Saturday, January 6, 2018

औरंगाबाद- भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात १८ जखमी - कोठे नेऊन ठेवलं आहे भटक्या कुत्र्यांनी महाराष्ट्राला ?


कोठे नेऊन ठेवलं आहे भटक्या कुत्र्यांनी महाराष्ट्राला ? 

कोठे गेले प्राणी मित्र ? 
कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? 
कोठे गेलय प्राणी संघटना ? 

औरंगाबाद- भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात १८ जखमी
औरंगाबाद शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडलाय. रहेमानिया कॉलनीत या कुत्र्याने एक-दोन नाही तर एकूण १८ जणांवर हल्ला केला. या घटनेनंतर ७ मुलांना घाटी रूग्णालयात दाखल करत त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान घाटी रूग्णालयाच्या प्रशासानाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमोपचारानंतर रूग्णांना घरी सोडण्यात आलंय.
By
 -
January 6, 2018

शुक्रवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने औरंगाबादच्या रेहमानिया कॉलनीमध्ये अनेकांचा चावा घेतला. शिवाय जवळच खेळत असलेल्या लहान मुलांना देखील कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर मुलांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलांवर प्रथमोपचार करून, अॅन्टी रेबीज ट्रीटमेंट सुरु करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीये.
संपूर्ण राज्यभरातच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. कुत्रा चावल्यामुळे रेबीज होऊन अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आहेत नुकतचं पालघरच्या एका १० वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला.
कुत्रा चावण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत जातायत. याविषयी सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांच्या सांगण्यानुसार,
·         ठाण्यात दररोज अंदाजे ७० जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद होते
·         राज्यामधील ही आकडेवारी पाहता अंदाजे ७७७७ जणांना भटके कुत्रे दररोज चावा घेतात
·         तर संपूर्ण भारतात दररोज अंदाजे १,४१,९६० इतक्या लोकांना कुत्रा चावण्याच्या घटना समोर येतात
माय मेडिकल मंत्राशी बोलताना सत्यजित शहा म्हणाले की, “भटक्य़ा कुत्र्यांनी चावा घेण्याच्या प्रकरणांमध्ये फार होतेय. यावर सरकारने योग्य ती पाऊल उचलून ही गंभीर परिस्थिती रोखली पाहिजे. यासाठी प्रत्येक भागातील कुत्र्यांनी नसबंदी केली पाहिजे. कल्याण, डोंबिवली सारख्या शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली नाही.”
शहा पुढे म्हणाले की, “कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज होतो. या आजारामुळे मृत्यूही होऊ शकतो. कुत्रा चावण्याच्या घटनेत जवळपास ८० टक्के ३ ते ८ वयोगटातील बालकांचा समावेश असतो. कुत्रा चावल्यानंतर तातडीने उपचार मिळणं गरजेचं आहे. मात्र हे उपचार प्रत्येक रूग्णायलात उपलब्ध नसल्याने रूग्णाचा मृत्यू होतो. शिवाय हे उपचार मोफत मिळणंही गरजेचं आहे.”
दरम्यान राज्य़ाचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणं आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन धोरण निश्चित केलं जाईल असं सांगितलं होतं.

http://www.mymedicalmantra.com/marathi/dog-attack-on-18-people-in-aurangabad/


Wednesday, January 3, 2018

रस्ते अपघातांमध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक - नेहमीच दुचाकी वर शिरस्त्राण ( HELMET ) वापरा

" रस्ते अपघातांमध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक "
कृपया हि बातमी वाचा .
नेहमीच दुचाकी वर शिरस्त्राण ( HELMET ) वापरा


Monday, January 1, 2018

" ONE MAN ARMY " चळवळींसाठी "जनादेश पुरस्कार"

नमस्कार ,  

३१ डिसेम्बर, २०१७ रोजी , मला माझ्या अनेक " ONE MAN ARMY " चळवळींसाठी दैनिक " जनादेश " च्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात "जनादेश पुरस्कार" देण्यात आला.

" जनादेश " हे ठाणे येथून प्रसिद्ध होणारे एक मराठी दैनिक आहे.  हे दैनिक श्री. कैलाश म्हापदी या एका तरुणाने १४ वर्षांपूर्वी  खरी पत्रकारिता टिकविण्यासाठी सुरु केले . 

दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी , ते  समाजातील निवडक व्यक्तींचा "जनादेश पुरस्कार" देऊन गौरव करतात . 

गंम्मत  म्हणजे ज्याप्रमाणे ठाणे महानगरपालिका  दरवर्षी अगदी खोऱ्याने ( अनेक व्यक्तींना ) विविध पुरस्कार देतात अहं  वाटतात , त्याप्रमाणे न करता  श्री. कैलाश म्हापदी  हे  निवडक ४ / ५ व्यक्तींनाच  पुरस्कार देतात .त्यामुळेच हा पुरस्कार घेताना आनंद झाला.  महत्वाचं म्हणजे मला उपस्थितांसमोर माझे विचार मांडायची संधी  देखील श्री. कैलाश म्हापदी यांनी दिली . 

असो . माझ्या बरोबर अन्य ५ व्यक्तींचा देखील "जनादेश पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आला . 

एक महत्वाचं सांगायचं राहीलं  कि श्री. कैलाश म्हापदी यांनी हे पुरस्कार आम्हाला कोणत्याही राजकारणी व्यक्तींच्या हस्ते न देता , समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करणाऱ्या  व्यक्तींकडून दिला गेला. 

एका  अतिशय आगळ्या वेगळ्या समारंभाचा साक्षीदार असल्यामुळे हे सगळं तुमच्यासमोर आणलं . 

असो , माझ्या लढाया या अनेक वर्षांपासून चालू आहेत त्या अशाच चालू आहेत . 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !