Saturday, December 28, 2019

"आरंभ " छायाचित्र प्रदर्शनाला आमदार श्री. संजय केळकर साहेबांची भेट

"आरंभ " छायाचित्र प्रदर्शनाला आमदार श्री. संजय केळकर साहेबांची भेट 
नुकतेचं श्री. स्वप्नील पवार यांच्या " रानवाटा " तर्फे २० वे "आरंभ " छायाचित्र प्रदर्शन कला भवन , ठाणे पश्चिम येथे संपन्न झाले . त्या प्रदर्शनात मी स्वतः टिपलेली १६ छायाचित्रे देखील मांडलेली / दर्शविलेली / प्रदर्शित केलेली  होती . 
अतिशय व्यस्त असा दिनक्रम असून देखील माझ्या सारख्याच्या म्हणजेच  एका धडपड्या , जागरूक नागरिकांच्या निमंत्रणाला  मान देऊन , ठाणे शहराचे सुशिक्षित , सुसंस्कृत व लोकप्रिय आमदार श्री. संजय केळकर साहेब यांनी भेट दिली .
माझी छायाचित्रे  तर त्यांनी व्यवस्थितपणे पाहिलीच , पण इतर छायाचित्रकारांची देखील छायाचित्रे त्यांनी पाहिली व पुढील कार्यक्रमाला ते निघून गेले . 
मी टिपलेली छायाचित्रे केळकर साहेबांना मी समजावून सांगताना टिपलेले हे छायाचित्र . सोबत  महेश विनेरकर देखील आहे . 
#AARAMBH #RAANVATA