" ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश "
आज , शनिवार , ८ जुलै, २०१७ रोजी सकाळी " ठाणे वैभव " नावाचे ठाणे येथून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र वाचण्यास घेतले आणि एक फार मोठ्ठा धक्का बसला . पहिल्याच पानावर " ठाणे रुग्णालयात अँटी रेबीजचा तुटवडा " असा मथळा असलेली एक धक्कादायक बातमी वाचली .
या बातमीच्या सुरवातीलाच " ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश " अशी एक धक्कादायक आकडेवारी देखील वाचली . याचाच अर्थ " ठाणे शहारत दररोज अंदाजे ३८ / ३९ व्यक्तींना श्वान दंश होतो " हे मी नाही सांगत तर हे शासकीय आकडेवारीनुसार कळते.
खरं तर हि आकडेवारी शासन फक्त शासकीय रुग्णालये , आरोग्य केंद्रे यांच्याकडून घेते . यात खासगी रुग्णालये , खाजगी डॉक्टर यांच्या कडील आकडेवारी विचारात घेतलेली नसते . खरं तर ती आकडेवारी देखील विचारात घेतली तर " ठाणे शहारत दररोज अंदाजे ८० / ९० व्यक्तींना श्वान दंश होत असतो " . या आकडेवारीत काहीही अतिशयोक्ती नाही.
श्वान दंश , रेबीज , हे एवढेच भटक्या कुत्र्यांकडून होत नसतात तर , त्यांच्या मूत्र , व विष्ठे मुळे लेप्टो स्पायरोसिस हा जीवघेणा रोग देखील पसरतो . हे लक्ष्यात घ्या कि डोंबिवली सारख्या शहरात दररोज अंदाजे अडीच टन एवढी भटक्या कुत्र्यांची विष्ठा भर रस्त्यात , व इतर सार्वजनिक ठिकाणी जमा होते.
हा एक प्रश्न गेली ६ ते ७ वर्षे अथकपणे गल्ली ते दिल्ली नेऊन देखील शासन दरबारी आमच्या सारख्यांचे ( मी , डॉक्टर आनंद हर्डीकर , डॉक्टर उदय कुलकर्णी , निलेश आंबेकर ) हाल " कुत्रे " देखील खात नाहीत .
भारतीय नागरिक खालील गोष्ट नेहमी दुर्लक्षितो हि एक फार मोठी दुर्दैवी सत्य स्थिती आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment