Saturday, January 11, 2020

आजचा भारतीय

" आजचा भारतीय "
" CRIME PETROL " मालिकेच्या च्या एका भागाच्या शेवटी अनुप सोनी खालील संदेश देतो .
" आज हम सभी अपने अधिकारो और असुविधांओंके बारेमे हमेशा बात करते हैं , लेकिन जब बात आती है संघर्ष कि , अपना दायित्व निभाने कि , तब हमेशा बचकर निकलने कि कोशिश करते हैं ! "
हि भारतीय मानसिकता मी माझ्या अनेक लढ्यांमध्ये पाहिली आहे .
काय गम्मत आहे ना , भारतीय नागरिकाला समाजरूपवर / समाजचेहरावर ( FACEBOOK वर ) , कसं काय / काय मग समूहांवर ( WHATSAPP GROUPS वर ) , GOOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD EVENING , GOOD NIGHT करायला , अनेक संदेश पुढे पाठवायला ( MESSAGES FORWARD ) करायला , अनेकांच्या संदेशांवर वेगवेगळी चिन्हांकृत आकृत्या ( EMOJI ) द्यायला , निरर्थक प्रश्नांवर वादावादी करायला भरपूर वेळ आहे , ऊर्जा आहे हे अगदी रोटी , कपडा मकान सारखं महत्वाचं वाटतं .
हीच आजच्या भारतीयांची मानसिकता यासोबत जोडलेल्या एका व्यंगचित्रातून अप्रतिमपणे , नेमकी व्यक्त केली आहे .
ते व्यंगचित्र पाहिल्यावर हे सगळं वाचल्यावर , तुमचे उंचावलेले हात का खाली आले चेहरा असा का पडला ?
सुदैवाने मी मात्र माझ्या परिने अनेक बदल घडवून आणण्यासाठी झगडतोय. I AM TRYING
TO CHANGE ,  AS I  WANT CHANGE , AND I AM PROUD THAT I COULD CHANGE FEW THINGS.

No comments:

Post a Comment