Sunday, January 19, 2020

आसन पट्टा लावणं , किती महत्वाचं

आसन पट्टा लावणं , किती महत्वाचं

या सोबत " लोकसत्ता " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात १९ जानेवारी , २०२० रोजी छापून आलेली बातमी देत आहे . 

या बातमीवरून असे आढळून येते कि , त्या वाहनचालकाने आसन पट्टा लावला होता म्हणून तो त्या अपघातात जास्त जखमी झाला नाही , पण शबाना आझमी यां  मागील आसनावर आसन पट्टा न लावता प्रवास करीत होत्या . त्या दुर्दैवाने गंभीर जखमी झाल्या आहेत . 
 या घटनेवरून    चार चाकी वाहनातील सर्व प्रवाश्यांनी  प्रवास करताना आसन पट्टा लावणं  किती महत्वाचं  आहे सांगणे नलगे . 

असं आढळून आलं आहे कि अनेकांना असं पट्टा लावणं हे कमीपणाचं वाटतं . काहींच्या म्हणे आसन पट्टा लावल्यावर सदऱ्याची इस्त्री खराब होते .


" महान व्यक्तीची भेट ( GREAT BHET )

" महान व्यक्तीची  भेट ( GREAT BHET  )

मी गेले काही वर्षे  वन्यजीव छायाचित्रीकरण ( WILD LIFE PHOTOGRAPHY )  करतोय .  आत्तापर्यंत ती अनेक छायाचित्रे फक्त संगणकातच अडकून राहिली होती / बंदिस्त होऊन राहिली होती . त्या  छायाचित्रांची प्रत काढून , ती एका सुंदर लाकडी चौकडीत ( WOODEN FRAME मध्ये ) बसवून भेट वस्तू म्हणून देण्याचे मनात आले . सुदैवाने सौ . जयश्री ताई - पांडे , संपादिका - " नवाकाळ "   यांची  भेट झाली . त्यांना बांधवगढ येथे टिपलेल्या एका छाव्याचं छायाचित्र त्यांना सप्रेम भेट देता आली . छायाचित्रात त्यांचे यजमान  श्री. रमाकांत जी पांडे हे देखील दिसत आहेत . 

" नवाकाळ " चे माजी संपादक नीलकंठजी  खाडिलकर यांना अग्रलेखाचा बादशाह या नावाने ओळखलं जायचं . "बादशाह" म्हणजे राजा , " वाघ "  हा देखील जंगलाचा जणू राजाच असतो . जयश्री ताईंचे अग्रलेख देखील अतिशय सडेतोड , रोखठोक , आक्रमक असतात . जणू त्या त्यांच्या लेखणीद्वारे वाघिणीसारख्याच आक्रमक असतात , त्यामुळेच त्यांच्या  प्रतिमेला साजेसं असं छायाचित्र त्यांना भेट देऊ शकलो याचा मला आनंद आहे . 


Tuesday, January 14, 2020

" TAKE तिळ गुळ , AND TALK SWEET SWEET " - भविष्यातील मकर संक्रांतीच्या मराठी शुभेच्छा

  " TAKE तिळ गुळ , AND TALK SWEET SWEET " -  भविष्यातील मकर संक्रांतीच्या मराठी शुभेच्छा 
सध्या मराठी भाषिक व्यक्तींना मराठी संभाषण करताना अनेकदा इंग्रजीच्या कुबड्या घ्याव्या लागतात . जर हे असेच चालू राहिले तर नजीकच्या काळात मकर संक्रांतीच्या शुभेच्छा या "
TAKE तिळ गुळ , AND TALK SWEET SWEET " अश्या प्रमाणे देखील दिल्या गेल्यात तर आश्चर्य वाटू नये .
मराठी माणसा , कोठे नेऊन ठेवलेस मराठी भाषेला ? 
मराठी माणसा ऊठ , इंग्रजीच्या कुबड्या दे फेकून !  

Sunday, January 12, 2020

भटक्या कुत्र्यांची दहशत

भटक्या कुत्र्यांची दहशत

" पनवेल मधील तक्का गावात कुत्र्याचा एकाच दिवशी आठ जणांना चावा "
म. टा. ता. १२ जानेवारी , २०२०   

" मानव प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो , नव्हे अमर्याद संख्येने वाढो " - आजची भारतातील शोकांतिका 

#straydogmenace #straydogbites 


Saturday, January 11, 2020

आजचा भारतीय

" आजचा भारतीय "
" CRIME PETROL " मालिकेच्या च्या एका भागाच्या शेवटी अनुप सोनी खालील संदेश देतो .
" आज हम सभी अपने अधिकारो और असुविधांओंके बारेमे हमेशा बात करते हैं , लेकिन जब बात आती है संघर्ष कि , अपना दायित्व निभाने कि , तब हमेशा बचकर निकलने कि कोशिश करते हैं ! "
हि भारतीय मानसिकता मी माझ्या अनेक लढ्यांमध्ये पाहिली आहे .
काय गम्मत आहे ना , भारतीय नागरिकाला समाजरूपवर / समाजचेहरावर ( FACEBOOK वर ) , कसं काय / काय मग समूहांवर ( WHATSAPP GROUPS वर ) , GOOD MORNING , GOOD AFTERNOON , GOOD EVENING , GOOD NIGHT करायला , अनेक संदेश पुढे पाठवायला ( MESSAGES FORWARD ) करायला , अनेकांच्या संदेशांवर वेगवेगळी चिन्हांकृत आकृत्या ( EMOJI ) द्यायला , निरर्थक प्रश्नांवर वादावादी करायला भरपूर वेळ आहे , ऊर्जा आहे हे अगदी रोटी , कपडा मकान सारखं महत्वाचं वाटतं .
हीच आजच्या भारतीयांची मानसिकता यासोबत जोडलेल्या एका व्यंगचित्रातून अप्रतिमपणे , नेमकी व्यक्त केली आहे .
ते व्यंगचित्र पाहिल्यावर हे सगळं वाचल्यावर , तुमचे उंचावलेले हात का खाली आले चेहरा असा का पडला ?
सुदैवाने मी मात्र माझ्या परिने अनेक बदल घडवून आणण्यासाठी झगडतोय. I AM TRYING
TO CHANGE ,  AS I  WANT CHANGE , AND I AM PROUD THAT I COULD CHANGE FEW THINGS.

Wednesday, January 8, 2020

PAYTM KYC - सावधान ,

PAYTM KYC - सावधान ,

जाळ्यात फसू नका . मी फसणार होतो , पण सुदैवाने सतर्कतेमुळे वाचलो .