ठाणे
: ज्युपिटररुग्णालयासमोरूनकापूरबावडीउड्डाणपुलावरप्रवेशकरण्याआधीउजव्याहातालाअसलेलाखांबकललाआहे.
हाखांबपडण्याचीशक्यताआहे.
हारहदारीचारस्ताअसल्यानेप्रशासनानेवेळीचउपाययोजनाकरावी.
" दादा , मामा , देवा , राडा , राज , . . . . . . . . . " या अश्या व इतर चित्र विचित्र वाहन क्रमांक लिहिलेल्या वाहन क्रमांक पाट्यांविरुद्ध च्या माझ्या लढाईची " महाराष्ट्र दिनमान " या वृत्त पत्राने ८ सप्टेंबर , २०१८ च्या अंकातून घेतलेली दखल .
हे वृत्तपत्र वाचण्यासाठी पुढील / खालील साखळीवर जावे .
- माझी " गुडघे दुखी " नियमित " पाण्यात चालणे " यामुळे अंदाजे ८० % कमी झाली .
- औषधांवर , उपचारांवर खर्च करून पैसे पाण्यात घालण्यापेक्षा पाण्यात चाला व " गुडघे दुखी " वर औषधं विरहित आराम मिळवा .
- अनेकांनी कसं चालावं , किती खोल पाण्यात चालावं असे काही प्रश्न विचारले , त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी हि ध्वनिचित्र फीत बनवली व youtube.com वर ( https://www.youtube.com/watch?v=HLGjf5BIUMg ) टाकली .
- हि ध्वनी चित्र मी सध्या राहत असलेल्या रहिवासी संकुलाच्या तरण तलावातील एक उत्साही प्रशिक्षक श्री. मंगेश कुदळे याने बनवली आहे .
- आपण हि youtube.com ( https://www.youtube.com/watch?v=HLGjf5BIUMg ) वरील साखळी ( LINK ) " गुडघे दुखी " ने त्रस्त व्यक्तींना पाठवू शकता .
- पाण्यात चालणे हे तसेही आरोग्यास खूप उपयोगी आहे . चालण्याबरोबर मी पाण्यात काही शारीरिक व्यायाम ( पोहणाव्यतिरिक्त ) देखील करतो , जे व्यायाम " गुडघे दुखी " मुळे करू शकत नव्हतो .
" हसणे हे निरोगी राहण्यासाठीची उत्कृष्ट औषध आहे " ( Laughter is The Best Medicine ) .
तुम्हाला खळखळून हसवतो .
" राहण्यासाठी सुयोग्य असलेल्या शहरांमध्ये म्हणे " ठाणे " या एका स्मार्ट सिटी चा भारत या देशात सहावा क्रमांक आला आहे " .
अहो हे कळल्यावर गम्मत वाटली , मी तर मनसोक्त हसलो . . बहुतेक सहाच शहरांचा अभ्यास करून हा क्रमांक दिला गेला असण्याची दाट शक्यता वाटते.
काय खळखळून हसू आलं कि नाही ? जर उत्तर नाही असे असेल याचा अर्थ तुम्हाला काहीच माहिती नाही , अथवा तुम्ही " GOOD PEOPLE " या सदरात मोडत असणार कारण " Evil Triumphs When Good People Sit Quiet "
असो , रविवार , १९ ऑगस्ट , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका सुप्रसिद्ध मराठी वृत्तपत्राच्या ठाणे पुरवणीत संपूर्ण पान भरून काही ठाणेकरांच्या प्रतिक्रिया आली आहेत . त्यात माझी प्रतिक्रिया देखील आहे.
Stand up for what is right , Even if you’re standing alone !
" नवाकाळ " या एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकाच्या १८ ऑगस्ट, २०१८ च्या अंकात मी स्वतः लिहिलेली ( कोणाची चोरून स्वतःच्या नावावर न खपवलेली ) कविता छापून आली आहे.
या कवितेतील अनुभव फक्त , आणि फक्त लोकल ने प्रवास करणाऱ्या असंख्य मुंबईकरांनाच येतो.
हे चौथे आसन म्हणजेच हि " लोकलची चौथी सीट " पटकावणे हा एक तसा धाडशी खेळच आहे.
काहींना हा प्रश्न पडेल कि मी " सीट " हा एक इंग्रजी शब्द का वापरला आहे ? त्याच मुख्य कारण असं आहे कि , लोकल प्रवाश्यांमध्ये चौथी सीट हाच शब्द प्रचलित आहे . त्यामुळे जर मी त्या ऐवजी चौथे आसन हा शुद्ध मराठी शब्द वापरला असता तर तो बहुसंख्य मराठी वाचकांना कळाला नसता .