Tuesday, July 31, 2018
Sunday, July 29, 2018
मुंबई मध्ये सोळा वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू - " भटक्या कुत्र्यांच्या मूत्रामुळे देखील लेप्टो स्पायरोसिस हा एक जीवघेणा रोग होतो "
मुंबई मध्ये सोळा वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू
हि बातमी , रविवार , २९ जुलै, २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात आली आहे.
हि एक अतिशय दुर्दैवी व हृदयद्रावक घटना आहे.
या अगोदर म्हणजे जून, २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात मुंबई मध्ये तीन मानव प्राण्यांचा लेप्टो ने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुराव्यासाठी ( http://www.freepressjournal.in/health/leptospirosis-claims-two-lives-in-mumbai-heres-all-you-need-to-know-about-the-bacterial-disease/1307036 ) या संकेतस्थळावरील हि माहिती वाचा .
" भटक्या कुत्र्यांच्या मूत्रामुळे देखील लेप्टो स्पायरोसिस हा एक जीवघेणा रोग होतो " . हे मी मनाचं नाही सांगत .
तुम्हाला खोटं वाटत असेल तर " https://www.healthline.com/health/weils-disease " या संकेतस्थळावरील हि माहिती वाचा .
"Weil’s disease is a severe form of leptospirosis. This is a type of bacterial infection. It’s caused by Leptospira bacteria.
You can contract it if you come into contact with the urine, blood, or tissue of animals or rodents that are infected with the bacteria. These may include:
- cattle
- pigs
- dogs
- rats "
मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत अंदाजे १,५०,००० च्या वर भटके कुत्रे असण्याची दाट शक्यता आहे.
मी भटक्या कुत्र्यांच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध गेली अंदाजे १० वर्षे गल्ली ते दिल्ली लढत आहे , पण दुर्दैवाने बाकी भारतीयांचा या लढाईत पाठिंबा , सहभाग नसल्याने , शासन या गहाण प्रश्नाकडे लक्ष्य देत नाही .
Thursday, July 26, 2018
कायद्याच्या रक्षकांना वाहतुकीचे नियम लागू नाहीत ?
कायदा रक्षकांना नियम लागू नाहीत का ?
Satyajit Shah | B-24, Aachary Vinoba Bhave Rd, Sector 4, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, India | Updated:
MVA129/177 प्रमाणे दुचाकी चालविताना शिरस्त्राण न घालणे हा एक दंडनीय गुन्हा आहे . हो पण कायद्याचे रक्षक , पोलिसांना हा कायदा लागू नाही का ?
नियम कशासाठी ? कशासाठी ?
पोलिसांनी न पाळण्यासाठी ?
https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/do-rules-apply-to-law-enforcement/articleshow/65141663.cms?utm_source=fb&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral
Wednesday, July 25, 2018
ठाणे जिल्हा परिषदेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र
ठाणे जिल्हा परिषदेचे श्वान निर्बिजीकरण केंद्र
हि बातमी तर थोडीशी सकारात्मक वाटते , पण शासकीय कामांचा वेग , गती यांचा इतिहास पाहून हि १५ वर्षीय अथवा २५ वर्षीय योजना ठरेल अशी भीती वाटते .
अजून एक दुर्दैव म्हणजे जर चुकून हे खरंच अमलात आले तरीही ते ठाणे जिल्ह्यात होणार आहे ,म्हणजेच ठाणे महानगर पालिका हद्दीसाठी बहुतेक नसणार .
Saturday, July 21, 2018
Tuesday, July 17, 2018
वाहतुकीचे नियम राजकीय पक्ष्यांना / राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांना लागू नाहीत का ?
वाहतुकीचे नियम राजकीय पक्ष्यांना / राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांना लागू नाहीत का ?
( हि बातमी " ठाणे वैभव " या दैनिकाच्या १८ जुलै, २०१८ च्या अंकात छापून आली आहे )
MVA १२९/१७७ - दुचाकी चालविताना शिरस्त्राण न घालणे हा एक दंडनीय गुन्हा आहे
माझ्या माहितीप्रमाणे सर्व भारतीय नागरिकांना वाहतुकीचे सर्व नियम सम समान लागू आहेत.
वन मॅन आर्मी चा संदेश " जागते रहो " - ठाणे वैभव
वन मॅन आर्मी चा संदेश " जागते रहो "
ठाणे येथून प्रकाशित होणाऱ्या " ठाणे वैभव " या दैनिकाच्या १७ जुलै, २०१८ च्या अंकात वन मॅन आर्मी चा संदेश " जागते रहो " या मथळ्याखाली छापून आलेली बातमी येथे देत आहे .
यातील पहिली ओळ " पोलीस दादा हेल्मेट विना दुचाकी चालविताय ? सावधान ! हि अशी वाचावी . कारण पोलिसांनी सगळे वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी मी मार्च, २०१३ पासून एकटाच लढतोय.
असो , एक नम्र विनंती आहे , या माझ्या माहितीला ( POST ला ) , फक्त LIKE करू नकात , कारण हि माहिती मी फक्त LIKE मिळविण्यासाठी नाही दिली आहे , पण हे वाचून काही व्यक्ती तरी वन मॅन आर्मी बनतील आणि असे अनेक जागरूक भारतीय नागरिक मिळून , एक प्रकारचा दबाव गट तयार व्हावा ह्याच आशे पोटी हि माहिती येथे दिली आहे.
मी वर वरच्या LIKE साठी हपापलेला नाही .
Monday, July 16, 2018
Thursday, July 12, 2018
Tuesday, July 10, 2018
कुत्र्यानं २० वेळा चावा घेतला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
कुत्र्यानं २० वेळा चावा घेतला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
नाशिक शहरात एका मुलीला तिच्या राहत्या घरासमोर एका कुत्र्याने जवळपास २० वेळा चावा घेतल्याची घटना उघडकीस आलीय.
Updated: Jul 10, 2018, 06:51 PM IST
Sunday, July 8, 2018
" Future Google Pot Hole Maps " - Sort of a Cartoon under series " Yes, I Said it " by Satyajit A Shah
" Future Google Pot Hole Maps " - Sort of a Cartoon under series "
Yes, I Said it " by Satyajit A Shah .
Looking at the number of Pot Holes in Road , in future Google may launch
new navigation system " Google Pot Hole Maps " .
Difference from current Google Maps will be that it will show exact live location of Pot
Holes in your way.
Please go through this Map as ENVISAGED by me is actually from our office in Airoli to Thane via Patni Computers
, Vitawa.
As per current Actual Google Maps
, A triangle is also shown in this my Cartoon . Which depicts
position of our moving vehicle. Also From where we started our travel is shown by a symbol where sector 4 is written
.
At the right hand upper corner I have shown logo of future " Google
Pot Hole Maps ". It is similar to current logo of " Google Maps
" , but with a difference that in the new Logo , pot holes are shown
in the two roads.
Few days back ONLY we travelled
via this road. There were many Big , Big Pot Holes & it triggered me for
this Cartoon " Future Google Pot Hole Maps " .
Will Government Wake Up ?
Saturday, July 7, 2018
ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश / " ठाणे रुग्णालयात अँटी रेबीजचा तुटवडा "
" ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश "
आज , शनिवार , ८ जुलै, २०१७ रोजी सकाळी " ठाणे वैभव " नावाचे ठाणे येथून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र वाचण्यास घेतले आणि एक फार मोठ्ठा धक्का बसला . पहिल्याच पानावर " ठाणे रुग्णालयात अँटी रेबीजचा तुटवडा " असा मथळा असलेली एक धक्कादायक बातमी वाचली .
या बातमीच्या सुरवातीलाच " ठाणे शहरात वर्षभरात १४,००० ( चौदा हजार ) श्वान दंश " अशी एक धक्कादायक आकडेवारी देखील वाचली . याचाच अर्थ " ठाणे शहारत दररोज अंदाजे ३८ / ३९ व्यक्तींना श्वान दंश होतो " हे मी नाही सांगत तर हे शासकीय आकडेवारीनुसार कळते.
खरं तर हि आकडेवारी शासन फक्त शासकीय रुग्णालये , आरोग्य केंद्रे यांच्याकडून घेते . यात खासगी रुग्णालये , खाजगी डॉक्टर यांच्या कडील आकडेवारी विचारात घेतलेली नसते . खरं तर ती आकडेवारी देखील विचारात घेतली तर " ठाणे शहारत दररोज अंदाजे ८० / ९० व्यक्तींना श्वान दंश होत असतो " . या आकडेवारीत काहीही अतिशयोक्ती नाही.
श्वान दंश , रेबीज , हे एवढेच भटक्या कुत्र्यांकडून होत नसतात तर , त्यांच्या मूत्र , व विष्ठे मुळे लेप्टो स्पायरोसिस हा जीवघेणा रोग देखील पसरतो . हे लक्ष्यात घ्या कि डोंबिवली सारख्या शहरात दररोज अंदाजे अडीच टन एवढी भटक्या कुत्र्यांची विष्ठा भर रस्त्यात , व इतर सार्वजनिक ठिकाणी जमा होते.
हा एक प्रश्न गेली ६ ते ७ वर्षे अथकपणे गल्ली ते दिल्ली नेऊन देखील शासन दरबारी आमच्या सारख्यांचे ( मी , डॉक्टर आनंद हर्डीकर , डॉक्टर उदय कुलकर्णी , निलेश आंबेकर ) हाल " कुत्रे " देखील खात नाहीत .
भारतीय नागरिक खालील गोष्ट नेहमी दुर्लक्षितो हि एक फार मोठी दुर्दैवी सत्य स्थिती आहे.
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Friday, July 6, 2018
"नियम पोलिसांनी पाळायचे नसतात ?"
"नियम पोलिसांनी पाळायचे नसतात ?"
मोटार वेहिकल ऍक्ट मधील “ MVA 129 / 177 “ , या कलमाप्रमाणे , दुचाकी चालविताना प्रत्येक भारतीय नागरिकाने शिरस्त्राण घालणे हे बंधनकारक आहे. शिरस्त्राण न घालणे हा एक दंडनीय अपराध / गुन्हा आहे.
ठाणे शहरात अनेक खाकी गणवेशधारी पोलीस , त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस असे शिरस्त्राण न घालता दुचाकी चालविताना सर्रासपणे आढळून येतात .
गम्मत म्हणजे अश्या नियमांचे पालन ना करणाऱ्या भारतीय नागरिकांकडे वाहतूक पोलिसांचे कधीच लक्ष्य जात नाही.
ठाणे शहरात शिरस्त्राण न घालता दुचाकी चालविणाऱ्या पोलिसांना दंड कोण करणार ?
पोलिसांना देखील सगळे नियम लागू आहेत हे त्यांना कोण सांगणार ?
मार्च , २०१३ पासून माझी पोलिसांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे व इतर देखील नियम पाळावेत यासाठी लढाई चालू आहे.
Evil
Triumphs When Good People Sit Quiet
Stand up
for what is right , Even if you’re standing alone !
Wednesday, July 4, 2018
" YES , I SAID IT "
" YES , I SAID IT "
- My Latest Satire ( Sort of ACartoon ) on today's decision by MIT School , Pune , which has come out with many restrictions on students. One of which is wearing only white underwear ( अंतर्वस्त्र ) in School.
For the reason name of my this school in the CARTOON is VIP ( VIP Underwear )
and slogan of school " DISCIPLINE BEGINS FROM UNDERWEAR ).
Subscribe to:
Posts (Atom)