Monday, October 28, 2019

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप
नरक चतुर्थी हा तसा दिवाळी सणाचा पहिला दिवस . अभ्यंग स्नान , फटाकड्या , फराळ , दिवाळी पहाट , तरुणाई नटून ठाण्याच्या राम मारुती मार्गावर व्यस्त हा असा काहीसा तुमचा ,आमचा दिवस सुरु होतो , पण आपले वाहतूक पोलीस बंधू , भगिनी मात्र वाहतूक सुरळीत सुरु राहावी म्हणून अक्षरशः पहाटेपासूनच रस्त्यावर , नाक्यावर वाहतूक नियंत्रण करण्यात व्यस्त असतात . त्यांच्या शब्दकोशात अभ्यंग स्नान , फटाकड्या , फराळ , दिवाळी पहाट हे असं काही नसतं . त्यांच्यासाठी कर्मभूमी हेच त्यांचे जणू घर असते . त्यांना जर त्यांच्या कर्मभूमीमध्ये दिवाळी फराळ दिला तर त्यांची दिवाळी थोडीशी सुखकर होईल हि कल्पना सुचली , आणि त्या कल्पनेला ठाणे येथील डॉक्टर सौ . मृदुला भावे यांनी सक्रिय पाठिंबा दिला व थोडासा खर्चाचा भर देखील उचलला . डॉक्टर सौ . मृदुला भावे यांनी फराळाची जबाबदारी घेतली . पाकिटात चिवडा , चकल्या , लाडू , करंजी / गोडे शंकरपाळी असा विविध फराळ होता . या फराळाच्या पिशवीत " वाहतूक पोलीस मित्र " हि माझी कविता देखील होती . ( ती कविता या सोबत जोडत आहे . )
रविवार , २७ ऑक्टोबर , २०१९ रोजी , नरक चतुर्थी , लक्ष्मी पूजन च्या दिवशी सकाळी हा फराळ वाटपाचा कार्यक्रम ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार श्री. संजय केळकर साहेब यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त - वाहतूक - ठाणे यांच्या तीन हाथ नाका या कार्यालयापासून झाली . त्यावेळी श्री. अविनाश पालवे - सहाय्यक पोलीस आयुक्त , वाहतूक - ठाणे हजर होते , त्याचप्रमाणे दत्तात्रय घाडगे , सौ. मनीषा वायंगणकर , सौ. मीनल उत्तूरकर , श्री. भावेश जर्दोश , कुमार यश जर्दोश , कुमारी तनिषा शाह , सुमेध शाह , शामली दोषी हजर होते.
त्यानंतर ठाणे वाहतूक शाखेच्या खालील चौक्यांमध्ये जाऊन , तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले .
१. ) कासारवडवली वाहतूक पोलीस चौकी - सौ . अनुजा घाडगे - सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले
२.) कापूरबावडी वाहतूक पोलीस चौकी - कोणी वरिष्ठ अधिकारी नव्हते त्यामुळे तेथील वाहतूक पोलिसांनाच फराळ वाटप करण्यात आले
३.) राबोडी वाहतूक पोलीस चौकी - कोणी वरिष्ठ अधिकारी नव्हते त्यामुळे तेथील वाहतूक पोलिसांनाच फराळ वाटप करण्यात आले
४.) विटावा , कळवा वाहतूक पोलीस चौकी - श्री. मनोहर आव्हाड - पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले
५.) ऐरोली , नवी मुंबई , श्री. बी एन औटी - पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले .
त्याचप्रमाणे रस्त्यावर , नाक्यावर दिसलेल्या वाहतूक पोलिसांना देखील फराळ वाटप करण्यात आले.
वाहतूक पोलिसांशी संवाद साधला तेंव्हा त्यांनी यापुढे शक्य असेल तेंव्हा प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील मुखवटा ( MASK ) देखील देण्यास सांगितले . मी ३ वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसानिमित्त ठाणे वाहतूक पोलिसांना प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील मुखवटा व ध्वनी प्रदूषणातून वाचण्यासाठी कर्ण बूच ( EAR PLUG ) यांचे वाटप केले होते .
हे वाचून / पाहून काही जागरूक नागरिक जर पुढे आले तर वाहतूक पोलिसांना आपण प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील मुखवटा वाटप करून आपले सामाजिक ऋण थोड्याफार प्रमाणात फेडू शकतो . कोणाला या अश्या व इतर आगळ्या वेगळ्या उपक्रमात सामील व्हायचे असेल तर सत्यजित शाह - ९८२११५०८५८ , ७०४५००१३४० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा .
फराळ वाटपानंतर वाहतूक पोलिसांच्या चेहऱ्यावरील हास्य , समाधान पाहून हि सगळी मेहनत , धावपळ फळली असे वाटले .
कार्यक्रमाची काही छायाचित्रे यासोबत जोडत आहे .











No comments:

Post a Comment