Sunday, December 23, 2018

भटक्या कुत्र्यांची दहशत - नवी मुंबई

भटक्या कुत्र्यांची दहशत 

नवी मुंबई , महाराष्ट्र राज्य , भारत देश येथील "सत्य"स्थिती सांगणारी हि बातमी . 

२३ डिसेंबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रात आलेली बातमी या सोबत देत आहे . 

भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध मी गेली ९ ते १० वर्षे अखंड पणे लढतच आहे . या बातमीवरून वरून या प्रश्नाचे गांभीर्य प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घ्यायला हवे.
पुन्हा सांगतो :

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Saturday, December 22, 2018

LADAKH WILDLIFE GOING TO FERAL DOGS

“ LADAKH WILDLIFE GOING TO FERAL DOGS “
या शीर्षकाची एक बऱ्यापैकी मोठ्ठी बातमी . १९ डिसेम्बर , २०१८ च्या THE TIMES OF INDIA या एका सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकात छापून आली आहे
भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध मी गेली ९ ते १० वर्षे अखंड पणे लढतच आहे . आत्ता तर लडाख येथे देखील हा प्रश्न भेडसावीत आहे यावरून या प्रश्नाचे गांभीर्य प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घ्यायला हवे.
पुन्हा सांगतो :
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Saturday, December 8, 2018

ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश - सकाळ वृत्तसेवा - ०९.१२.२०१८



ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्वानदंश

सकाळ वृत्तसेवा
03.44 AM
  1. Home 
  2. Mumbai 
  3. In Thane 60 People Dog Bite

ठाणेमहापालिकेकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण केले जाते; पण पाच वर्षांहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू असूनही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात पोचल्याने निर्बीजीकरणाबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवसाला सरासरी 60 जणांना भटका कुत्रा चावण्याच्या घटना घडत आहेत

उल्हासनगरमध्ये कुत्र्याने सात मुलांना चावा घेतल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत; मात्र पालिका रुग्णालयात उपचार घेतले तरच पालिकेकडे याची नोंद होते. या नोंदीनुसार दिवसाला केवळ पाच जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याचा दावा केला जात आहे; पण प्रत्यक्षात हा आकडा 60 आहे, असा दावा या विषयावर पाठपुरावा करणारे दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी केला आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर भटक्या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे. गेल्या महिन्यात कुत्र्याने याच कुटुंबातील आर्यन (वय 10) याच्या पाठीचा चावा घेतला. तेव्हापासून आर्यनच्या मनात कुत्र्यांची भीती कायम आहे, असे शहा यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवरील हल्ले वाढले आहेत. श्वानदंशाच्या घटनांपैकी 80 टक्के घटनांमध्ये तीन ते आठ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले
एक लाख भटकी कुत्री 
ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाखापर्यंत असावी, असा अंदाज शहा यांनी वर्तवला आहे. कारण महापालिकेच्या दाव्यानुसार अद्याप शहरात 40 हजार भटकी कुत्री आहेत; मात्र त्याच वेळी दीड वर्षापासून कुत्र्यांचे सर्वेक्षण झालेले नसल्याने भटक्या कुत्र्यांची निश्चित संख्या सांगणे पालिका प्रशासनाला शक् झालेले नाही



पिसाळलेल्या कुत्रीचा सात बालकांना चावा / उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने तोडले सात मुलांचे लचके


पिसाळलेल्या कुत्रीचा सात बालकांना चावा - महाराष्ट्र टाईम्स - डिसेंबर ,२०१८
उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने तोडले सात मुलांचे लचके - ठाणे वैभव - डिसेंबर ,२०१८

या दोन्ही बातम्या येथे देत आहे . हे येथे देण्याचे मुद्दाम कारण म्हणजे , भारत या देशात " मानव मरो , पण भटका कुत्रा जगो " असं काहीसं घडतंय .

प्राणि मित्र , प्राणी मैत्रिणी यांच्या कडून प्राणी प्रेमाचा ( या प्राणी प्रेमात फक्त आणि फक्त भटके कुत्रेच समाविष्ट आहेत ) .

जरा खालील माहिती वेळात वेळ काढून वाचा :

- आजच्या घडीला ठाणे महानगर पालिका हद्दीत दर दिवसाला अंदाजे १०० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ,००० ते ,००० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- भारत देशात दररोज अंदाजे ,६०,००० ते ,७०,००० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- श्वान दंशाच्या या घटनांपैकी अंदाजे ८० % घटनांमध्ये ते या वयोगटातील बालके सापडतात .
- अनेक निरपराध मानव प्राणी जखमी होताहेत , मृत्युमुखी पडताहेत .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

https://fightofacommonman.blogspot.com/