखील माझाच आहे , व ती साड्यांची व त्याच्या बाजूला असलेल्या मुखवट्याची  संकल्पना माझीच आहे . 

काही दिवसांनी , महिन्यांनी , वर्षांनी सध्या  लोप पावत  असलेली उपहासात्मक ( SATIRE ) व्यंगचित्रे मला सुचावीत  व काढता येवोत हि ईश्वरचरणी प्रार्थना . 

या  हास्यव्यंगचित्रात तुम्हाला काही सुधारणा सुचवायचे असतील तर कृपया सुचवा , जेणेकरून मला शिकायला , सुधारायला  मिळेल .


ता. क.  :  मी येथे स्पष्ट करू इच्छितो कि मि कोणाच्याही हास्यव्यंगचित्राची  नक्कल ( COPY ) केलेली नाही . हि संकल्पना सुचल्यावर मला काही दिवसांनी आठवले होते कि अश्याच प्रकारे " जुळणाऱ्या रंगाचे शिरस्त्राण मागणारी एक युवती " असे एक हास्यव्यंगचित्र बहुतेक श्री.. घनश्याम देशमुख ( बोलक्या रेषांचे जनक ) यांनी काढलं होतं .  मी जेंव्हा माझी हृदयरोगावरील औषधे घेण्यास गेलो होतो , तेंव्हा तेथे काही मुखवटे पहिले , त्याचप्रमाणे अनेक दुचाकीस्वारांनी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे वापरताना पहिले , त्यावरून हि संकल्पना मला सुचली. कोणाच्या कलेची  नक्कल करून , स्वतःच्या नावाने खपवून मिरवणे मला आवडत नाही . 


Thursday, March 19, 2020

वृत्तवाहिनीचा  वार्ताहार वाहतुकीचे नियम पाळत नाही .

वृत्तवाहिनीचा  वार्ताहार वाहतुकीचे नियम पाळत नाही .
#Coronavirus Pune | कोरोनामुळे पुणे अंशत: लॉकडाऊन, गजबजलेल्या पुण्यात शुकशुकाट! स्पेशल रिपोर्ट " या शीर्षकाखाली एक नावाजलेल्या मराठी वृत्तवाहिनीचा एक खास अहवाल दाखविला ज्यात वार्ताहार दुचाकीवरून  शिरस्त्राण न घालता फिरतोय . यावर कारवाई होणार का ?  


Sunday, March 8, 2020

सैन्यातील कुत्र्यांना वेगळा न्याय व भटक्या  कुत्र्यांना वेगळा न्याय ?


सैन्यातील कुत्र्यांना वेगळा न्याय भटक्या  कुत्र्यांना वेगळा न्याय

"
कुत्रे जेंव्हा सैन्यातून निवृत्ती घेतात , तेव्हा सैन्याद्वारे त्यांना गोळी मारून ठार करण्यात येते . "

हि माहिती 

https://www.inmarathi.com/dogs-killed-after-retirement-but-why/? utm_source=im&fbclid=IwAR3Q8y9vuW5dO7pLuj0PopxZl9ugRqSbprtQ0rIw8sclRsZcfdrjQSEGhks 

या शृंखलेतून घेतली आहे . 

हे जर कोणत्याही कारणासाठी खरं असेल तरीही , मग दररोज लाखो मानवप्राण्यांना श्वान दंश करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना का नाही ठार मारलं जात ? 

हा असा वेगळा न्याय का 

जगावेगळी चोरी , " DRIVER मधील चोरी " ?





जगावेगळी चोरी , " DRIVER मधील चोरी " ?


एका नावाजलेल्या मराठी वृत्तवाहिनीच्या या बातमीतील ०.१५ ते ०.१८   एवढी बातमी पहा , त्या महिला बातमीदाराने असे म्हटले आहे कि "  शिवपार्वती रुग्णालयामध्ये  चोरटयांनी  DRIVER मधील रोख रक्कम पळवली आहे " . 

एक तर ती  मराठी वृत्तवाहिनी आहे , म्हणजेच बातमी मराठीत असली पाहिजे , पण बातमीत एवढे इंग्रजी शब्द वापरले आहेत कि मराठीची ऐशी तैशी तर झालीच आहे , पण अयोग्य इंग्रजी शब्द वापरणे याला काय म्हणावं ? 

DRIVER म्हणजे "चालक" व DRAWER म्हणजे "खण" हे त्या 

महिला बातमीदाराला समजवून सांगावे लागेल . 

ना मराठी शुद्ध , ना इंग्रजी योग्य . 

तुम्हाला नाही का वाटत हे सगळं थांबलं पाहिजे ?