Wednesday, August 29, 2012

SERIOUS ISSUE OF STRAY DOGS

भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद


भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद



Please go through the following news article published on the front page in the Marathi Daily “ LOKSATTA “ dt. 29th Aug. 2012.



This article is self explanatory .



Also please go through the COMMENTS from READERS mentioned below the article.



I do hope that at least now SO CALLED STRAY DOG LOVERS will stop feeding Stray Dogs inside or outside premises of their housing societies and help in reducing the problems because of increase in the POPULATION of STRAY dogs.





Instead EARNESTLY REQUESTING to support , help HUMAN BEINGS rather than just increasing population of STRAY DOGS.



भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद

एका वर्षांत ७८ हजार मुंबईकर श्वानदंशाचे ‘शिकार’

संदीप आचार्य, मुंबई, बुधवार, २९ ऑगस्ट २०१२



शाळेत जाताना वाटेतच लहानग्या रोहनवर अचानक हल्ला करून तीन कुत्र्यांनी त्याला अक्षरश: फाडून काढले. रोहन जीवाच्या आकांताने ओरडत होता, परंतु त्याच्या मदतीला जाण्याची हिंमतही कोणाला झाली नाही. काही वर्षांपूर्वी बोरिवलीतील एका मैदानात चेंडू उचलण्यासाठी धावलेल्या एका बालकाला असेच भटक्या कुत्र्यांनी फाडून काढले होते. श्वानदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त मात्र होऊ शकत नाही. गेल्या वर्षी रत्यावरील कुत्र्यांनी एकटय़ा मुंबईत ७७ हजार ९४१ लोकांना चावे घेतले.



मुंबईत आजघडीला गुंडांपेक्षा भटक्या कुत्र्यांची दहशत अधिक आहे. पहाटेच्या व रात्रीच्या वेळी सायकल व स्कूटर-बाइकस्वारांचा भटके कुत्रे पाठलाग करतात, तेव्हा अपघात हा ठरलेला असतो. अशा अपघातांची नोंद पालिकेत होतच नाही. पूर्वी भटक्या कुत्र्यांना पकडून महापालिका ठार मारत असे. श्वानप्रेमींनी विरोध केल्यानंतर १९९४ पासून हा प्रकार बंद करण्यात आला. त्या वर्षी ३८ हजार ७१८ लोकांचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांची नसबंदी करा, त्यांना नॅशनल पार्कमध्ये सोडून द्या, त्यांच्यासाठी पालिकेने निवारा व्यवस्था करावी, अशा अनेक सूचना नंतर पुढे आल्या. पालिकेच्याच सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुंबईत आजमितीस सुमारे साडेपाच लाख भटके कुत्रे असून, आजपर्यंत दोन लाख ३० हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या नसबंदीपोटी पालिकेने तब्बल सात कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये खर्च केले तरी ही नसबंदी योग्य प्रकारे झाली अथवा नाही, याबाबत ठोसपणे सांगण्यास पालिका अधिकारीही तयार नाहीत. भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचा प्रस्तावही पालिकेच्या सीए विभागाकडे पडूनच आहे.

या विभागाकडे भटके कुत्रे पकडण्यासाठी केवळ तीस कर्मचारी असल्यामुळे निर्बीजीकरणाचे काम किती वेगाने होत असेल याचाही अंदाज येऊ शकतो.



आकडे बोलतात.. २००५ मध्ये ४३ हजार ९८० लोकांना श्वानदंश झाला. २००६ मध्ये ४५ हजार १८३, २००७ मध्ये ५४ हजार ६६१, २००८ मध्ये ६२ हजार ७६३, २००९ मध्ये ७७ हजार ७१२, तर २०१० मध्ये ७७ हजार ४८४ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले. २०११ मध्ये तब्बल ७७ हजार ९४१ मुंबईकर श्वानदंशाचे ‘शिकार’ ठरले. जुलै २०१२ पर्यंत ५० हजार ६४४ लोकांना श्वानदंश झाल्याची नोंद आहे.



आणि हे श्वाननियोजन.. २००९ मध्ये ३६ हजार ९० कुत्र्यांची नसबंदी झाली, तर २०१० साली ४४ हजार ४५ आणि २०११ मध्ये २६ हजार ९६१ कुत्र्यांची नसबंदी केल्याचे पालिकेच्याच अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



Comments



+12 #9 राजेश भोलाणकर 2012-08-29 06:30

हे सगळे भटके कुत्रे द्या पाठवून मनेका गांधी च्या घरी.

Quote





+7 #8 Shilpa 2012-08-29 06:10

सगळ्या भटक्या कुत्र्यांना पकडून मनेका गांधी आणि श्वानप्रेमींच्य ा, भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खायला घालणाऱ्या लोकांच्या घरी नेऊन सोडा. नंतर बघू म्हणतात का कि विरोध करू दे कि भटक्या कुत्र्यांना मारू नका म्हणून. यांना कुत्र्यांचा जीव प्यारा आहे, सर्वसामान्य नागरिकांचा नाही.

Quote





+5 #7 केतन 2012-08-29 05:48

या कुत्र्यांना मनेका गांधीच्या घरी पाठवा. हे सर्व या बाईमुले होत आहे. नेहरू कुटुंबात कोण भिक घालत नाही म्हणून हिचे हे धंदे चालू आहेत.

Quote





+5 #6 अभिजित दातार 2012-08-29 05:24

श्वानप्रेमींनी विरोध केल्यानंतर १९९४ पासून हा प्रकार बंद करण्यात आला. ह्या श्वान्प्रेमिना आता कुत्र्यांना पकडायला पाठवायला पाहिजे मग कळेल कश्या वेदना होतात ते !

Quote





+5 #5 अभिजित दातार 2012-08-29 05:22

श्वानप्रेमींनी विरोध केल्यानंतर १९९४ पासून हा प्रकार बंद करण्यात आला.या श्वानप्रेमी लोकांमुलेच हि मुले आणि बाकी लोक कुत्रांचे बळी ठरले आहेत. याच लोकांनाच अश्या कुत्र्यांना पकडायला पाठवायला हवे म्हणजे कळेल कि कश्या वेदना होतात ते !!

Quote





+9 #4 मंदार ठुसे 2012-08-29 04:20

सगळी कुत्री गोळा करून मनेका गांधीच्या घरी सोडा या बाईनेच हा उपक्रम राबवला आहे.

Quote





+6 #3 rakesh 2012-08-29 03:57

भंपक "पेटा" वल्यावर मनुष्य्हात्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखला करावा. त्यांच्याच उद्योगामुळे हे त्रास भोगावे लागत आहेत.

एरवी उठसूट गले काढणारे हे भंपक लोक भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर मात्र गप्प बसतात. फार त्यांना कळवला असेल तर चार पाच पिसालालेया कुत्र्यांच्या सहवासात सोडून द्यावे.

Quote





+7 #2 स्वप्नील 2012-08-29 03:18

मुंबई मध्ये कुत्र्यांना माणसापेक्षा जास्त सौरक्षण देतात, दहिसर मधेय सुद्धा हीच परिस्तिथी आहे लोक भटक्या कुत्र्यांना खायला घालतात आणि त्यांची लोकसंख्या वाढते आणि दुसऱ्यांना त्रास होतो त्याचा, मला आसे वाटते कुत्र्यांपेक्षा रस्त्यवर राहणाऱ्या लोकांना अन्न द्या

इथे काही सोसायटी मध्ये अस्सेस्च भटके कुत्रे ठेवले आहेत जी इतर लोकांना खूप त्रास देतात

Quote





+7 #1 नरेन 2012-08-28 22:04

ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार?

आता कुठे गेले हे भंपक श्वानमित्र ? केळी खायला?

Quote

No comments:

Post a Comment