"
फेसबुक वर वाढदिवसाला
" प्रकटदिन " लिहणाऱ्यांनो "
फेसबुकवर अनेक व्यक्ती स्वतःच्या वाढदिवसादिवशी स्वतःच आज अस्मादिकांचा XX वा प्रकटदिन आहे असे लिहीत असतात . त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती दुसऱ्यांचे छायाचित्र टाकून त्या व्यक्तीला
" प्रकट दिनाच्या " शुभेच्छा असे लिहीत असतात .
एका महिलेने तिच्या फेसबुक वरील पानावर ( FACEBOOK PAGE ) दुसऱ्यांचे छायाचित्र टाकून त्या व्यक्तीला " प्रकटदिनाच्या " शुभेच्छा दिलेल्या पाहिल्या .
हे योग्य नाही हे मला खात्रीपूर्वक वाटत होते , पण याची खातरजमा करण्यासाठी मी याबद्दल मराठी च्या एका प्राध्यापकांना विचारले असता त्यांनी असे सांगितले कि " प्रकटदिन " हा शब्द प्रयोग साधू , संत , महात्मे यांच्या साठीच वापरतात .
सामान्य व्यक्तीने स्वतःला अथवा दुसऱ्या सामान्य व्यक्तीला वाढदिवसा च्या शुभेच्छा देताना " प्रकटदिनाच्या " शुभेच्छा असा शब्दप्रयोग करणे यथोचित नाही.
आपल्याला आठवत असेल कि , उत्तर प्रदेशातील एक राजकारणी महिलेने स्वतःच स्वतःच्या जिवंतपणी स्वतःचे अनेक पुतळे बनविले व स्वतःच त्या स्वतःच्या पुतळ्यांचे अनावरण केले . .हे असे दुसऱ्याला " प्रकटदिन " म्हणणे अथवा स्वतःच स्वतःला प्रकटदिन आहे असे म्हणवून घेणे म्हणजे या पुतळ्यांसारखेच वाटते .
भविष्यात फेसबुकवर काही व्यक्ती स्वतःच्या वाढदिवसादिवशी स्वतःच आज अस्मादिकांची "जयंती" आहे लिहिल्यावर आश्चर्य वाटून घेऊ नकात . त्याचप्रमाणे काही व्यक्ती दुसऱ्यांचे छायाचित्र टाकून त्या व्यक्तीला " जयंतीच्या " शुभेच्छा असे लिहिल्यावर आश्चर्य वाटून घेऊ नकात .
गंमत म्हणजे " अंधानुकरण " केल्यामुळे अनेक मराठी भाषिक व्यक्ती अश्या प्रकारे लिहीत असतात .
काय मग तुमचा " प्रकटदिन " / तुमची " जयंती " केंव्हा आहे ?
वाचावे ते नवलंच !
No comments:
Post a Comment