Thursday, November 7, 2019

जागतिक शहर नियोजन / नगररचना दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY )


जागतिक शहर नियोजन / नगररचना  दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY ) 

नोव्हेंबर , हा जागतिक  शहर नियोजन / नगररचना  दिवस ( WORLD TOWN PLANNING DAY )  म्हणून साजरा केला जातो

शहर अथवा इतर शहरी भागांचे बांधकाम , वाढ आणि विकास यांचे नियोजन आणि नियंत्रण अशी  "  शहर नियोजन "  ( TOWN PLANNING  )  याची व्याख्या आहे

Maharashtra Regional and Town Planning (amendment) act 2018 असा  एक कायदा सन १९६६ पासून अस्तित्वात आहेमाझ्या ज्ञानाप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील बांधकाम , वाढ आणि विकास होताना हा कायदा लागू होत असायला हवा . पण " ठाणे " नावाच्या , मुंबईहून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका स्मार्ट शहरातील गेल्या अनेक वर्षातील बांधकाम पाहता " ठाणे " या SMART CITY (  SMART = हुशार , चलाख , अद्यावत ,   CITY = शहरला हा कायदा बहुतेक लागू नसावा

  "  शहर नियोजन "  ( TOWN PLANNING  )  कसं नसावं याचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणजे ' ठाणे " .  जागा दिसेल तेथे बांधकामं , मैदानांचा अभाव , नियोजनबद्ध अश्या भाजीमंड्या नाहीत , वाहनतळांचा अभाव , अस्तित्वात असलेले तलाव गायब , शाळांना मैदानं नाहीत ,  . . . .  अश्या अनेक गोष्टी सांगता येतील .   असेही ऐकले आहे कि काही उंच इमारतींमध्ये निर्वासित खोली / घर ( REFUGEE FLAT ) नाहीत , आणि होते ते भिंती बांधून खोली / घर ( FLAT ) म्हणून बांधकाम व्यवसिकांनी विकले

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !


#townplannnin  #thanecitytownplanning  #thanecity

Monday, November 4, 2019

भविष्यातील मलबार हिल , मुंबई - एक उपरोधिक व्यंगचित्र


भविष्यातील मलबार हिल , मुंबईएक उपरोधिक व्यंगचित्र

सध्या मलबार हिल , मुंबई येथे " वर्षा " नावाचा एक बंगला  आहे जेथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे निवासस्थान आहे . 

पण सध्याचे युतीचे जुळवाजुळवीचे राजकारण , सद्य राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात  मलबार हिल , मुंबई येथे खालील तीन बंगले कायमसाठी असतील . 

. ) " वर्षा " - मा. मुख्यमंत्री 
. ) " मेघ " ( ) - मा .उपमुख्यमंत्री ( )
. ) " मेघ " ( ) - मा .उपमुख्यमंत्री ( )

"वर्षा" "मेघ" यांचं नातं सांगण्याची गरज नाही .  नवीन बंगल्यांची नावे  " मेघ " ( )   " मेघ " ( ) अशी का ठेवली आहेत हे कळलेच असेल  . 

मी हाडाचा व्यंगचित्रकार नाही , पण एक उपरोधिक व्यंगचित्र रेखाटण्याचे  धाडस केले आहे .खरं तर व्यंगचित्र एवढं स्पष्ट करून सांगू नये , पण मी नवा व्यंगचित्रकार असल्याने हा एक प्रयत्न . 

काही चुका असतील तर माफी असावी .   



Saturday, November 2, 2019

देख तेरे नागपूरकी हालत क्या हो गई नागपूरकर . . . . . . . . . . . 

देख तेरे नागपूरकी हालत क्या हो गई नागपूरकर . . . . . . . . . . .