Saturday, October 12, 2019

मराठीची अधोगती

" मराठीची अधोगती "

१. ) एका निमंत्रण पत्रिकेत " पावसाच्या अतिवृष्टीमुळे स्थगित करण्यात आलेला . . . . . "  असे एक महाभयंकर मराठी वाक्य लिहिले होते.   अतिवृष्टी हि पावसामुळेच होत असते , कधीही  अतिवृष्टी उन्हामुळे वा थंडीमुळे होत नसते . " अति पावसामुळे "  अथवा  "  अतिवृष्टीमुळे "  हे योग्य मराठी आहे  . 

२. ) एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकातील एका बातमीतील ओळ येथे देत आहे " त्यानंतर त्याने त्याच पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली ."    " स्वतः आत्महत्या " हे कुठलं मराठी ? एखाद्याची  आत्महत्या कधीच दुसरी व्यक्ती करीत नसते . तसं झालं तर त्याला खून म्हणतात . 

हे आजचं मराठी ? मराठीची केवढी हि अधोगती . 

फेसबुकवरील काही व्यक्तीचं आधुनिक मराठी वाचून तर मला  एवढं वाईट वाटत कि त्यावर देखील कधीतरी विस्तुतपणे लिहीणार आहे . मराठी भाषेला लोप पावण्यापासून वाचविण्याचे माझे प्रयत्न चालू राहणार आहेतच . 



मराठी माणसांनो शुद्ध मराठी लिहा , शुद्ध मराठी बोला .  



No comments:

Post a Comment