Thursday, November 28, 2019

अग्रलेखांचा बादशाह यांचे आसन


अग्रलेखांचा बादशाह यांचे आसन 

'अग्रलेखांचा बादशहा' अशी ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर हे २२ नोव्हेंबर , २०१९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले . " नवाकाळ " मधील त्यांच्या अतिशय रोखठोक अश्या लिखाणाने अनेक दशके सातत्याने अन्यायाविरुद्ध वाचा फोडली होती .अशा  या दुःखद क्षणी मी आज , गुरुवार , २८.११.२०१९ रोजी  सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे - संपादक , " नवाकाळ " यांना भेटण्यासाठी " नवाकाळच्या गिरगांव येथी कार्यालयात गेलो होतो . कार्यालयातील ज्या खोलीत नीळकंठ जी खाडिलकर बसायचे , त्या खोलीत जाण्याचे भाग्य मला मिळाले . त्यांची खुर्ची  इतर सामान तसेच जतन  करून ठेवले आहे . खुर्चीच्या वर मराठी साहित्यकार, नाट्याचार्य, पत्रकार " नवाकाळ " हे वृत्तपत्र मार्च , १९२३ साली ज्यांनी चालू केलं ते कृष्णजी प्रभाकर खाडिलकरकाका साहेब खाडिलकर म्हणून  ते प्रसिद्ध होते ) त्यांचे छायाचित्र आहे . त्या खोलीचं छायाचित्र मी  सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांच्या परवानगीने टिपलं .   

 त्या खोलीत जाण्याचे भाग्य मला   नीळकंठ जी  खाडिलकर यांच्या हयातीत नाही मिळालं याची एक खंत मनात लागून राहिली आहे

नीळकंठ जी  खाडिलकर यांची एक आठवण येथे सांगावीशी वाटते ,   दिनांक : २६ ऑक्टोबर , २०१७ च्या " नवाकाळ " मध्ये माझी  " फुकट  " या शीर्षकाची एक कविता छापून आली होती . त्या दिवशी सकाळी अंदाजे ११.१५ च्या आसपास माझा  भ्रमणध्वनी खणखणला . ओळखीच्या क्रमांकावरून तो संपर्क साधण्यात आला  नव्हता . मी हॅलो म्हटलं , समोरून धीरगंभीर आवाजात विचारणा झाली सत्यजित शाह का ? मी हो म्हटल्यावर त्यांनी सांगितलं कि " मी नीलकंठ खाडिलकर बोलतोय " तुमची आज छापून आलेली " फुकट " कविता वाचली . चांगली आहे . हे ऐकून मला  " स्वर्ग दोन बोटं उरला " या उक्तीचा अर्थ कळला होता . मी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली , त्यांनी मला रविवार सोडून कोणत्याही दिवशी सकाळी ११ नंतर दुपारी १२ का च्या आत येण्यास सांगितलंसंभाषणाच्या शेवटी , मी त्यांना म्हटलं कि त्या   " फुकट  " कवितेत खालील ओळी  देखील टाकव्याश्या वाटल्या होत्या , पण नाही टाकल्या

दे दे रे दे दे 
     सासरे बुवा दे दे 
बायको बरोबर 
      मेहुणी हि फुकट दे     

माझे ऐकून  त्यांनी स्मितहास्य केल्यासारखं मला वाटलं , पण ते म्हणाले कि कल्पना ठीक आहे , पण त्या ओळी  तुम्ही नाही टाकल्या हे चांगलं केलं

त्यांचे भेट घेण्याचं सुख मला नव्हतं , पण त्यांच्याशी अश्या प्रकारे भ्रमणध्वनीवर संवाद मात्र झाला होता

मला आज निघतांना जयश्री ताईंनी ,   नीळकंठ जी  खाडिलकर यांची छायाचित्रातील ग्रंथसंपदा नीळकंठ जी  खाडिलकर यांची आठवण म्हणून दिली

अग्रलेखांचा बादशाह नीळकंठ जी  खाडिलकर  यांना  माझा मानाचा  मुजरा





Tuesday, November 26, 2019

एक मुख्यमंत्री अन दोन उपमुख्यमंत्री ( भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र )


एक मुख्यमंत्री अन दोन उपमुख्यमंत्री ( भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र ) 

माझं नोव्हेंबर , २०१९ खालील व्यंगचित्र बहुतेक खरं ठरणार असं वाटतंय . एक मतदार म्हणून जे होतंय ते पाहणं हाती उरलं आहे .

सध्या मलबार हिल , मुंबई येथे " वर्षा " नावाचा एक बंगला आहे जेथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान आहे .
पण सध्याचे युतीचे जुळवाजुळवीचे राजकारण , सद्य राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात मलबार हिल , मुंबई येथे खालील तीन बंगले कायमस्वरूपी असतील   बहुतेक आणखी  / उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासाठी मोकळी जमीन देखील सोडण्यात येईल .
. ) " वर्षा " - मा. मुख्यमंत्री
. ) " मेघ " ( ) - मा .उपमुख्यमंत्री ( )
. ) " मेघ " ( ) - मा .उपमुख्यमंत्री ( )
"वर्षा" "मेघ" यांचं नातं सांगण्याची गरज नाही . नवीन बंगल्यांची नावे " मेघ " ( ) " मेघ " ( ) अशी का ठेवली आहेत हे कळलेच असेल .
मी हाडाचा व्यंगचित्रकार नाही , पण एक उपरोधिक व्यंगचित्र रेखाटण्याचे धाडस केले आहे .खरं तर व्यंगचित्र एवढं स्पष्ट करून सांगू नये , पण मी नवव्यंगचित्रकार असल्याने हा एक प्रयत्न .
काही चुका असतील तर माफी असावी .
तळ टीप :  " वर्षा " बंगल्यातील तारण तलाव दाखविण्याचा प्रयत्न केला आहे



Saturday, November 23, 2019

मी सुखी आहे , मला पुतण्या नाही !

मी सुखी आहे ,
मला पुतण्या नाही !

Thursday, November 14, 2019

" खोटं , लाचारी , भीक , तत्वसोड " - एक आधुनिक नीती

 " खोटं , लाचारी , भीक , तत्वसोड " - एक आधुनिक नीती  

" साम , दाम , दंड , भेद "  हि चाणक्य नीती म्हणून ओळखली जाते , जात होती  .

सद्य परिस्थिती पाहून " खोटं , लाचारी , भीक , तत्वसोड " अशी काहीशी XXXXXXXX नीती  उदयास येते कि काय अशी भीती वाटते .  

Monday, November 11, 2019

राजकीय युती तोडू कायदा

" राजकीय युती तोडू कायदा "
जसा पक्षांतर विरोघी कायदा आहे , त्याचप्रमाणे खालील कायदा लागू व्हावा .
" राजकीय युती तोडू कायदा " - निवडणुकीपुवी जर एका पेक्ष्या जास्त राजकीय पक्ष्यांनी युती करून निवडणूका लढल्या असतील व निवडणुकीनंतर युतीतील एक , अथवा बाकी राजकीय पक्ष युतीतून बाहेर पडत असतील , तर त्या बाहेर पडणाऱ्या राजकीय पक्षाच्या चिन्हांवर विजयी झालेल्या उमेदवारांची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी .