पिसाळलेल्या कुत्रीचा सात बालकांना चावा - महाराष्ट्र टाईम्स - ८ डिसेंबर ,२०१८
उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने तोडले सात मुलांचे लचके - ठाणे वैभव - ८ डिसेंबर ,२०१८
या दोन्ही बातम्या येथे देत आहे . हे येथे देण्याचे मुद्दाम कारण म्हणजे , भारत या देशात " मानव मरो , पण भटका कुत्रा जगो " असं काहीसं घडतंय .
प्राणि मित्र , प्राणी मैत्रिणी यांच्या कडून प्राणी प्रेमाचा ( या प्राणी प्रेमात फक्त आणि फक्त भटके कुत्रेच समाविष्ट आहेत ) .
जरा खालील माहिती वेळात वेळ काढून वाचा :
- आजच्या घडीला ठाणे महानगर पालिका हद्दीत दर दिवसाला अंदाजे १०० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ८,००० ते ९,००० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- भारत देशात दररोज अंदाजे १,६०,००० ते १,७०,००० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- श्वान दंशाच्या या घटनांपैकी अंदाजे ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात .
- अनेक निरपराध मानव प्राणी जखमी होताहेत , मृत्युमुखी पडताहेत .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
https://fightofacommonman.blogspot.com/
No comments:
Post a Comment