" भटक्या कुत्र्यांची दहशत "
रविवार , १ ऑक्टोबर , २०१७ रोजी " महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी दैनिकात सानिका कसूरकर या एका पत्रकार भगिनीने लिहिलेला लेख छापून आला आहे तो येथे देत आहे .
दुर्दैवाने तिला आकडेवारी माहित नसावी असे या हा लेख वाचल्यावर दिसून येते .
त्याचप्रमाणे या लेखातील डॉक्टर अविनाश दवे यांना देखील बहुतेक सद्य स्थिती माहित नाही असेच जाणवते .
थोडक्यात हि आकडेवारी वाचा :
- ठाणे महानगरपालिका हद्दीत दररोज अंदाजे ५० ते ७० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो .
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७७ मानव प्राण्यांना श्वान दंश होतो
- भारत या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.
श्वान दंशाच्या घटनांमध्ये ८० % वेळा ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात .
श्वान दंश काय असतो हे या सोबत जोडलेल्या छायाचित्रांवरून कळून येते.
दुर्दैवाने ९९ % भारतीय नागरिक हे कोणत्याही गंभीर प्रश्नावर लढण्याच्या मनस्थिती मध्ये नसतात कारण एकच " माझ्या पिताश्रींचे काय जाते ? " ( आजच्या शुद्ध , प्रचलित मराठीत WHAT GOES MY FATHER"S )