" ठाणे शहरात - पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले चौघांचे लचके / भटक्या कुत्र्यांचा चार जणांना चावा "
२५ एप्रिल च्या " ठाणे वैभव ", " महाराष्ट्र टाईम्स " , " लोकसत्ता " , " HINDUSTAN TIMES " , या वृत्तपत्रातील आलेल्या बातम्या येथे देत आहे.
त्या चार जणांमध्ये एक वर्षाच्या एका बालकाच्या कानाचा लचका कुत्र्याने घेतला , त्यात एक पोलीस दलातील एक महिला देखील आहे .
गेली १० ते १२ वर्षे , मी एक सामान्य ठाणेकर , बिचारा , या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध अश्या वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध व श्वान दंशाच्या भयावह वेगाने वाढणाऱ्या घटनांविरुद्ध मी गल्ली ते दिल्ली लढत आहे .
- ठाणे महानगर पालिका हद्दीत दररोज अंदाजे ७० ते ८० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- भारत देशात दररोज अंदाजे १,४२,००० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
तरीही ९९.९९ % भारतीय नागरिक मात्र चलता असे म्हणून , मुकाट्याने श्वान दंश रुपी प्रसाद ग्रहण करताहेत .
फेसबुक नावाच्या एक प्रभावी सामाजिक माध्यमांद्वारे मी हा प्रश्न अनेक वेळा मांडला .
Evil Triumphs When Good People Sit Quiet
No comments:
Post a Comment