Thursday, January 24, 2019

धून बदलके देखो 92.7 Big FM


" धून बदलके देखो "  - 92.7 Big FM 

92.7 Big FM या मुंबईच्या आकाशवाणी ( मी तरी RADIO ला मराठीत आकाशवाणी म्हणतो   ) वाहिनीवर  श्री.  व्रजेश हिरजी  ( हिंदी चित्रपट " गोलमाल रिटर्न्स " मधील व इतर अनेक हिंदी चित्रपटांमधील  एक कलाकार  ) " मुंबई मस्का मारके " ( सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते १० या वेळेत )  या कार्यक्रमात   " धून बदलके देखो " या शीर्षकाखाली  काही व्यक्तींची ( ज्यांनी आयुष्यात धून बदलली आहे )  मुलाखत घेतात . 

आज , गुरुवार , २४ जानेवारी , २०१९   रोजी त्यांनी माझी मुलाखत " धून बदलके देखो " या कार्यक्रमात घेतली कारण मी मार्च , २०१३ पासून खाकी , वाहतूक पोलीस यांनी दुचाकीवर शिरस्त्राण घालावे यासाठी लढतोय व त्या लढाईत महाराष्ट्रातील काही शहरात ( निदान मुंबई , ठाणे , पुणे, नाशिक , नागपूर या शहरात ) काही प्रमाणात यश  आलेले आढळून येत आहे . 

हि मुलाखत बहुतेक उद्या , शुक्रवार , २५ जानेवारी, २०१९ अथवा सोमवार , २८ जानेवारी, २०१९ रोजी प्रसारित ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत BROADCAST ) होणार आहे  . 

मुंबई करांनो जमलं तर ऐकावं हि विनंती . 

जमलं तर प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रश्नविरुद्ध लढावे . आजच्या आधुनिक युगात तुम्ही तुमच्या संगणकाद्वारे  , भ्रमणयंत्राद्वारे  देखील अश्या लढाया लढू शकता . लक्ष्यात ठेवा ठाणे शहराचे लाडके आमदार श्री. संजय केळकर साहेब म्हणतात कि व्यस्त ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत BUSY  ) माणूसच  वेळात वेळ काढू शकतो .  ( मी ती मुलाखत संपल्यावर माझ्या अंधेरी तील व्यावसायिक भेटी उरकून घेतल्या ) 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone ! 







Wednesday, January 16, 2019

बिबट्या दर्शन सहल - नवाकाळ

नमस्कार ,
" बिबट्या दर्शन सहल " या शीर्षकाचा मी स्वतः लिहिलेला एक लेख १५ जानेवारी, २०१९ च्या " नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकात छापून आलेला लेख यासोबत देत आहे.
हा लेख छापल्याबद्दल सौ. जयश्री ताई खाडिलकर - पांडे यांचे धन्यवाद .
बिबट्या दर्शन सहल
वन्य प्राणी दर्शनासाठी आपल्या डोळ्यासमोर ताडोबा,पेंच , कान्हा , बांधवगड हे असे अभयारण्य / व्याघ्र प्रकल्प डोळ्यासमोर येतात, या अभयारण्यात बिबट्याचे दर्शन हे तसे फारच दुर्मिळ असते . मी आजपर्यंत अंदाजे ५० वेळा व्याघ्र प्रकल्पात भ्रमण ( SAFARI ) केलं आहे , पण फक्त एकदाच पेंच अभयारण्यात बिबटीण व तिच्या ३ बछड्यांचे दर्शन झाले होते. जेव्हा राजस्थान राज्याची राजधानी असलेल्या जयपूर शहरात " झालाना बिबट्या प्रकल्प / झालाना बिबट्या आरक्षित / संरक्षित क्षेत्र " ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत " Jhalana Leopard Reserve " ) आहे असे कळले व तेथे उघड्या जिप्सी मधून भ्रमण करण्याची सोय आहे हे कळल्यावर तेथे कधी पोहचू असे झाले होते. तो योग मनीष खरे या माझ्या अरण्य भ्रमण सहली घेऊन जाणाऱ्या मित्रामुळे आला .
झालाना बिबट्या प्रकल्प हा जयपूर शहराच्या पूर्वेला आहे . जयपूर रेल्वे स्थानक , जयपूर विमान तळापासून हा बिबट्या प्रकल्प अंदाजे १० ते १५ किलोमीटर च्या अंतरावर आहे . या प्रकल्पाचे अंदाजे क्षेत्रफळ २४ चौरस किलोमीटर एवढे आहे. या प्रकल्पात डोंगराळ भाग आहे , खडकाळ भाग आहे , गर्द झाडी आहेत , गवताळ असे सपाट क्षेत्र देखील आहे . आजच्या घडीला या अभयारण्यात अंदाजे २० ते २२ बिबटे असण्याची शक्यता आहे . या बिबट्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्ही बिबट्याला त्याच्या साम्राज्यात ( नैसर्गिक अवस्थेत ) वावरताना पाहतो . या प्रकल्पाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बहुदा हा जगातील बिबट्यांचे संवर्धन करणारा जगातील हा पहिला वाहिला प्रकल्प असू शकतो .
एवढ्या छोट्याश्या क्षेत्रफळात एवढ्या संख्येने बिबटे असल्याने बिबट्यांचे दर्शन होण्याची शक्यता खूपच जास्त असते . आम्हाला एखादे दुसरे भ्रमण / फेरी सोडता , प्रत्येक भ्रमणात / फेरीत ( सफारीत ) बिबट्याचे दर्शन झाले. एका भ्रमणाच्या वेळी तर बिबटीण तिच्या तोंडात हरिणाच्या पाडसाची शिकार तिच्या बछड्यांना घेऊन जाताना दिसली . ( ते छायाचित्र येथे देत आहे . ) . एका भ्रमणात तर बिबटीण संध्याकाळी अरण्यात फिरताना दिसली , व तीच भ्रमांची वेळ संपता , संपता एका झाडाच्या मोठ्या फांदीवर ऐटीत बसलेली दिसली . आम्ही गेलो होतो तेंव्हा ( डिसेंबर , २०१८ ) नुकतेच एका बिबटीणीला बछडे झाले होते , पण तिने ते बछडे अजूनही तिच्या उंच डोंगरावरील गुहेतून बाहेर नव्हते आणले. पण तीचे आम्हाला खूप दुरून दर्शन ( दुर्बिणीतून ) झाले होते.
बिबट्या हा तसा चपळ व लाजऱ्या स्वभावाचा प्राणी आहे . तो वाघासारखा ऐटीत व सावकाश नाही चालत .
बिबट्या व्यतिरिक्त तेथे पट्टेदार तरस ( STRIPED HYENA ) , वाळवंट कोल्हा ( DESERT FOX ) , कोल्हा ( Golden Jackal ) , ठिपके असलेलं हरीण ( CHITAL / SPOTTED DEER ) , नीलगाय , कस्तुरी मांजर ( ASIAN / INDIAN PALM CIVETS ) , अनेक प्रकारच्या खारुताई , वानर ( LANGUR ) , व इतर अनेक प्राणी देखील आहेत . त्याचप्रमाणे नवरंग ( INDIAN PITTA ) , पोपट , मोर , लांडोर , घुबड ( OWL ) , ठिपकेवाला पिंगळा ( SPOTTED OWLET ) , लांब शेपटीचा खाटीक / गांधारी ( LONG TILED SHIRKE ) , माळ मुनिया / पांढऱ्या कंठाची मनोली ( Indian Silverbill ) , गांधारी, छोटा खाटीक, उदीपाठी खाटीक ( Bay-backed Shrike ) , शिक्रा , कापशी घार ( BLACK SHOULDERED KITE ) , पावशा किंवा पावश्या (इंग्रजी: Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo) , " टकाचोर " ( RUFOUS TREEPIE ) , युरेशियन चिमणमार ससाणा ( Eurasian Sparrowhawk ) , जंगली सातभाई ( JUNGLE BABBLER ) , लांब शेपटीचा सातभाई ( LONG TAILED BABBLER ) , कोतवाल ( DRONGO ) , दयाळ ( ORIENTAL MAGPIE ROBIN ) , पांढऱ्या भुवईची नाचणं { WHITE-BROWED FANTAIL ( FLYCATHCER ) } , सुतार ( WOODPECKER ) व इतर अनेक पक्षी देखील आहेत.
मग , कधी निघताय बिबट्या दर्शनासाठी ?
सत्यजित अ शाह - ठाणे - ९८२११५०८५८





Wednesday, January 2, 2019

प्रकाशभाऊ आमटे - AN EXTRA ORDINARY INDIAN

प्रकाशभाऊ आमटे जी या EXTRA ORDINARY INDIAN ला मानाचा मुजरा 


Sunday, December 23, 2018

भटक्या कुत्र्यांची दहशत - नवी मुंबई

भटक्या कुत्र्यांची दहशत 

नवी मुंबई , महाराष्ट्र राज्य , भारत देश येथील "सत्य"स्थिती सांगणारी हि बातमी . 

२३ डिसेंबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका नावाजलेल्या मराठी वृत्तपत्रात आलेली बातमी या सोबत देत आहे . 

भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध मी गेली ९ ते १० वर्षे अखंड पणे लढतच आहे . या बातमीवरून वरून या प्रश्नाचे गांभीर्य प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घ्यायला हवे.
पुन्हा सांगतो :

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Saturday, December 22, 2018

LADAKH WILDLIFE GOING TO FERAL DOGS

“ LADAKH WILDLIFE GOING TO FERAL DOGS “
या शीर्षकाची एक बऱ्यापैकी मोठ्ठी बातमी . १९ डिसेम्बर , २०१८ च्या THE TIMES OF INDIA या एका सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकात छापून आली आहे
भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वेगाने वाढणाऱ्या संख्येविरुद्ध मी गेली ९ ते १० वर्षे अखंड पणे लढतच आहे . आत्ता तर लडाख येथे देखील हा प्रश्न भेडसावीत आहे यावरून या प्रश्नाचे गांभीर्य प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घ्यायला हवे.
पुन्हा सांगतो :
Evil Triumphs When Good People Sit Quiet
Stand up for what is right , Even if you’re standing alone !


Saturday, December 8, 2018

ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश - सकाळ वृत्तसेवा - ०९.१२.२०१८



ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश

सकाळ वृत्तसेवा
03.44 AM
  1. Home 
  2. Mumbai 
  3. In Thane 60 People Dog Bite

ठाणे : महापालिकेकडून भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण केले जाते; पण पाच वर्षांहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू असूनही शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात पोचल्याने निर्बीजीकरणाबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवसाला सरासरी 60 जणांना भटका कुत्रा चावण्याच्या घटना घडत आहेत. 

उल्हासनगरमध्ये कुत्र्याने सात मुलांना चावा घेतल्यानंतर भटक्‍या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत; मात्र पालिका रुग्णालयात उपचार घेतले तरच पालिकेकडे याची नोंद होते. या नोंदीनुसार दिवसाला केवळ पाच जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याचा दावा केला जात आहे; पण प्रत्यक्षात हा आकडा 60 आहे, असा दावा या विषयावर पाठपुरावा करणारे दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी केला आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर भटक्‍या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे. गेल्या महिन्यात कुत्र्याने याच कुटुंबातील आर्यन (वय 10) याच्या पाठीचा चावा घेतला. तेव्हापासून आर्यनच्या मनात कुत्र्यांची भीती कायम आहे, असे शहा यांनी सांगितले. भटक्‍या कुत्र्यांचे लहान मुलांवरील हल्ले वाढले आहेत. श्‍वानदंशाच्या घटनांपैकी 80 टक्के घटनांमध्ये तीन ते आठ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले. 
एक लाख भटकी कुत्री 
ठाणे शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाखापर्यंत असावी, असा अंदाज शहा यांनी वर्तवला आहे. कारण महापालिकेच्या दाव्यानुसार अद्याप शहरात 40 हजार भटकी कुत्री आहेत; मात्र त्याच वेळी दीड वर्षापासून कुत्र्यांचे सर्वेक्षण झालेले नसल्याने भटक्‍या कुत्र्यांची निश्‍चित संख्या सांगणे पालिका प्रशासनाला शक्‍य झालेले नाही.