"नियम पोलिसांनी पाळायचे नसतात ?"
मोटार वेहिकल ऍक्ट मधील “ MVA 129 / 177 “ , या कलमाप्रमाणे , दुचाकी चालविताना प्रत्येक भारतीय नागरिकाने शिरस्त्राण घालणे हे बंधनकारक आहे. शिरस्त्राण न घालणे हा एक दंडनीय अपराध / गुन्हा आहे.
ठाणे शहरात अनेक खाकी गणवेशधारी पोलीस , त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस असे शिरस्त्राण न घालता दुचाकी चालविताना सर्रासपणे आढळून येतात .
गम्मत म्हणजे अश्या नियमांचे पालन ना करणाऱ्या भारतीय नागरिकांकडे वाहतूक पोलिसांचे कधीच लक्ष्य जात नाही.
ठाणे शहरात शिरस्त्राण न घालता दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांना दंड कोण करणार ?
पोलिसांना देखील सगळे नियम लागू आहेत हे त्यांना कोण सांगणार ?
मार्च , २०१३ पासून माझी पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे व इतर देखील नियम पाळावेत यासाठी लढाई चालू आहे.
Evil
Triumphs When Good People Sit Quiet
Stand up
for what is right , Even if you’re standing alone !
No comments:
Post a Comment