Wednesday, October 30, 2019

महाराष्ट्र राज्यातील सद्य स्थिती

महाराष्ट्र राज्यातील सद्य स्थिती 

१) पहिल्या छायाचित्रातील दोन पक्षी ,  महाराष्ट्र राज्यातील दोन राजकीय पक्ष्यांची सद्य स्थिती दर्शविते . 

२) दुसऱ्या  छायाचित्रातील दोन पक्षी  महाराष्ट्र राज्यातील दोन राजकीय पक्ष्यांची २ / ३ / ४ दिवसानंतरची स्थिती दर्शविते .  



Monday, October 28, 2019

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप

ठाणे वाहतूक पोलिसांना दिवाळी फराळ वाटप
नरक चतुर्थी हा तसा दिवाळी सणाचा पहिला दिवस . अभ्यंग स्नान , फटाकड्या , फराळ , दिवाळी पहाट , तरुणाई नटून ठाण्याच्या राम मारुती मार्गावर व्यस्त हा असा काहीसा तुमचा ,आमचा दिवस सुरु होतो , पण आपले वाहतूक पोलीस बंधू , भगिनी मात्र वाहतूक सुरळीत सुरु राहावी म्हणून अक्षरशः पहाटेपासूनच रस्त्यावर , नाक्यावर वाहतूक नियंत्रण करण्यात व्यस्त असतात . त्यांच्या शब्दकोशात अभ्यंग स्नान , फटाकड्या , फराळ , दिवाळी पहाट हे असं काही नसतं . त्यांच्यासाठी कर्मभूमी हेच त्यांचे जणू घर असते . त्यांना जर त्यांच्या कर्मभूमीमध्ये दिवाळी फराळ दिला तर त्यांची दिवाळी थोडीशी सुखकर होईल हि कल्पना सुचली , आणि त्या कल्पनेला ठाणे येथील डॉक्टर सौ . मृदुला भावे यांनी सक्रिय पाठिंबा दिला व थोडासा खर्चाचा भर देखील उचलला . डॉक्टर सौ . मृदुला भावे यांनी फराळाची जबाबदारी घेतली . पाकिटात चिवडा , चकल्या , लाडू , करंजी / गोडे शंकरपाळी असा विविध फराळ होता . या फराळाच्या पिशवीत " वाहतूक पोलीस मित्र " हि माझी कविता देखील होती . ( ती कविता या सोबत जोडत आहे . )
रविवार , २७ ऑक्टोबर , २०१९ रोजी , नरक चतुर्थी , लक्ष्मी पूजन च्या दिवशी सकाळी हा फराळ वाटपाचा कार्यक्रम ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार श्री. संजय केळकर साहेब यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त - वाहतूक - ठाणे यांच्या तीन हाथ नाका या कार्यालयापासून झाली . त्यावेळी श्री. अविनाश पालवे - सहाय्यक पोलीस आयुक्त , वाहतूक - ठाणे हजर होते , त्याचप्रमाणे दत्तात्रय घाडगे , सौ. मनीषा वायंगणकर , सौ. मीनल उत्तूरकर , श्री. भावेश जर्दोश , कुमार यश जर्दोश , कुमारी तनिषा शाह , सुमेध शाह , शामली दोषी हजर होते.
त्यानंतर ठाणे वाहतूक शाखेच्या खालील चौक्यांमध्ये जाऊन , तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले .
१. ) कासारवडवली वाहतूक पोलीस चौकी - सौ . अनुजा घाडगे - सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले
२.) कापूरबावडी वाहतूक पोलीस चौकी - कोणी वरिष्ठ अधिकारी नव्हते त्यामुळे तेथील वाहतूक पोलिसांनाच फराळ वाटप करण्यात आले
३.) राबोडी वाहतूक पोलीस चौकी - कोणी वरिष्ठ अधिकारी नव्हते त्यामुळे तेथील वाहतूक पोलिसांनाच फराळ वाटप करण्यात आले
४.) विटावा , कळवा वाहतूक पोलीस चौकी - श्री. मनोहर आव्हाड - पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले
५.) ऐरोली , नवी मुंबई , श्री. बी एन औटी - पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत तेथील वाहतूक पोलिसांना फराळ वाटप करण्यात आले .
त्याचप्रमाणे रस्त्यावर , नाक्यावर दिसलेल्या वाहतूक पोलिसांना देखील फराळ वाटप करण्यात आले.
वाहतूक पोलिसांशी संवाद साधला तेंव्हा त्यांनी यापुढे शक्य असेल तेंव्हा प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील मुखवटा ( MASK ) देखील देण्यास सांगितले . मी ३ वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसानिमित्त ठाणे वाहतूक पोलिसांना प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील मुखवटा व ध्वनी प्रदूषणातून वाचण्यासाठी कर्ण बूच ( EAR PLUG ) यांचे वाटप केले होते .
हे वाचून / पाहून काही जागरूक नागरिक जर पुढे आले तर वाहतूक पोलिसांना आपण प्रदूषणापासून वाचण्यासाठी नाकावरील मुखवटा वाटप करून आपले सामाजिक ऋण थोड्याफार प्रमाणात फेडू शकतो . कोणाला या अश्या व इतर आगळ्या वेगळ्या उपक्रमात सामील व्हायचे असेल तर सत्यजित शाह - ९८२११५०८५८ , ७०४५००१३४० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा .
फराळ वाटपानंतर वाहतूक पोलिसांच्या चेहऱ्यावरील हास्य , समाधान पाहून हि सगळी मेहनत , धावपळ फळली असे वाटले .
कार्यक्रमाची काही छायाचित्रे यासोबत जोडत आहे .











लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पनवेल येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा २१ जणांना चावा .

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पनवेल येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा २१ जणांना चावा .

अनेकांनी खाजगी रुग्णालयातही उपचार घेतल्यामुळे जखमींचा नेमका आकडा कळू शकलेला नाही . 

महाराष्ट्र टाईम्स - २८ ऑक्टोबर , २०१९ 

कोठे गेले प्राणी मित्र ? कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ? कोठे गेल्या प्राणी संघटना ? 

मानवी प्राणी मरो , पण भटकी कुत्री जगो . 

भारतीयांना नवीन वर्ष श्वानदंश विरहित जाओ हि ईश्वर चरणी प्रार्थना 

Friday, October 25, 2019

आपला माणूस , आमदार श्री. संजय केळकर साहेब


आपला माणूस , आमदार श्री. संजय केळकर साहेब

काल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार श्री. संजय केळकर साहेबयांच्या कार्यालयात अभिनंदन करणाऱ्यांची तुडुंब गर्दी होणार हे ठाऊक असल्याने , मी त्यांचे अभिनंदन करायला आज , शुक्रवार , २५ ऑक्टोबर , २०१९ रोजी सायंकाळी गेलो होतो. कार्यालयात शिरल्या शिरल्या , केळकर साहेबांनी नेहमीसारखी आपुलकीने सत्यजित अशी एक हाक मारली अन आपसूकच अभिनंदन पर हि अशी एक गळाभेट झाली . गजानन केळकर ने हा क्षण अचूक टिपला .

माझ्या सारख्या एका सामान्य ठाणेकर नागरिकांची अशी गळाभेट घेणारा असा , प्रत्येकाला " आपला माणूस " वाटणारा असा जगावेगळा , साधा , सुसंस्कृत आमदार या कलयुगात शोधून देखील सापडणार नाही .
आम्हा प्रत्येक ठाणेकर नागरिकांची ईश्वरचरणी एक मागणी आहे कि त्यांना मंत्रिपद ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं.



Sunday, October 13, 2019

मतदारांच्या जागृतीसाठी

एक मतदार , जागरूक नागरिक म्हणून मी अश्या मतदारांचे काम सोपं करायचं ठरविलं , म्हणून हा सगळा एक छोटासा प्रयत्न


Saturday, October 12, 2019

मराठीची अधोगती

" मराठीची अधोगती "

१. ) एका निमंत्रण पत्रिकेत " पावसाच्या अतिवृष्टीमुळे स्थगित करण्यात आलेला . . . . . "  असे एक महाभयंकर मराठी वाक्य लिहिले होते.   अतिवृष्टी हि पावसामुळेच होत असते , कधीही  अतिवृष्टी उन्हामुळे वा थंडीमुळे होत नसते . " अति पावसामुळे "  अथवा  "  अतिवृष्टीमुळे "  हे योग्य मराठी आहे  . 

२. ) एका सुप्रसिद्ध मराठी दैनिकातील एका बातमीतील ओळ येथे देत आहे " त्यानंतर त्याने त्याच पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली ."    " स्वतः आत्महत्या " हे कुठलं मराठी ? एखाद्याची  आत्महत्या कधीच दुसरी व्यक्ती करीत नसते . तसं झालं तर त्याला खून म्हणतात . 

हे आजचं मराठी ? मराठीची केवढी हि अधोगती . 

फेसबुकवरील काही व्यक्तीचं आधुनिक मराठी वाचून तर मला  एवढं वाईट वाटत कि त्यावर देखील कधीतरी विस्तुतपणे लिहीणार आहे . मराठी भाषेला लोप पावण्यापासून वाचविण्याचे माझे प्रयत्न चालू राहणार आहेतच . 



मराठी माणसांनो शुद्ध मराठी लिहा , शुद्ध मराठी बोला .