" दोन ओळी " - एक आधुनिक काव्य प्रकार ( ? )
आज काल मी FACEBOOK वर अनेकां नी दोन ओळी लिहिलेल्या पाहतो . म्हणे " दोन ओळी " हा देखील कवितांचा एक आधुनिक प्रकार आहे . ( मी अडाणी , पामर यावर काय बोलणार ? ) .या अगोदर " चार ओळी "( चारोळी ) नावाचा एक " काव्य प्रकार " ( ? ) आला होता म्हणे .
मी हि काही दोन ओळी ( पाचकळ ) लिहिल्या आहेत . माझ्या दृष्टीने त्या पाचकळच आहेत.
१. ) खिडक्याना मी लावली , डासांची जाळी ,
तेंव्हा पासून बसली , डासांची दात खिळी
तेंव्हा पासून बसली , डासांची दात खिळी
२. ) हि माझी माई , ती माझी आई
ती माझी ताई , दोन ओळी लिहायची मला घाई
ती माझी ताई , दोन ओळी लिहायची मला घाई
३. ) इकडून तिकडून जमवले शब्द , खरवडल्या कश्या बश्या दोन ओळी
कळवा तुम्ही नवीन शब्द ,म्हणवून स्वतःला “कवी“ ठोकीन आरोळी
कळवा तुम्ही नवीन शब्द ,म्हणवून स्वतःला “कवी“ ठोकीन आरोळी
हे असेच चालू राहिले तर भविष्यात एक ओळी , त्यानंतर ४ शब्दी्, नंतर २ शब्दी ्" काव्य प्रकार " ( ? ) देखील येऊ शकेल.
भविष्यातील चार शब्दी काव्य ,
आलास काय ?
निघालास काय ?
निघालास काय ?
सत्यजित अ शाह - ठाणे
No comments:
Post a Comment