Wednesday, July 31, 2019

आमदार आमच्या घरी - थोर व्यक्ती येती घरा , तोचि दिवाळी , दसरा !

" आमदार आमच्या घरी "
" आमदार आपल्या भेटीला " या एका अनोख्या उपक्रमाद्वारे ठाणे शहराचे लोकप्रिय , सुशिक्षित , सुसंस्कृत असे आमदार श्री. संजय केळकर साहेब आम्ही राहत असलेल्या " हाईड पार्क " संकुलात आले होते .
त्यांना अगोदरच आमच्या घरी येण्याबद्दल विनंती केली होती . कार्यक्रम संपल्यावर आमदार साहेब काहीही आढे वेढे न घेता आमच्या घरी आले . घरी आल्या आल्या माझ्या बायकोने मला दम दिला कि केळकर साहेबांसमोर राजकारण व सामाजिक प्रश्न याबद्दल काहीही बोलायचे नाही . केळकर साहेब त्यावर छानसे हसले .
त्यांनी अल्पोपहार केला , चहा घेतला , घरच्यांशी गप्पा मारल्या व पुन्हा येण्याचं आश्वासन देखील दिलं . ते असे समाजकारणी , राजकारणी आहेत कि दिलेली आश्वासनं पाळतात.
त्यांची साधी राहणी , उच्च विचारसरणी , त्यांचा शांतपणा , त्यांचं वाचन , त्यांचं सखोल द्यान , बोलण्यात मग्रुरी नाही , बोलतांना शिव्या , अपशब्द नाहीत , उगाच बडेजावपणा नाही , उगाच पांढरा पेहराव नाही , हाताच्या दहा बोटात सोन्याच्या २० अंगठ्या नाहीत , गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी नाही , उगाचच ३ / ४ भ्रमणध्वनी यंत्रे नाहीत , एकही अंगरक्षक नाही , उगाचच चमचेरूपी कार्यकर्त्यांची फौज नाही , साधी चार चाकी , वाहन क्रमांक नियमाप्रमाणे लिहिलेला , वाहनाला काळ्याकुट्ट काचा नाहीत . हे सगळं तुम्हाला नवीन असेल , पण ठाणेकरांना हे असे केळकर साहेब मनःपूर्वक आवडतात .
असे सुशिक्षित , सुसंस्कृत " आमदार आमच्या घरी " आले , त्यांनी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या .
आम्ही धान्य झालो .
आम्ही सुदैवी आहोत कारण प्रकाश आमटे , सौ . मंदाताई आमटे , सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे ( संपादीका - नवाकाळ ) आणि आमदार संजय केळकर साहेब अशी थोर व्यक्तिमत्व आमच्या घरी आलेली आहेत.
थोर व्यक्ती येति घरा , तोचि दिवाळी , दसरा !





आमदार आपल्या भेटीला

" आमदार आपल्या भेटीला " 

ठाणे शहराचे लाडके , सुशिक्षित , सुसंस्कृत असे आमदार श्री. संजय केळकर साहेब हे बहुतेक भारत देशातील एकमेव असे आमदार असतील कि जे  " आमदार आपल्या भेटीला " या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या मतदार संघातील विविध रहिवासी इमारतींमध्ये जाऊन रहिवाश्यांनी भेट घेतात. हे वाचून फेसबुक वरील बहुसंख्य " प्रतिक्रियावादी " भारतीय नागरिक असे म्हणतील कि महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक जवळ आल्या म्हणून हि सगळी नाटकं असतील . मला अश्या  " प्रतिक्रियावादी " भारतीय नागरिकांची  कीव  येते , व त्यांच्याबद्दल वाईट देखील वाटतं कारण त्यांची उडी घरी बसून फक्त " प्रतिक्रिया " देण्यापुरतीच असते ( अश्यांना " उंटावरून शेळ्या राखणे " प्रवृत्तीच्या व्यक्ती असे मी म्हणतो ) . 

असो , केळकर साहेब हे सन २०१४ साली विधानसभेची निवडणूक भरघोस मतांनी निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशीच काही रहिवासी संकुलात जाऊन मतदानाचे आभार मानायला गेले होते .  त्या  नंतर त्यांनी  " आमदार आपल्या भेटीला " हा उपक्रम चालू केला होता . रविवार , २८ जुलै, २०१९ रोजी ते मी राहत असलेल्या घोडबंदर रॊड येथील " हाईड पार्क "  रहिवासी संकुलात " आमदार आपल्या भेटीला " हा उपक्रमांतर्गत आले होते . ती त्यांची त्या उपक्रमातील ९४ वी भेट होती . 

कार्यक्रमाच्या सुरवातीला मी थोडसं बोललो . त्यानंतर केळकर साहेबांनी उपस्थितांना त्यांच्या समस्या मांडण्यास सांगितल्या . काहींनी त्या निवेदनाद्वारे मांडल्या , तर काहींनी त्या तोंडी मांडल्या . त्याच वेळी केळकर साहेबांसोबत आलेल्या  स्वप्नाली साळवी ताई या कार्यकर्त्या  संक्षिप्तपणे उपस्थितांचे म्हणणे टिपत होत्या . श्री. रवी रेड्डी हे आलेले एक कार्यकर्ते देखील महत्वाच्या बाबी टिपत होते. 

सगळी निवेदने देऊन झाल्यावर मग केळकर साहेबांनी प्रत्येक विचारलेल्या गेलेल्या प्रश्नावर , समस्येवर ( अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते पथकर पर्यंत  )  मुद्देसूद उत्तर दिले . केळकर साहेबांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली कि नागरिकांनी एकत्र येऊन दबाव गट ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " PRESSURE GROUP " )  बनवावा  म्हणजे अनेक समस्यांचे निवारण लवकर होऊ शकते . 

काळे काका या एका  जेष्ठ व जागरूक  नागरिकांनी केळकर साहेबांचा श्रीफळ व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार , लेखक , शिल्पकार श्री. मनोहर सप्रे यांचा ग्रंथसंग्रह देऊन सत्कार केला . 

नगरसेवक , आमदार , खासदार अश्या अनेक आदरणीय  , माननीय , वंदनीय , पूजनीय व्यक्ती निवडून आल्यावर पुढील निवडणुकीपर्यंत फक्त भल्या मोठ्ठ्या अश्या अनधिकृत फलकांवर दिसत असतात . पण आमदार केळकर साहेबांना असं प्रत्यक्षात पाहिल्यावर अनेक उपस्थितांना कौतुक व आनंद झाला होता.  

आपल्या भेटीला ( निवडणूक सोडून ) कधी तरी कोणता नगरसेवक , आमदार , खासदार आला होता का ?  याचे उत्तर मला देऊ नकात कारण ते सगळ्यांना ठाऊक आहे.  







Friday, July 26, 2019

बहिष्कार क्लासेस

" बहिष्कार क्लासेस "
" नवा काळ " च्या २७ जुलै, २०१५ च्या अंकात माझा " बहिष्कार क्लासेस " हा एक उपहासात्मक लेख ( SATIRE ) छापून आला आहे. या लेखाबद्दल आपला लेखी अभिप्राय ( चुका कळविल्या तर जास्त आनंद होईल ) कळविलात तर पुढच्या लेखात सुधारणेचा प्रयत्न करेन. आपण हा लेख आपल्या GROUP मध्ये FORWARD केलात तर अनेकांपर्यंत हे पोहोचेल. आपण प्रत्येक गोष्ट सहन करतो हे चुकीचे आहे. उठा " जागरूक नागरिक " व्हा.
त्यासोबत जे व्यंगचित्र आहे ( जे जागेअभावी नीट दिसत नाही ) ते माझा FB मित्र व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार , बोलक्या रेषा चे जनक श्री. घनश्याम देशमुख याने खास या लेखासाठी रेखाटले आहे. या मार्मिक व्यंगचित्रासाठी . घनश्याम देशमुख यांचे याद्वारे आभार मानू इच्छितो.
मी तो लेख व ते व्यंगचित्र आपल्यासाठी यासोबत देत आहे.
हा लेख जर चुकून नीट वाचता नाही आला तर मला satyajitshah64@gmail.com या ई मेल वर कळवा मी तुम्हाला WORD मध्ये पाठवून देईन.