Wednesday, September 19, 2018

स्मार्ट ठाणे का विद्रुप ठाणे - " अनधिकृत फलकांचे " ( ILLEGAL HOARDINGS ) चे ठाणे



"स्मार्ट ठाणे का विद्रुप ठाणे"


हे असे चित्र ठाणे नावाच्या एका स्मार्ट शहरात जागो जागी , गल्ली बोळात दिसून येते. माझ्या माहितीप्रमाणे अनधिकृत फलक ( ILLEGAL HOARDINGS ) लावणे यावर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे . तुम्हीच ठरवा याला स्मार्ट ठाणे म्हणायचे का विद्रुप ठाणे म्हणायचे ? लोकप्रतिनिधीनी जर असे केलं तर कोणाकडे तक्रार करायची ?


असं म्हणे कि कोणे एके काळी ( शेकडो वर्षांपूर्वी ) , ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे , पण आत्ता तेच ठाणे शहर हे " अनधिकृत फलकांचे " ( ILLEGAL HOARDINGS ) चे एक स्मार्ट शहर म्हणून आपसूकच ओळखले जात आहे.






Monday, September 17, 2018

रामचंद्र नगर , डोंबिवली पूर्व - भटक्या कुत्र्यांचा १३ वर्षे वयाच्या मुलीवर हल्ला

" रामचंद्र नगर , डोंबिवली पूर्व - भटक्या कुत्र्यांचा १३ वर्षे वयाच्या मुलीवर हल्ला "

१८ सप्टेंबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध दैनिकातील बातमी वाचा . 

त्या मुलीवर डॉक्टर आनंद हर्डीकर , जे माझ्या प्रमाणेच गेली अनेक वर्षे या भटक्या कुत्र्यांच्या अनिर्बंध वाढीविरुद्ध लढत आहेत. . 

यापूर्वीच डोंबिवली येथील " पलावा " या एका कुंपण असलेल्या उच्चभ्रू रहिवासी संकुलातील एका मुलीवर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला होता . 

जपून रहा , हा असा भटक्या कुत्र्यांचा हल्ला कोणावरदेखील होऊ शकतो . 



Sunday, September 16, 2018

ठाणे करांनो , उठा करदात्यांच्या पैशाचा , हा असा अपव्यय थांबवा - गडकरी रंगायतन

ठाणे करांनो , उठा  करदात्यांच्या पैशाचा , हा  असा अपव्यय थांबवा . 

कृपया १७ सप्टेंबर, २०१८ च्या " दैनिक ठाणे वैभव " मध्ये छापून आलेली " दुरुस्तीच्या खर्चातून उभे राहिले असते नवे रंगायतन  " हि बातमी वाचा . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



Friday, September 14, 2018

ठाण्यातील झुलता मनोरा ( वाकलेला खांब )


ठाण्यातील झुलता मनोरा ( वाकलेला खांब )
Satyajit Shah | 10, HyderPark Society, Manpada, Thane West, Thane, Maharashtra 400607, India | Updated:Sep 15, 2018, 05:30AM IST



    ठाण्यातील झुलता मनोरा ( वाकलेला खांब )

ठाणे : ज्युपिटर रुग्णालयासमोरून कापूरबावडी उड्डाणपुलावर प्रवेश करण्याआधी उजव्या हाताला असलेला खांब कलला आहे. हा खांब पडण्याची शक्यता आहे. हा रहदारीचा रस्ता असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी.




Saturday, September 8, 2018

दादा , मामा , देवा , राडा , राज - वाहन क्रमांक पाटी

" दादा , मामा , देवा , राडा , राज , . . . . . . . . . "  या अश्या व इतर चित्र विचित्र वाहन क्रमांक लिहिलेल्या वाहन क्रमांक पाट्यांविरुद्ध च्या माझ्या लढाईची " महाराष्ट्र दिनमान " या वृत्त पत्राने ८ सप्टेंबर , २०१८ च्या अंकातून घेतलेली दखल . 

हे वृत्तपत्र वाचण्यासाठी पुढील / खालील साखळीवर जावे .


http://maharashtradinman.blogspot.com/



Saturday, September 1, 2018

Relief from Knee Pain by Walking in Water - पाण्यात चालणे - " गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम





" गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम 

" पाण्यात चालणे " - स्वानुभवातून सांगतो 

- माझी  " गुडघे दुखी " नियमित  " पाण्यात चालणे "  यामुळे  अंदाजे ८० % कमी झाली .  

- औषधांवर , उपचारांवर खर्च करून पैसे पाण्यात घालण्यापेक्षा पाण्यात चाला व  " गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम मिळवा . 

- अनेकांनी कसं चालावं , किती खोल पाण्यात चालावं असे काही प्रश्न विचारले , त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी हि ध्वनिचित्र फीत बनवली व youtube.com  वर   (  https://www.youtube.com/watch?v=HLGjf5BIUMg   )  टाकली . 

- हि ध्वनी चित्र मी सध्या राहत असलेल्या रहिवासी  संकुलाच्या  तरण तलावातील एक उत्साही  प्रशिक्षक श्री. मंगेश कुदळे याने बनवली आहे . 

- आपण हि   youtube.com  (  https://www.youtube.com/watch?v=HLGjf5BIUMg   )   वरील साखळी ( LINK )   " गुडघे दुखी " ने त्रस्त व्यक्तींना पाठवू शकता . 

- पाण्यात चालणे हे तसेही आरोग्यास खूप उपयोगी आहे .  चालण्याबरोबर मी पाण्यात काही शारीरिक व्यायाम ( पोहणाव्यतिरिक्त )  देखील करतो  , जे व्यायाम  " गुडघे दुखी " मुळे करू शकत नव्हतो . 

दीड वर्षाच्या तान्ह्या बाळाचा कान भटक्या कुत्र्याने तोडला





दीड वर्षाच्या तान्ह्या बाळाचा कान भटक्या कुत्र्याने तोडला 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !