" महान व्यक्तीची भेट ( GREAT BHET )
मी गेले काही वर्षे वन्यजीव छायाचित्रीकरण ( WILD LIFE PHOTOGRAPHY ) करतोय . आत्तापर्यंत ती अनेक छायाचित्रे फक्त संगणकातच अडकून राहिली होती / बंदिस्त होऊन राहिली होती . त्या छायाचित्रांची प्रत काढून , ती एका सुंदर लाकडी चौकडीत ( WOODEN FRAME मध्ये ) बसवून भेट वस्तू म्हणून देण्याचे मनात आले . सुदैवाने सौ . जयश्री ताई - पांडे , संपादिका - " नवाकाळ " यांची भेट झाली . त्यांना बांधवगढ येथे टिपलेल्या एका छाव्याचं छायाचित्र त्यांना सप्रेम भेट देता आली . छायाचित्रात त्यांचे यजमान
श्री. रमाकांत जी पांडे हे देखील दिसत आहेत .
" नवाकाळ " चे माजी संपादक नीलकंठजी खाडिलकर यांना अग्रलेखाचा बादशाह या नावाने ओळखलं जायचं . "बादशाह" म्हणजे राजा , " वाघ " हा देखील जंगलाचा जणू राजाच असतो . जयश्री ताईंचे अग्रलेख देखील अतिशय सडेतोड , रोखठोक , आक्रमक असतात . जणू त्या त्यांच्या लेखणीद्वारे वाघिणीसारख्याच आक्रमक असतात , त्यामुळेच त्यांच्या प्रतिमेला साजेसं असं छायाचित्र त्यांना भेट देऊ शकलो याचा मला आनंद आहे .
No comments:
Post a Comment