Friday, February 14, 2020

कविता व्यालेनटांइन डे ( Valentine Day ) - एक दुर्दवी सत्यगीत


कविता व्यालेनटांइन डे ( Valentine Day )

मी माझी ( मी स्वतः लिहिलेली - चोरलेली नाही ) अप्रकाशित कविता कधीच FACEBOOK वर टाकीत नाही कारण त्याची बेमालूमपणे चोरी होते. आणि गम्मत म्हणजे तो / ती चोर स्वतःच्या नावाने परत FACEBOOK वर अशी टाकतात अशी कि त्यांनीच ती कविता लिहिली आहे. माझ्याकडे " व्यालेनटांइन डे ( Valentine Day ) " हि कविता, मी कधी , कोठे लिहिली हे पुरावे आहेत म्हणून राहवत नाही म्हणून हि कविता आजच्या दिवशी ( १४.०२.२०२० ) रोजी FACEBOOK वर टाकत आहे.या सगळ्या माझ्या भावना आहेत.

सत्यजित शाह - ठाणे
एक जागरूक नागरिक"

व्यालेनटांइन डे ( Valentine Day )

"Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?

नाही कधी आईवर प्रेम केलं
नाही कधी वडिलांना प्रेम दिलं
नाही कधी भावंडांवर प्रेम केलं
नाही आजी , आजोबांना मानाने वागवल

Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?

नाही कधी मातृभाषेवर प्रेम केलं
नाही कधी भारतीय संस्कृतीचं जतन केलं
नाही कधी स्वतःच्या शाळेवर प्रेम केलं
नाही कधी गुरुजनांना मानाचं स्थान दिलं.

Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?

नाही भारतीय खेळांवर प्रेम केलं
नाही भारतीय कलांवर प्रेम केलं
नाही भारतीय आयुर्वेदावर प्रेम केलं
नाही भारतीय योगाभ्यासावर प्रेम केलं

तरुणांनो ज्या भारत मातेने आपल्यासाठी एवढं दिलं
आठवा अश्या या भारत मातेसाठी तुम्ही काय केलं ?

Valentine Day ने असं काय साध्य झाल ?
का असं पाश्च्यात्याचं फक्त अंधानुकरण केलं ?

कवी सत्यगीत
(
सत्यजित शाह - ठाणे )

No comments:

Post a Comment