Sunday, April 26, 2020
Wednesday, April 22, 2020
Tuesday, April 14, 2020
करोना , करोना आणि करोना
जेथे पहावं , ऐकावं , वाचावं तेथे करोना , करोना आणि करोना .
सगळं वातावरण एकदम नकारात्मक ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत NEGATIVE ) झालं आहे .
त्याच नकारात्मक वातावरणाचं सकारात्मक ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत POSITIVE ) वातावरणात परिवर्तन ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत TRANSFORMATION ) करण्यासाठी आजच लिहिलेली खालील कविता पाठवीत आहे .
आपणाला हि कविता वाचक , प्रेक्षक , श्रोते यांच्यापर्यंत न्यायची असेल तर अवश्य न्यावी ( माझ्या परवानगीची गरज नाही ) , फक्त माझ्या नावासकट न्यावी हि नम्र विनंती . .
Sunday, April 12, 2020
Friday, April 10, 2020
Monday, April 6, 2020
मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल
मराठी माणसच करताहेत मराठी भाषेची चिरफाड , टिंगल
" खूप प्रयत्न करून आज *मास्क* ला पर्यायी मराठी शब्द मिळाला आहे.
मुखनाकसंरक्षकजीवजंतूरोधकहवागाळ झाकोळ पट्टी " .
हा असा विचित्र संदेश कसं काय ? / काय मग ? ( WHATSAPP ) द्वारे दिनांक ५ एप्रिल , २०२० पासून पसरवला ( VIRAL केला ) जातोय . मराठी भाषेचे अतीव दुःख म्हणजे हा संदेश मराठी आडनाव असलेल्या , मराठी भाषिक व्यक्तींकडूनच अग्रेषित ( FORWARD ) केला जातोय.
मराठी भाषिक हे विसरतोय कि हे असले विचित्र संदेश अग्रेषित करून ते मराठी भाषेची टिंगल , टवाळी करताहेत . ते हे विसरताहेत कि मराठी हि मराठी आडनाव असलेल्यांची मातृभाषा (MOTHER TONGUE ) आहे , म्हणजेच आपण आपल्या आईची खिल्ली उडवतोय .
माझी तरी मराठी भाषा हि मातृभाषा आहे , आणि मी माझ्या मातृभाषेची खिल्ली उडविणारी नाही , उडू देणार नाही .
ज्या व्यक्तीने हा संदेश बनविला असेल , बहुतेक त्याच्या मेंदूवर कायमचा मुखवटा ( MASK ) लावलेला असेल .
तुमची मातृभाषा कोणती आहे ? तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान आहे का ?
Friday, April 3, 2020
Wednesday, April 1, 2020
"खादाड " प्रवृत्ती
"खादाड " प्रवृत्ती :
काही वर्षांपूर्वी , मी FACEBOOK ( FB ) वरील “ व्यक्ती आणि प्रवृत्ती ” या माझ्या एका गाजलेल्या व " लोकप्रभा " या साप्ताहिकेत छापून आलेल्या लेखात "खादाड " प्रवृत्ती विषयी लिहिले होते. मला वाटलं होत कि या प्रवृत्तीच्या व्यक्ती फक्त समाजरूप / समाजचेहरा (
FACEBOOK ) या सामाजिक माध्यमात आढळून येतात . पण ते चुकीचं होत कारण मला अश्या प्रवृत्तीच्या व्यक्ती कसं काय ? / काय मग ? ( what'sapp )
या सामाजिक माध्यमावर देखील आढळून आल्या . आज तर हद्दच ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत HEIGHT ) झाली . आज , , १ एप्रिल , २०२० रोजी भारत देशातील एक सुप्रसिद्ध व्यक्तीने TWEETER या सामाजिक माध्यमावर सोबत जोडलेल्या छायाचित्रातील माहिती टाकली होती . व त्यावर अंबा ( ज्याला आंबा म्हणतात ) घालून शिरा , येता का breakfast ( हे आजचं शुद्ध व प्रचलित मराठी ) ला असे लिहिले होते .
याला काय म्हणू ? अजून काय लिहू ? भारतीय कधी प्रगल्भ ( आजच्या शुद्ध व प्रचलित मराठीत MATURE ) कधी होणार ? खरं तर सामाजिक माध्यमांचा उपयोग सामाजिक प्रभोधनासाठी , सामाजिक प्रश्नांना वाच फोडण्यासाठी अतिशय प्रभावी माध्यम आहे .
माझ्या लेखातील त्या "खादाड " प्रवृत्ती विषयीचा भाग येथे देत आहे
"खादाड " प्रवृत्ती : या प्रवृत्तीच्या व्यक्तींना सदा न कदा खाण्याच्या पदार्थांचे फोटो , किवा स्वतः खात असतानाचे फोटो असे फक्त खाण्याच्या पदार्था संदर्भातील फोटो FB वर टाकण्यात / SHARE करण्यात फारच स्वारस्य असते. कधी कधी तर पदार्थाने भरलेली थाळीच ( RICE PLATE ) काय दाखवतील . तर कधी भजी , बटर घातलेली पाव भाजी , जिलेबी , मिसळ वगैरे चे फोटो टाकून त्याबरोबर , असे काहीतरी लिहितात या खायला वाट पाहतो, येता का खायला , कोण कोण येणार हे सगळं गरमा गरम खायला ? या प्रकारच्या प्रवृत्तींना हि खाण्याच्या पदार्थांची छायाचित्रे अनेकांना TAG करायची देखील एक ( अप ) प्रवृत्ती असते. TAG केल म्हणजे ती सगळी पदार्थांची छायाचित्रे नाईलाजास्तव पाहिलीच जातात. सुरुवातीला एवढे खाण्याचे पदार्थ या छायाचित्रातून पाहिले जायचे कि मला न्याहारी देखील करायची इच्छा होत नसे. तसेच काहीही न खाता मला अनेकदा ढेकर यायची, व अपचन देखील व्हायचं. माझ्या आत्तापर्यंत " हाजमोला " च्या ५ बाटल्या संपवून झाल्या आहेत , त्याचप्रमाणे " GELUSIL " च्या हि ६ बाटल्या संपवून झाल्या आहेत. खूप विचारा अंती हि सगळी खाद्य पदार्थांची छायाचित्रे याला कारणीभूत आहेत हे कळाले . या प्रवृत्तीवर काही उपाय आपल्या कडे असेल तर मला जरूर कळवा .
अश्याच या प्रवृत्तीच्या एका व्यक्तीचे लग्न झाल . त्याने लग्नातले भरपूर फोटो FB वर टाकले. त्यात लग्नातील विधींचे , जेवणाचे , एकमेकांना भरवितांना वगैरे असे अनेक फोटो होते हे वेगळं सांगायची गरज नाही. गम्मत तर पुढे आहे . त्याने एका HOTEL मध्ये शिरतानाचा फोटो टाकला होता व लिहिले होते कि मधु चंद्राला आलो आहे.
जसे खाद्य पदार्थांचे फोटो टाकल्यावर अश्या व्यक्ती लिहितात कि चला या खायला किंवा येता का खायला ? , अथवा कोण कोण येणार हे सगळं गरमा गरम खायला ? तसच मला वाटल कि आता ती व्यक्ती लिहिते कि काय , चला या XXXXXX ला किंवा येता का XXXXX ला ? , अथवा कोण कोण येणार XXXXXXXXX ला ? . इतक्यांदा त्या व्यक्तीने अनेक पदार्थ खायला FB वर आमंत्रण दिले होते , पण मी काही गेलो नव्हतो आणि तसा मला दांडगा अनुभव असल्यामुळे ( अहो काय हे भलताच काय विचार करता ? मी प्रवासाच्या अनुभवाबद्दल बोलतोय ) म्हणून म्हटलं कि यावेळी आता त्याचे मन नाही मोडायचे , आणि त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करायचा , मी लगेचच माझी प्रवासाची पेटी ( TRAVEL BAG ) भरायला घेणारच होतो पण तशी वाक्ये त्या व्यक्तीने तेथे टाकली नव्हती त्यामुळे माझा तसा मोठा पचकाच झाला .
Subscribe to:
Posts (Atom)